‘लोकसत्ता’ने २०११ सालच्या गणेशोत्सवापासून ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत गेल्या वर्षी ११ संस्था (कारण गेल्या वर्षी गणेशोत्सव अकरा दिवस आला होता.) तर यंदा १० संस्थांची माहिती, रोज एकेक करून छापली. यातील काही माहिती पहिल्या पानावर आली तर बरीचशी माहिती आतल्या पानावर असे मिळून प्रत्येकी जवळजवळ पाऊण पाऊण पान माहिती छापून आली. व्यावसायिक हिशेबाने पाहिले तर एवढी माहिती जाहिरातीच्या रूपाने ‘लोकसत्ता’त छापायला सहजी आठ ते दहा लाख रुपये लागले असते.
लोकमान्य टिळकांनी समाजजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यावर त्या वेळी न्यायमूर्ती महादेव गोिवद रानडे तेव्हा म्हणाल्याचे नुकतेच ‘लोकसत्ता’त वाचले होते की ‘पुढे पुढे या उत्सवाला बीभत्स स्वरूप येईल.’ सार्वजनिक गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप पाहता न्या. रानडय़ांची दूरदृष्टी लक्षात येते. मुंबईच्या गणेशोत्सवात कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. त्यातील लालबागचा गणेशोत्सव साजरा करणारे मंडळ वर्षभर लोकांसाठी आरोग्याच्या काही योजना अमलात आणते व इतरही काही लोकोपयोगी कामे करते असे ऐकून आहे. इतर मंडळे काही करतात का ते ठाऊक नाही, पण करीत असतील तर मूठभर मंडळेच ते करीत असतील. पण ‘लोकसत्ता’ने गेल्या वर्षीपासून सुरू केलेली ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ योजना ही जरी त्या मंडळांना कामाला प्रवृत्त करीत नसली तरी संपूर्ण समाजाला या निमित्ताने या संस्थांची आणि त्यांच्या पशाअभावी अडकलेल्या योजनांची जी माहिती ‘लोकसत्ता’ करून देते व देणग्या देण्यासाठी लोकांना आवाहन करते ती फारच कौतुकास्पद गोष्ट आहे. गेल्या वर्षी या योजनेतून एकूण पाच कोटी रुपये जमले. संस्था वा व्यक्ती ही ‘लोकसत्ता’सारखी तशीच विश्वासार्ह संस्था असेल तरच लोक आपल्या खिशात हात घालतील. गेल्या दोनही वर्षांत सामान्य लोकांनी यासाठी पसे दिले. मात्र या योजनेत श्रीमंत लोक अथवा औद्योगिक संस्था किंवा कोटय़वधी रुपये जमा करणारी गणेशोत्सव मंडळे अजून तरी सहभागी झालेली दिसत नाहीत.
लोकमान्यांच्या काळी लोकमान्य टिळक आणि ‘केसरी’ वेगळे करणे अवघड होते, पण गणेशोत्सव, शिवजयंती, तळेगावचा पसा फंड कारखाना अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. अशी कामे परत एकदा वर्तमानपत्रे पुढाकार घेऊन करू लागली आहेत.
‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे मराठी विज्ञान परिषदेला काही उपक्रम नक्कीच पुढे नेता येणार आहेत. परिषदेला सध्याची जागा कमी पडते, म्हणून इमारतीचे विस्तारीकरण करायचे आहे. मात्र त्यासाठी लागणारे पसे बरेच असून तो प्रकल्प या वेळी जमणाऱ्या पशातून पुढे जाणार नाही. परिषद गेली चार-पाच वष्रे ‘संकल्पना विकसन’ नावाचा अभ्यासक्रम घेत आहे. हा उपक्रम मुलांना खूप उपयोगाचा वाटतो, पण त्याची फी गरीब मुलांना परवडणारी नसल्याने आता ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे दरवर्षी काही गरीब मुलांना यात सहभागी करून घेता येईल. यंदा राष्ट्रीय गणितवर्ष असल्याने काही उपक्रम यंदा केले. पण गणिताची विद्यार्थ्यांत असलेली नावड पाहता हा उपक्रम कायमचा चालू ठेवावा लागेल, त्यासाठीही यातील काही पसे उपयोगी पडतील. पण यातून जमणारे पसे हे मर्यादित असल्याने मर्यादित पशांत मर्यादित उपक्रमच करता येतील, पण या निमित्ताने मिळालेल्या प्रसिद्धीमुळे जनतेचे मोठय़ा प्रमाणावर मराठी विज्ञान परिषदेकडे जे लक्ष गेले आहे, त्यामुळे कार्यक्रमाला विद्यार्थी व श्रोत्यांची उपस्थिती वाढेल ही मोठी जमेची बाजू वाटते, तसेच असे लक्ष गेल्याने सभासदांची व नेहमीच्या देणगीदारांची संख्या वाढू शकेल.
‘संकल्पना विकसन’ आणि गणित उपक्रमांना गती..
‘लोकसत्ता’ने २०११ सालच्या गणेशोत्सवापासून ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत गेल्या वर्षी ११ संस्था (कारण गेल्या वर्षी गणेशोत्सव अकरा दिवस आला होता.) तर यंदा १० संस्थांची माहिती, रोज एकेक करून छापली.
आणखी वाचा
First published on: 10-11-2012 at 11:29 IST
मराठीतील सर्व रविवार विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idea of development and programme to devemopment mathematics