‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर ‘सूर्याची पिल्ले’ हा अग्रलेख (१९ नोव्हेंबर) तसेच सेनाप्रमुखांचे स्वीय सेवक थापा यांचा ‘व्यक्तिवेध’ (२० नोव्हेंबर) देखील वाचला. दिवाळीच्या सुट्टीत मुंबईत आलो असताना, सण साजरा होत असतानाच दुसरीकडे शिवसेनाप्रमुखांच्या अस्थिर आणि चिंताजनक प्रकृतीचे वृत्त टीव्हीद्वारे वेळोवेळी समजत होते. काही अडचणींमुळे मला कलानगर-मातोश्रीपर्यंत जाता आले नाही. मात्र मुंबईत वास्तव्य असताना तरुण वयात मी शिवसेनेचा छोटा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेच्या खूप जवळ गेलो, सेना वृिद्धगत होताना आणि भाजप-सेना युती राज्य करतानाही मी जवळून अनुभवले. पण आज चार दशके कार्यरत असलेली ही संघटना अनिश्चिततेच्या फेऱ्यात सापडलेली पाहताना मला अतीव वेदना होत आहेत. ‘सूर्याची पिल्ले’ या आपल्या मार्मिक अग्रलेखाने सेनेवर आजवर भाबडेपणे प्रेम करणाऱ्या शिवसनिकांना योग्य वेळी जागे करण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे, त्याबद्दल मी एक शिवसनिक म्हणून आपणास मनापासून धन्यवाद देतो. सेनाप्रमुख हयात असताना त्यांचा खूप दरारा होता, पण त्यांनी हे जग सोडून जाताच गोंधळाला काही सीमाच राहू नये, याचा खेद माझ्याप्रमाणे अन्य शिवसनिकांना नक्की वाटत असेल यात संदेह नाही.
‘डॉक्टरांच्या निवेदनाची गरजच काय,’ असे विधान मी राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याकडून टीव्हीवरून ऐकले, तेव्हा माझ्याप्रमाणेच अनेक जण अवाकच झाले असतील! असे असताना थापासारख्या सामान्य व अल्पशिक्षित सेवकाचे जबाबदारीने वागणे मनात भरून जाते. गेली २०-२५ वष्रे बाळासाहेबांच्या अगदी निकट वावरणारा थापा हा खराखुरा शिवसनिक असून तो पूर्वीचा एक मावळा तर नाही ना, असे विचार मनात उमटले म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा