सध्या फेसबुकवर टाकलेल्या मजकुरावरून काही ठिकाणी उठलेल्या जनक्षोभावर उलटसुलट चर्चा घडत आहेत. कुठल्या मजकुराला आक्षेपार्ह म्हणावे किवा ठरवावे ते त्या त्या वेळी कुठल्या तरी समाज गटाच्या मानसिकतेवर अवलंबून असते. इतिहासात असे बरेच प्रसंग घडलेले आपल्याला पाहायला मिळतील. सध्या कॉम्प्युटर युग असल्यामुळे आता त्यात एका नवीन माध्यमाची भर पडली आहे एवढेच. पूर्वी समाज सुधारकांनी भाषणातून किवा लिखाणातून केलेल्या विधानावर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या, त्यांची प्रेतयात्रा काढणे, गाढवाची वरात काढणे, शेण मारा करणे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असत. एखादे विधान आक्षेपार्ह आहे की नाही हे ठरविण्याचा आणि त्यावर आपली निषेधात्मक प्रतिक्रिया देण्याचा हक्कसंबंधित समाज गट स्वत:कडे कुठल्याही कायद्याची तमा न बाळगता घेत आला आहे आणि त्या त्या वेळी त्या त्या वेळच्या शासनाने कधी कायद्याच्या अधाराने, कधी दुर्लक्ष करून, कधी सामंजस्याने तोडगा काढला आहे. थोडक्यात, एखाद्या विधानाची आक्षेपार्हता समाज- सापेक्ष असते. त्यामुळे त्याला कायद्याच्या फुटपट्टय़ा लावणे वाटते तितके सोपे नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा