संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र देहूहून पंढरपूरकरिता प्रस्थान झाले. ज्यांनी तुकोबांना ‘जगद्गुरू’ ही पदवी दिली व त्यांचे माहात्म्य वाढविण्याचा जन्मभर प्रयत्न केला त्या डॉ. सर रामचंद्र गोपाळ भांडारकर यांचा १७८ वा जन्मदिन ६ जुलै रोजी संपन्न झाला. त्यांनीच स्थापन केलेली तुकाराम सोसायटी पंधरा वर्षे कार्यरत राहून १९१५ मध्ये विसर्जित करण्यात आली. त्या गोष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाली. मराठी जीवन, मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य या तीनही क्षेत्रांमध्ये तुकोबांचे स्थान उच्चस्थानी असून अढळ आहे. ते त्यांचे अभंग आणि त्यांची गाथा मराठी चर्चाविश्वाचे आणि मराठी मनोविश्वाचेही अविभाज्य भाग बनले आहेत.
ग्यानबा तुकारामाचा जागर आपण शेकडो वर्षे करीत आहोत आणि वारकरी संप्रदायामुळे संत तुकाराम घराघरांत पोहोचले आहेत; परंतु तुकोबांचा आवाज, त्यांचा उदारमतवाद शहरी अभिजन वर्गामध्ये पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. भांडारकर आणि त्यांचे सहकारी रा. ब. मराठे, प्रो. वा. ब. पटवर्धन, प्रो. गणेश हरी केळकर यांना व त्यांनी स्थापन केलेल्या तुकाराम सोसायटीलाच द्यावे लागेल.
डॉ. भांडारकर यांच्या धुरीणत्वाखाली प्रार्थना समाजाच्या साथीने  १९०१ साली तुकाराम सोसायटी- तुकाराम चर्चा मंडळाची स्थापना पुणे येथे  झाली. डॉ. भांडारकर हे थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृतचे प्रकांडपंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक म्हणून आपणा सर्वाना परिचित आहेत. त्याचप्रमाणे  त्यांच्या मुंबईतील शिक्षणाने व परमहंस सभा आणि प्रार्थना समाज यांच्या प्रभावाने त्यांची कर्ते धर्मसुधारक आणि समाजसुधारक ही ओळखही महत्त्वाची आहे.
तुकाराम महाराज हे आद्य धर्मसुधारक गणले गेले पाहिजेत. त्यांनी पारंपरिक धर्माची मूलभूत चिकित्सा करून यज्ञयागादी, तपतीर्थाटने मनुष्य जातीस उपयोगी नसून ‘जे का रंजले गांजले’ यांच्या सेवेतच धर्म आहे, असे सांगितले. त्यांची ही तळमळ आणि उदारमतवाद त्या काळच्या समाजसुधारकांच्या मनास भावला. आपल्यातील दोषांचे सूक्ष्मतेने निरीक्षण करून त्या सुधारणेचे मार्ग तुकोबांनी सांगितले. त्याचे निरूपण आणि प्रसारण तुकाराम सोसायटीने केले. युरोपातील वर्डस्वर्थ व ब्राऊनिंग सोसायटीपासून प्रेरणा घेऊन डॉ. भांडारकरांनी ही सोसायटी स्थापन केली.
केवळ तुकोबांच्या अभंगांची चर्चा करण्यासाठी या मंडळाची सभा दर शुक्रवारी होत असे. साधारणत: दीड-दोन तासांमध्ये तीन ते सहा अभंगांची चर्चा होत असे. दहा ते पंधरा विद्वान, प्राध्यापक जमून तुकोबांचे अभंग, त्यामागची त्यांची भूमिका, त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ आणि त्याचा आजचा संदर्भ याचा सखोल खल होत असे. या चर्चेचा तपशील भांडारकरांच्या सल्ल्याने व अनुमतीने निश्चित करीत असत. या सभेला तरुण अभ्यासक प्रा. ग. ह. केळकर हेही उपस्थित असत. ही टिपणे पुढे दैनिक ‘ज्ञानप्रकाश’मध्ये व बरीच वर्षे अधूनमधून ‘सुबोध पत्रिका’मध्ये प्रसिद्ध होत असत. ही टिपणे पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचा प्रा. पटवर्धनांनी बराच प्रयत्न केला, परंतु ते करणे त्यांना जमले नाही. त्यांच्या पश्चात ती कार्यसिद्धी प्रा. ग. ह. केळकर यांनी पूर्णत्वास नेली.  १९१५ च्या सुमारास वार्धक्यामुळे डॉ. भांडारकरांना दर शुक्रवारच्या सभेस उपस्थित राहणे अशक्य होऊ लागले. परिणामत: चर्चासभांचे काम बंद पडले. तोपर्यंत १८०० अभंगांची चर्चा होऊन त्यांची टिपणे तयार झाली होती.
पुढे  १९२७ च्या सुमारास प्रा. केळकर यांच्या प्रयत्नांनी आणि डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीच्या मदतीने या टिपणांवरून ग्रंथनिर्मिती झाली. या खंडामध्ये केवळ ७५० अभंगांचा समावेश आहे. तुकाराम चर्चा मंडळाने पंधरा वर्षे सातत्याने अभ्यास करून ठेवलेल्या १८०० अभंगांपैकी केवळ ७५० अभंगांच्या टिपणांचेच प्रकाशन झाले आहे. उर्वरित १०५० अभंगांचे इतिवृत्त तयार असूनही ते प्रसिद्ध होऊ शकले नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे.
या शताब्दी वर्षांमध्ये तुकाराम सोसायटीने केलेल्या कष्टाचे फलित म्हणून हे १०५० अभंग प्रकाशित करण्याचे प्रयत्न व्हावेत, ही सदिच्छा! आणि तीच डॉ. भांडारकर, तुकाराम सोसायटी आणि संत तुकाराम महाराज यांच्या उदारमतवाद या त्रिवेणी धारेस वाहिलेली प्रार्थना होईल.
सुरेश पिंगळे, पुणे

जगाला हिटलर नव्हे, गांधीजींचीच अधिक गरज
‘आता आपल्याकडे हिटलरच हवा’ या मथळ्याचे पत्र व त्यावरील प्रतिक्रिया (लोकमानस, ६ व ८ जुलै) वाचली. भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील मुख्य प्रवाह हा गांधीजींच्या नेतृत्वाखालील होता. या प्रवाहाचा हिटलरच्या कारस्थानी, िहसक वृत्तीला पूर्ण विरोध होता. क्रांतिकारक विचारसरणी असणाऱ्यांनाही हिटलर हा त्याज्यच होता. राहिला मुद्दा िहदू महासभा आणि रा.स्व. संघाच्या विचारसरणीतील हिटलरला मानणारा वर्ग. यांचा स्वातंत्र्यलढय़ाशी प्रत्यक्ष संबंध नव्हता असे म्हटले तरी चालेल. गंमत अशी की आज त्यांच्याच विचारसरणीचे शासन असताना सामान्यांवर विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्प लादले जाणे ही एक प्रकारे हिटलरशाहीच म्हणावी लागेल.
गांधीजींना अपेक्षित असलेला भारत हा भ्रष्टाचारमुक्त होता, परंतु हिटलर राजवट ही भ्रष्टाचारमुक्त होती असा समज आधीच्या पत्रात दिसतो. ऑस्ट्रियात भणंग अवस्थेत तारुण्य घालवलेल्या हिटलरने जर्मनीची सत्ता मिळवल्यानंतर त्याने मिळवलेली अमाप संपत्ती, बांधलेले अनेक प्रासाद आणि पुरलेले सोने आणि इतर संपत्तीचा शोध अजूनही होत आहे. हिटलरची विलासी राहणी आणि बळाचा वापर करून केलेली अमाप लूट सर्वज्ञात आहे. इतकेच नव्हे क्रूरतेच्या सर्व पातळ्या हिटलरने गाठल्या होत्या. विरोधकांचे शिरकाण , संसद जाळून त्याचे खापर विरोधकांवर फोडणे अशा हिटलरशाहीच्या दुष्कृत्यांची आवृत्ती व्यापमं घोटाळ्याच्या निमित्ताने आज दिसत आहेतच. त्यामुळे प्रत्यक्ष हिटलर अवतरला तर काय होईल याची कल्पना आता आपल्याकडे हिटलरच हवा असा आग्रह धरणाऱ्यांनी करावी. आज जगाला हिटलरची नव्हे, तर गांधीजींच्या विचारांची गरज आहे.
रवींद्र रा. पेडणेकर, दादर (मुंबई)

Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

जातस्य हि ध्रुवो मृत्यु:
सारंग यांचे पत्र (लोकमानस, ७ जुलै) वाचले. ते लिहितात, ‘जीवनातील असुरक्षितता, गूढता आणि मृत्युभय यांपासून सुटकेची आशा धर्मामुळे टिकून राहाते. याची पूर्तता विज्ञान आणि विवेकवाद यांनी शक्य नाही हे उघड आहे. खरे तर हे उघड उघड असत्य आहे. वरील गोष्टींतून सुटका केवळ विवेकवादाने शक्य आहे. ‘जातस्य हि ध्रुवो मृत्यु:।’ याची जाणीव प्रत्येक सज्ञानी व्यक्तीला असते. म्हणून, ‘विवेकी व्यक्तीस मृत्युभय। अनावश्यक अशोभनीय। मरणीं भीतीदायक काय। घटना ही नसíगक?’ तसेच, ‘वेदकाळीं वदले चार्वाक। मरणी गूढ न काहीं एक। जीवनीं भोगावे सुख। आनंदाने मनुजाने?’
इथे धर्माचा आधार घेणे म्हणजे अमर आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष असल्या भ्रामक कल्पनांच्या आहारी जाणे. मग मृत नातेवाईकाचा अतृप्त आत्मा, त्यासाठी पिंडदान, काकस्पर्श, बारावे, तेरावे, श्राद्ध अशा निर्थक कर्मकांडांच्या चक्रात सापडणे आणि वेळ-ऊर्जा-पसा व्यर्थ खर्च करणे. यांतून सुटका हवी असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद यांचा अंगीकार श्रेयस्कर ठरतो. म्हणून, ‘वृथा भीती मरणाची। काढून टाकावी अंतरीची। अंतिम घटना आयुष्याची। कांही नाही तदनंतर॥ जाणणे हे आवश्यक। मानवप्रजातीं जन्म एक। लाभला, गेला निर्थक। ऐसे होईल अन्यथा॥’
– प्रा. य. ना. वालावलकर