महत्त्वाच्या पुरस्काराचे नियम नीट नकोत? हे श्रीकांत उमरीकर यांचे भरूरतन दमाणी पुरस्काराविषयीचे पत्र नक्कीच पटणारे आहे. (८ डिसेंबर) झिम्मा आणि अंतर्वेध या पुस्तकांना जाहीर झालेले पुरस्कार हे स्पध्रेचा समानतेच्या संधीला निश्चित बगल देणारे वाटतात. पुस्तक काढणे, ते गाजवणे, ते खपवणे, त्याला मानमरातब मिळवून देण्यासाठी व्यावसायिक चलाखी करणे ही आपली ग्रंथव्यवहाराची आता सर्वमान्य पद्धत झाली आहे.
एखादे सर्वसाधारण पुस्तक समीक्षकाकडून चांगले अभिप्राय मिळवून गाजवणे हा सांस्कृतिक भ्रष्टाचारच आहे. एक लेखक आमच्याच गावातले, मोठय़ा सरकारी पदावरचे, राजदरबारात सत्ता असलेले, त्यांनी काही पुस्तके लिहिली. काही चांगली, काही सामान्य होती, पण सरकारी ग्रंथालयात ही पुस्तके उचलली जातील ही शक्यता लक्षात घेऊन त्यांची वारेमाप पुस्तके निघाली, आणि म्हणतात हा लेखक महानायक झाला.
सर्वसामान्य वाचक हा अभिरुचिसंपन्न नसतो, अशा वेळी समीक्षक, आणि तज्ज्ञांनी अधिक जबाबदारीने वागून सामान्य साहित्याची भलावण करणे थांबवले पाहिजे, अशाने आपण एक वाट चुकलेली, गोंधळलेली नवी वाचकांची पिढी तयार करतो याचे भान त्यांनी ठेवायला हवे. साहित्यातील अभिजातता अबाधित ठेवून ती वाचकांपर्यंत पोहचवणे या व्यवहारातही आपण भ्रष्टाचार केला तर आपल्याला साहित्यातील नोबेल कसे मिळणार?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा