‘बेस्ट’ वीजदरात पुन्हा वाढ करायचा विचार करीत आहे, ही बातमी (लोकसत्ता, २७ जुलै) वाचून धक्काच बसला. मुंबईच्या कुलाबा ते माहीम भागातील रहिवाशांच्या वीजबिलांत गेल्या काही महिन्यांत विजेच्या बिलात भयंकर वाढ झालेली दिसून आली असेल. ज्यांना साधारण ८०० ते १००० रुपये बिल येत होते त्यांना आता १८०० ते २००० रुपये बिल येत आहे. आश्चर्य म्हणजे यावर ना कुणी तक्रार केली आहे ना काही पत्रव्यवहार. मी दोनदा बेस्टला पत्र पाठवल्यावर त्यांचा माणूस येऊन भेटला एकदा आणि म्हणाला तुम्ही बिल नीट तपासून पाहत नाही असे दिसते. त्यांनी बिलातला प.वि.तू.व.आकार आणि इंधन समायोजन आकार या दोन आकारांकडे माझे लक्ष वेधले.
मी विजेच्या दराची तुलना करण्यासाठी २००७ सालच्या एका बिलाबरोबर नवीन बिल तपासले. २००७ साली ५१६ युनिटसाठी ११७७ रुपये भरले होते आणि आता मात्र ४१६ युनिटसाठी बिल आहे २८४८ रुपये. गुणोत्तर काढले तर ४१६ युनिटचे बिल ९४८ यावयास हवे पण ते आहे त्याच्या तिप्पट. पाच वर्षांत एवढा जास्त आकार?
बेस्ट जो प.वि.तू.व.आकार लावत आहे तो परिवहन विभागाची तूट भरून येण्यासाठी आहे. परिवहन विभाग बसेस अख्या मुंबईभर, मुलुंड-दहिसरच नव्हे तर वाशीपासून ठाण्यापर्यंत फिरवत असताना फक्त माहीमपर्यंतच्या ग्राहकांनी का हा तोटा सहन करायचा? एखादा ग्राहक (असे बरेचजण असतील म्हणा) जर बसने प्रवास करत नसेल तरीही त्यांनी का हा कर भरायचा?
मग काही परिचितांकडे बिलवाढीबद्दल चौकशी केली. बऱ्याच जणांना आपलीच काही चूक आहे असे वाटून स्वत:च्या घरी विजेच्या वापरावर र्निबध घातले आहेत. काही जणांना आपल्या मीटरमधून चोरी तर होत नाही ना याची काळजी वाटते आहे. फारच कमी लोकांनी बेस्टकडे तक्रार केली आणि ‘बेस्ट’चे धोरणच चुकीचे असल्याने त्याचा फटका आपल्याला बसतो आहे, हे तर त्याहूनही कमी जणांना लक्षात येते आहे.
मुंबई ग्राहक पंचायत आणि ग्राहकांच्या हितासाठी काम करणाऱ्या तमाम संस्थांनी बेस्टकडून ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यासाठी हे पत्र!
वीज दरवाढ ‘बेस्ट’च्या चुकीच्या धोरणामुळेच
‘बेस्ट’ वीजदरात पुन्हा वाढ करायचा विचार करीत आहे, ही बातमी (लोकसत्ता, २७ जुलै) वाचून धक्काच बसला. मुंबईच्या कुलाबा ते माहीम भागातील रहिवाशांच्या वीजबिलांत गेल्या काही महिन्यांत विजेच्या बिलात भयंकर वाढ झालेली दिसून आली असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-12-2012 at 04:06 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letters to editor hike in electricity charges