बिहारनंतर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाबात बिगरभाजपवादी पक्षांच्या सहकार्याचे राजकारण सुरू झाले असले, तरी त्याला अंगभूत मर्यादा आहेत आणि दुसरीकडे बिगरकाँग्रेसवादही संपलेला नाहीच..
बिगरभाजपवादाची (यापुढे ‘गैरभाजपवाद’) व्यूहरचना आखण्यामध्ये राज्यांचे राजकारण सध्या गुंतले आहे. गरभाजपवादाचा मध्यवर्ती घटक हिंदुत्व विरोध हा आहे. या विरोधाचे रसायन अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच व संघराज्यापुढील आव्हाने म्हणून सध्या घडविले जात आहे. उदा. विविध राज्यांतील राज्यपालांच्या हस्तक्षेपावर प्रश्नचिन्हे उभी केली जात आहेत. अशा नानाविध घटनांतून गरभाजपवाद हा विविध सामाजिक गटांचा समझोता म्हणून राजकारणात पुढे येत आहे. म्हणजेच, मतांची बेरीज करण्याचे आघाडीवाचक नवीन गणिती सूत्र त्यास म्हणता येईल. या सूत्राआधारे परस्परविरोधी विचारप्रणालीच्या पक्षांची तळागाळात आघाडी घडविली जाते. नितीशकुमार तर अकाली दल, शिवसेना वा तेलुगू देसमनेही गरभाजपवादामध्ये सहभागीदार व्हावे, अशी व्यापक भूमिका घेत आहेत. अशा प्रकारची आघाडी बिहारच्या निवडणुकीमधून पुढे आली. तिचे नेतृत्व अर्थातच नितीशकुमार यांच्याकडे गेले. परंतु या गरभाजपवादी राजकारणास मर्यादादेखील आहेत. त्यापकी सर्वात गुंतागुंतीच्या मर्यादा म्हणजे गरभाजपवादांतर्गत तीव्र मतभिन्नता, अस्मिता व राजकीय स्पर्धा या आहेत. यामुळे भाजपविरोधातील शक्तिशाली लाट उभी राहण्याला अंगभूत मर्यादा पडते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा