डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जाती निर्मूलन(Annihilation of castes)’ हे पुस्तक लिहिले त्याला ७५ वर्षे होऊन गेली. परंतु जाती नष्ट करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले.‘शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा!’ (लोकसत्ता- १७ जानेवारी) हा प्रकाश आंबेडकर यांचा विचार ते स्वप्न कृतीत उतरविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरावे. खरोखरच जातींचा उपयोग आणि शब्दप्रयोग आपण जेवढा कमी करू तेवढय़ा लवकर जाती नष्ट होतील.
लोकसभा व विधानसभेतील जातीवर आधारलेले आरक्षण रद्द झाले पाहिजे ही प्रकाश आंबेडकर यांची मागणी अत्यंत योग्य आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचाराशी सुसंगत आहे. राजकीय आरक्षण म्हणजे गुलामगिरीची पदास हे लक्षात आल्यावर ते तात्काळ संपुष्टात यावे असा आग्रह खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच धरला होता. बाबासाहेबांच्या आग्रहानंतर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाने राजकीय आरक्षणाविरुद्ध संसदेवर मोर्चा नेला होता आणि दलित पँथरने २५ डिसेंबर १९७४ रोजी या आरक्षित खुर्चीची प्रतिमात्मक होळी अहमदाबाद येथे केली होती.
राजकीय आरक्षण चालू ठेवा अशी मागणी कोणीही करीत नसताना ही तरतूद राजकीय नेते पुन्हा पुन्हा वाढवत आहेत. अनुसूचित जमातींचा घटनेत उल्लेख आहे. तरी त्यांचे राजकीय आरक्षण नष्ट करावे ही मागणी होत असताना ज्या ओबीसींचा घटनेत उल्लेख ही नाही त्यांना लोकसभेत, विधानसभेत आरक्षण द्यावे अशी अनुचित मागणीही काही जातीयवादी नेते करीत आहेत. ओबीसी (Other Backward Classes)या शब्दाचा अर्थ इतर मागास वर्ग असा असताना काही जातीयवादी नेते तो इतर मागास जाती (Other Backward Castes) असा करीत आहेत.
महापालिकांमध्ये जातीनिहाय राखीव असलेल्या जागी निवडून आलेल्या नगरसेवकांनी दिलेले जातीचे दाखले खोटे निघाल्यावर जात पडताळणी समितीने त्यांना अपात्र ठरवण्याची अनेक उदाहरणे आजवर घडली आहेत. जातीचे खोटे दाखले देऊन निवडून येणारे लोकप्रतिनिधी जनतेची कामे करतील की स्वत:ची मालमत्ता वाढविण्याचा काम करतील याचा जनतेनेच विचार करावा.
दाखल्यावरील जातीच उल्लेख काढला तर काय करावे, हा प्रश्न विचार करून आणि टप्प्याटप्प्याने सोडविता येईल.सुरुवाताला सर्व ठिकाणाचा जातीय उल्लेख एकदम नष्ट करु नये. तो हळूहळू कमी करावा. आíथक क्षमतेवर आरक्षणाला हळूहळू सुरुवात करावी. सुरुवातीला जे श्रीमंत, सुशिक्षित, पुढारलेले लोक केवळ जातीच्या आधारावर आरक्षण मिळवतात त्यांचेच आरक्षण फक्त रद्द करावे; परंतु गरिबांच्या मुलांचे आरक्षण (पालकांचे व्यवसाय व प्राप्ती तपासून) चालू ठेवावे. म्हणजेच जातीच्या आरक्षणास पात्र असणारा विद्यार्थी खरोखरच मागासलेल्या पालकांच पाल्य आहे का ते तपासावे.
दुसरे म्हणजे शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा १०० टक्के मुलांच्या बाबतीत अमलात आणावा आणि कोणीही विद्यार्थी आíथक कारणाने त्याच्या आवडीच्या आणि क्षमतेच्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची शासनाने जबाबदारी घ्यावी.
प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यांच्या मुलांबाबत जात हद्दपार करण्याचा कायदा त्वरित अमलात आणावा. आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्याला शासनाने अधिक सवलती द्याव्यात. त्यांना ५० टक्के किमतीत घर द्यावे. प्रकाश आंबेडकर यांचा विचार खरोखरच क्रांतिकारक आहे आणि त्यावर जनतेमध्ये चर्चा, संवाद होणे राष्ट्रहितकारक ठरेल.
प्रकाश आंबेडकर यांचा क्रांतिकारक विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जाती निर्मूलन(Annihilation of castes)’ हे पुस्तक लिहिले त्याला ७५ वर्षे होऊन गेली. परंतु जाती नष्ट करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले.‘शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा!’ (लोकसत्ता- १७ जानेवारी) हा प्रकाश आंबेडकर यांचा विचार ते स्वप्न कृतीत उतरविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरावे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-01-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanas revolutionary thought of prakash ambedkar