अत्यंत जाचक अशी जातिव्यवस्था आणि इतर अनिष्ट रूढी यांस कंटाळून बाबासाहेब आंबेडकरांनी िहदू धर्माचा त्याग केला त्याला ६० वष्रे झाली. या एवढय़ा मोठय़ा घटनेनंतर िहदू समाजातील बुजुर्ग मंडळी खडबडून जागी व्हायला हवी होती. पण प्रत्यक्षात काय झाले? बदल झालाच असल्यास तो उलटय़ा दिशेने होतोय, असे स्पष्ट चित्र दिसते आहे. २३ सप्टेंबरच्या ‘लोकसत्ता’मधील दोन वृत्ते या दृष्टीने खिन्न करणारी आहेत. एक आहे ‘तात्त्विक’ पातळीवरील तर दुसरे व्यावहारिक. अवधूत परळकर यांचे पत्र गौरी विसर्जनाच्या मिरवणुका संपूर्ण टिळक पूल अडवून चालल्या असताना पोलीस कसे फक्त बघ्याची भूमिका पार पाडीत होते याबद्दल आहे. ही झाली व्यावहारिक बाजू. लोकांची कितीही गरसोय झाली तरी त्याची पर्वा नाही, कारण आम्ही िहदू आहोत आणि म्हणून अशा मिरवणुका काढण्याचा आम्हांस हक्कआहे, ही अरेरावी आणि त्यास सरकारची मूक संमती. पण या वृत्तीस आता ‘तात्त्विक’ अधिष्ठान मिळायला लागलेले आहे ही गोष्ट अधिकच चिंताजनक आहे. कलबुर्गी िहदू देव-देवतांबद्दल काय बोलले हे मला माहीत नाही. तथापि ‘सनातन’चे अभय वर्तक यांचे विधान (िहदू देवतांची बदनामी केली म्हणून जर कोणी एखाद्याची हत्या केली तर िहदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा केला जातो) आणि त्यातून स्पष्टपणे केलेले हत्येचे ‘तात्त्विक’ समर्थन उद्वेगजनक आहे. िहदू समाजाने वेळीच अशा िहस्र प्रवृत्तींना आळा घातला नाही तर वेळ टळून गेलेली असेल. एक िहदू म्हणून मी या अशा प्रवृत्तींचा निषेध करतो..तेवढे मी (अजून तरी) करू शकतो.
– रविकिरण फडके, भांडुप (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा