सुखदेव थोरात यांचा ‘दलितांचे राजकारण : ऐक्य अपरिहार्य’ हा लेख (१४ डिसें.) वाचला. वंचितांची स्थिती बदलण्याचा मार्ग कोणता, याचे उत्तर राजकारणात शोधावे लागेल. सध्या फक्त राजकारणच बदल आणू शकते, समाजकारण किंवा अर्थकारण नाही. असे मत योग्य असले तरी तथागत बुद्धांनी राजसत्तेचा त्याग करून समाजबदल घडविलेला आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. महात्मा जोतीराव फुले यांनीही सत्तेशिवाय सामाजिक बदल घडवून दाखविलेला आहे. राजकारणातूनच जर वंचितांची स्थिती बदलू शकते असे आपण मानले तर मायावती यांच्याकडे उत्तर प्रदेशची पाच वर्षे सत्ता होती. तिथे वंचितांची स्थिती बदललेली दिसत नाही. समजा दलित पक्ष, गट-तट एकत्र आले आणि सत्तेतही बसले तरी वंचितांच्या हितासाठी ते काही तरी करतील याची शाश्वती काय? समजा. आता, संघपरिवाराने आपल्या आन्हिकात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमा पूजनाचा समावेश केल्याने जसा संघ आंबेडकरवादी ठरत नाही, तसंच संघाच्या व्यासपीठावर गेलेला एखादा आंबेडकरवादी तेवढय़ावरून संघवादी ठरत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा