‘फायटोप्लॅटनने जुहूचा समुद्रकिनारा निळाभोर’ ही बातमी (२१ जाने.) वाचली. हा नवीन प्रकार नसून आपल्याकडे यावर फार संशोधन झाले आहे. मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. प यांनी या विषयावर पीएच.डी. केली आहे. Vibrio harveyi हा जिवाणूचा प्रकार आहे. तो आपल्याकडील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर सापडतो. रत्नागिरीमध्ये शिकत असताना आम्ही अनेकदा रात्री हा प्रकार पाहायला जात असू. कोळंबी संवर्धन करणाऱ्यांसाठी हा जिवाणू अपायकारक असून अन्य सागरी जीवांना त्याचा फारसा धोका नसतो.
– मुरारी भालेकर
दिलखुलास मुलाखत
‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिनप्रसंगी ‘खुर्चीपलीकडचे मुख्यमंत्री’ या कार्यक्रमात घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत खरोखर अप्रतिम होती. एक उत्तम निर्मिती पाहायला मिळाली. जितेंद्र जोशी यांनी एखाद्या कसलेल्या पत्रकार किंवा मुलाखतकाराप्रमाणे कार्यक्रमात जान आणली. आपले मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असोत, पण एक जमिनीवर पाय असलेला माणूस मुख्यमंत्री आहे याचा आनंद आणि समाधान वाटलं.
तरुण वर्गात फडणवीस यांची बरीच क्रेझ आहे. प्रत्येक तरुणाने आदर्श ठेवावा असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आज माध्यमे आक्रमक नसून आक्रस्ताळी बनली आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘खुर्चीपलीकडचे मुख्यमंत्री’ पाहून मन खूश झाले. काही तरी सकारात्मक ऐकल्याचे समाधान वाटले.
– आदित्य बोकारे, नागपूर
‘फायटोप्लॅटन’वर भरपूर संशोधन
लोकसत्ता’च्या वर्धापन दिनप्रसंगी ‘खुर्चीपलीकडचे मुख्यमंत्री’ या कार्यक्रमात घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत खरोखर अप्रतिम होती.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-01-2016 at 03:22 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers letters