‘पितृसत्तेमुळेच स्त्रीवर अन्याय’ हा लेख (११ जुलै) वाचला. मुळात आजच्या जगात स्त्रियांवर अन्याय कसे होतात किंवा कसे झाले, यावर चर्चा करण्यापेक्षा या पुरुषी मानसिकतेमध्ये बदल कसा करता येईल, याबद्दल विचार करणे गरजेचे आहे. यासाठी वेळ लागेल, परंतु कोणत्याही गोष्टीची सुरुवात महत्त्वाची. आजच्या पिढीने मुलींना बंधने घालणे आणि मुलांना मनमानी करू देणे हे चालू न देता त्यांना मुलगा-मुलगी हे समान आहेत, हे शिकवणे गरजेचे आहे. त्याची काही प्रमाणात सुरुवात झाली आहे खरी, परंतु अजूनही घरोघरी पितृसत्ता दिसून येते. स्त्री हादेखील महत्त्वाचा घटक आहे, फक्त घरातीलच नाही तर समाजातीलसुद्धा. मुलांना ‘मुलगे रडत नसतात’ हे शिकवण्यापेक्षा ‘मुलगे रडवत नसतात’ हे शिकवणे आताच्या काळाची गरज आहे. ज्याची सुरुवात आतापासून केली, तर कदाचित काही वर्षांनंतर स्त्रियांचा इतिहास वेगळा असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा