‘२१ मार्च : विषुव दिनाची विसंगती’ या शीर्षकाचे पत्र (लोकमानस : १९ मार्च ) वाचले. त्या संदर्भातील स्पष्टीकरण.

२१ मार्च (किंवा २३ सप्टेंबर) या विषुवदिनी पृथ्वीवर सर्वत्र समसमान दिवस व रात्र असते, तसेच या दिवशी सर्वत्र सूर्योदय व सूर्यास्त अनुक्रमे सकाळी व संध्याकाळी सहा वाजता होतो असे सामान्यत: मानले जाते. याबाबत भौगोलिक वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे-

betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Surya nakshatra parivartan 2024
३० सप्टेंबरपासून पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
Guru nakshatra gochar 2024 Jupiter's Nakshatra transformation
२८ नोव्हेंबरपासून पडणार पैशांचा पाऊस; गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
rahu transit in shani nakshatra uttarabhadra
राहू देणार बक्कळ पैसा; शनीच्या नक्षत्रात प्रवेश करताच ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान
Shukra Nakshatra Gochar 2024
Shukra Nakshatra Gochar : शुक्र करणार या नक्षत्रात गोचर, १३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ
Rahu Gochar 2024 Rahu's nakshatra transformation
भरपूर पैसा कमावणार; राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती होणार मालामाल
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज

पृथ्वीच्या परिवलनाचा अक्ष तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाच्या संदर्भात सुमारे २३.५ अंशाने झुकलेला आहे. त्यामुळे तिचा उत्तर वा दक्षिण गोलार्ध सूर्याकडे कमीअधिक झुकलेला राहतो. यामुळे पृथ्वीवरील दिवस व रात्री लहान वा मोठय़ा होतात व ऋतू उद्भवतात. पण वर्षांतून दोनदा (मार्च व सप्टेंबर महिन्यात) अशी स्थिती येते की, पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे झुकलेला नसतो. ही अवस्था म्हणजे संपात दिन. मार्च महिन्यात ही अवस्था (वसंत संपात) २१ मार्च रोजी येते, असे सामान्यत: मानले जाते. त्यालाच विषुव दिन म्हणतात. पण प्रत्यक्षात दरवर्षी वसंत संपात २१ मार्चलाच होईल असे नाही. तो १९, २० किंवा २१ मार्च रोजी येतो. यापूर्वी २००७ मध्ये वसंत संपात २१ मार्चला आला होता. यावर्षीचा (२०१६) वसंत संपात २० मार्च रोजी आहे.

दुसरे असे की, ही संपात अवस्था अवकाशात कोणत्याही तारखेला घडून आली तरी तिचा व्यवहारातील प्रत्यय (म्हणजे समसमान दिवस-रात्र) विषुववृत्त सोडून, पृथ्वीवर सर्वत्र त्याच दिवशी येईल असे नसते. कारण ते त्या ठिकाणाच्या स्थानावर (विशेषत: अक्षवृत्तावर) अवलंबून असते. अक्षवृत्तीय स्थानानुसार हा फरक काही आठवडय़ांचाही असू शकतो. अक्षवृत्तीय स्थानानुसार विषुव दिन (समसमान दिवस रात्र असणारा दिवस) कसा बदलतो, हे सोबतच्या तक्त्यातील काही उदाहरणांवरून लक्षात येईल.

आता दुसऱ्या विसंगतीसंबंधी :  मुंबई शहराचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्थान पुढीलप्रमाणे आहे : १८.५८.३० अंश उत्तर अक्षवृत्त आणि ७२.४९.३३ अंश पूर्व रेखावृत्त. यावरून भारतीय प्रमाण वेळ आणि मुंबईची स्थानिक वेळ यातील फरक काढता येईल. पण कुठल्याही ठिकाणी सूर्योदय वा सूर्यास्ताच्या वेळेसंदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सूर्योदयाची वेळ म्हणजे सूर्यिबबाची वरची कडा पूर्व क्षितिजाला टेकण्याची वेळ, तर सूर्यास्ताची वेळ म्हणजे सूर्यिबबाची खालची कडा पश्चिम क्षितिजाला टेकण्याची वेळ होय. एकदा क्षितिजाला स्पर्श केल्यानंतर पूर्ण सूर्यिबब वर येण्यास किंवा खाली जाण्यास लागणारा कालावधी कित्येक मिनिटांचा असतो. यामुळे सूर्यिबबाचा स्पर्श, मध्य वा अखेरचा िबदू यापकी कोणता िबदू उदय वा अस्ताचा मानला गेला आहे, यानुसार सूर्योदय वा सूर्यास्ताच्या वेळेत काही मिनिटांचा फरक पडू शकतो. तसेच पृथ्वीचा परिवलन काळ स्थूलपणे २४ तास असे म्हटले जात असले तरी, प्रत्यक्षात तो २३ तास, ५६ मिनिटे, ४ सेकंदांचा आहे. दिवस-रात्रीचा अचूक काळ ठरवताना हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो.

आणखी एक मुद्दा. एखाद्या ठिकाणच्या भौगोलिक घटनेच्या संदर्भात त्या ठिकाणाचे अक्षांश वा रेखांश किती महत्त्वाचे असतात, हे वरील विवेचनावरून स्पष्ट झाले असेल. अर्थातच एखाद्या पंचांगात एखाद्या ठिकाणाचे अक्षांश वा रेखांश किती मानले (वा गणिताने ठरवले आहे) यानुसार संबंधित घटनेची तिथी वा वेळ यात फरक पडू शकतो.

एल. के. कुलकर्णी, नांदेड.      

संस्कृतिसंवादात या मुद्दय़ांना हेतुत: बगल

‘टोळी संस्कृतीकडून मानवी संस्कृतीकडे’ या ‘संस्कृतिसंवाद’ सदरातील लेखात (१५ मार्च) शेषराव मोरे जाणूनबुजून, हेतुपुरस्सर काही मुद्दय़ांना आणि तथ्यांना दुर्लक्षित करतात किंवा बगल देतात.

लेखाच्या सुरुवातीला भटक्या जीवनातून स्थिर जीवनाकडे झालेले स्थित्यंतर अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने दोन ओळींत मांडतात. शेतीमुळे भटक्या जीवनास स्थिरता लाभली आणि जीवनपद्धतीत आलेल्या स्थर्यामुळे संस्कृतीचा विकास झाला. या ठिकाणी उत्पादन पद्धतीच्या बदलांकडे ते दुर्लक्ष करतात आणि सरधोपट मांडणी करतात.

पुढे ते म्हणतात, दुसऱ्या भटक्या टोळीत जाणाऱ्या विवाहित सदस्यांची कायमची ताटातूट होऊ नये म्हणून आंतरटोळीय विवाह होत नसत. मात्र प्राचीन टोळी समाजात ‘प्रत्येक सदस्य हा उत्पादन पद्धतीत सक्रिय भाग घेत असल्याने टोळीचे संख्याबळ कमी होऊ नये, श्रमशक्ती कमी होऊ नये म्हणून आंतरटोळीय विवाह होत नसत’ या गोष्टीलादेखील ते बगल देतात.

गो. स. घुय्रे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देऊन ते जातिव्यवस्था सर्वव्यापी होती असे भासवण्याचा प्रयत्न करून ब्राह्मणी जातिव्यवस्थेला, तिच्या निर्मिकांना, तिच्या मूलभूत पायाला निरागस रूप देण्याचा खटाटोप ते करताना दिसतात. सगळे काही समान िहदू समाजात होतेच; ‘फक्त’ अस्पृश्य वर्ग वेगळा होता अशा थाटात शेषराव मोरे हे, ब्राह्मणी जातिव्यवस्थेच्या प्रश्नाचा चुटकीसरशी निकाल लावतात (दुसऱ्यांच्या दोषाकडे बोट दाखवून स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्यासारखा हा प्रकार वाटतो.). मात्र पुन्हा पुढे ते असेही म्हणतात की, जातिव्यवस्था कशी निर्माण झाली आणि अद्याप नष्ट का होत नाही हा अभ्यासाचा विषय बनला आहे.

सर्वात उच्चांक म्हणजे ते म्हणतात, ‘जातिव्यवस्था असूनही भारत हे राष्ट्र कसे बनले? या देशात एकसंधतेचे सामथ्र्य आले कोठून?’ याला शेषराव मोरे ‘आश्चर्य आणि अभ्यासाचा विषय’ संबोधतात. देशाला त्यातील विविध वेगवेगळ्या घटकांना एकसंध बांधून ठेवून उभे करण्यात आणि ती एकसंधता टिकवून ठेवण्यात राज्यघटनेची काही भूमिका आहे, असे मोरेंना वाटत नसावे.

इस्लामचे संदर्भ देऊन आणि ख्रिश्चन धर्माचेही बहुतेक सारे असेच, एवढे सांगून या धर्मामुळे टोळीसमाज एकसंध कसा झाला याचे स्पष्टीकरण ते देतात; मात्र या दोन्हींच्या शेकडो वष्रे आधी बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान आणि शिकवणुकीतून समाजाच्या एकसंधतेचे जे प्रयत्न याच देशात झाले त्याकडेही ते दुर्लक्ष करतात. बौद्ध धर्मास ते ‘पंथ’ मानतात हे सर्वज्ञात आहे; कदाचित त्यामुळेच त्यांनी असे केले असावे.

‘टोळी आणि टोळीप्रेम यांची उन्नत अवस्था म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रप्रेम होय,’ असे ते म्हणतात ते मात्र पटले.

स्वप्नाली चव्हाण, पुणे.

वाजपेयी तंटा सोडविणारे..

‘बेदिलीचे बादल’ हे संपादकीय (२१ मार्च) वाचून स्मरण झाले, ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीचे. कावेरी नदीचा तंटा. कर्नाटक, तमिळनाडू व आंध्र या तीन्ही राज्यांत भाजपचे सरकार तर नव्हतेच, पण आवाजही क्षीण असताना पंतप्रधान वाजपेयी यांनी तो तंटा सहज सोडविला. लोकसभेत नेहरू, गांधी घराण्यांतील नेत्यांची शिकवण उद्धृत करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची आठवण देऊन कोणी त्यांचे मौन भंग करील काय?

श्रीकांत महाजन, मुंबई

शाश्वत, सर्वसमावेशक की स्वकेंद्रीच?

नाना पाटेकर यांच्या सातव्या वेतन आयोगाविषयीच्या वक्तव्यावर, ‘यामुळे समाजातील दोन स्तरांत आíथक हक्कांवर वाद निर्माण होत राहील आणि ते भारतासारख्या कृषिप्रधान राष्ट्राच्या हिताचे नाही,’ अशा अर्थाची प्रतिक्रिया (लोकमानस, १७ मार्च) आली आहे, ती भूमिका पटणारी नाही. राष्ट्र घडते ते सर्वसमावेशकतेतून. त्यासाठी प्रत्येक घटकाने हातभार लावणे गरजेचेच आहे. ‘वेतन वाढावे’ हा पगारदारांचा हक्क आहे हे मान्य, परंतु शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, वाढता बीज/ खते/ औषधांचा भाव, वीजतोडणीची नेहमीची भीती, भारनियमन, पाणीकर, व्यापाऱ्यांमार्फत पिळवणूक, नसíगक आपत्ती (गारपीट, अवकाळी पाऊस, कीड प्रादुर्भाव).. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर्ज आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या. एवढय़ा साऱ्या समस्या कृषिप्रधान अर्थव्यवस्थेला ६५ वर्षांनंतर शोभणारे किंवा हिताचे नाही. यापैकी काही समस्या तर शेतकऱ्यांचे ‘आर्थिक हक्क’ वारंवार डावलल्यामुळेच निर्माण झाल्या आहेत.

सरकारी पगारदारांवर जो काही अवाढव्य खर्च (नियोजित खर्च ५.५ लाख कोटी रु.) होतो, तो जर सरकारी नोकरांच्या कर्तव्यांसाठी कारणी लागला असता, तर हक्काच्या भाषेला अर्थ तरी उरला असता. मात्र भ्रष्टाचार (त्यातून गरिबी, बेकारी, पर्यावरणीय दुर्लक्षाने उद्भवणाऱ्या समस्या) अशा पाहिल्यावर, ज्यासाठी यांची नेमणूक करण्यात आली ती कामे तर होतच नाहीत, हे दिसून येते. एकदा का सरकारी नोकरी मिळाली म्हणजे वेतन आयोग व पगारवाढ मिळतच राहणार. त्यापेक्षा कार्यक्षमतेवर आणि कार्यसिद्धतेवर आधारित पगारवाढ का नको? वाढत्या पगारातून निर्माण होणाऱ्या चंगळवादापेक्षा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा कुटुंबांना निकषांवर आधारित आíथक पाठबळ देणे काय वाईट, हा माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील मुलांचा प्रश्न अधिक रास्त ठरतो. विकास शाश्वत-सर्वसमावेशक हवा आहे की फक्त स्वकेंद्रीच, हा प्रश्न येथे महत्त्वाचा आहे.

स्वप्निल अरिवद देशमुख, रा. यरमल, पो. भानसरा, ता. आर्णि, जि. यवतमाळ)

आधी निरोगी हवा द्या, मग स्मार्टवगैरे..

मुंबईच्या देवनार कचरा डेपोची आग पुन्हा भडकल्याचे वृत्त (लोकसत्ता, २१ मार्च) आले.  प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका व राज्य शासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसते आहे. मुंबई, नवी मुंबई स्मार्ट शहर करण्याच्या वल्गना करणाऱ्यांनी अगोदर स्वच्छ व निरोगी हवा नागरिकांना द्यावी. मुंबई शहर व आसपासचा परिसर दिवसेंदिवस धूर  व विषारी वायूचे कोठार बनत असून त्यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. या आगीस जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध संबंधित शासकीय यंत्रणांनी कठोर कारवाई केली, तरच भविष्यात अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेता येईल.

सतीश िशदे, वाशी, नवी मुंबई.

loksatta@expressindia.com