‘धडाडी आणि धोरण’ हे संपादकीय (६ जून) वाचले. ‘हे जगत वस्तूंचा समूह नसून घटनांचा प्रवाह आहे’ हे भगवान बुद्धांचे दार्शनिक पातळीवरील सत्य एकवेळ बाजूला ठेवू या. ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या वैज्ञानिक सिद्धांताचे बारकावेही एकवेळ बाजूला ठेवता येतील. परंतु या जगातील सर्वच भौतिक बाबी, मग त्यात राष्ट्रेही आली, एकमेकांशी संबंधित असून त्यांपैकी एकावर होणारा परिणाम कमी-अधिक प्रमाणात इतरांवर होणारच आणि सर्वानाच एकमेकांची गरज भासणारच, या वस्तुस्थितीकडे कसे काय दुर्लक्ष करता येईल? अग्रलेखाने तथाकथित राष्ट्रवाद्यांना या सत्याची जाणीव अनेक समर्पक उदाहरणांतून करून दिली, हे योग्यच झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या परराष्ट्रमंत्र्यांच्या राष्ट्रवादी वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पंडित नेहरूंनी १९२६ पासून व्यक्त केलेल्या जागतिक भानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. नेहरूंनी अलिप्ततावादाचे धोरण ही त्यावेळची अपरिहार्यता स्वीकारूनही जागतिक भान परराष्ट्र धोरणांमध्ये कायम ठेवले. आजच्या वाढत्या जागतिकीकरणाच्या काळात ‘आमचे आम्ही’ हे संकुचित धोरण काही क्षणांसाठी आपल्या राष्ट्रप्रेमाचे ज्वलंत उदाहरण म्हणून दाखविता येत असले, तरी ते परराष्ट्र धोरण म्हणून  राबविण्याचा विचार अपरिपक्वतेचेच दर्शन घडवून आणतो.

ज्या देशाची व्यापारतूट वर्ष २०२१-२२ साठी १४,९३० अब्ज ९२ कोटी रुपये (१९२.२४ बिलियन डॉलर) आहे. ज्या देशाची ८५ टक्क्यांहून अधिक इंधनगरज आयातीतून भागवली जाते, त्या देशाने ‘आमचे आम्ही’ हे  धोरण राबविणे व्यावहारिकदृष्टय़ा केवळ अशक्य आहे. नूपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्या परखड (?) वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून तर ते अधिकच स्पष्ट होण्यासारखे आहे. त्यामुळे ‘आमचे आम्ही’ या धोरणाचे पुरस्कर्ते असलेल्या जहाल राष्ट्रवाद्यांना परस्परावलंबनाच्या, सामंजस्याच्या आणि सहानुभवाच्या वास्तवाला सामोरे जावेच लागेल, यात शंका नाही. 

ह. आ. सारंग, लातूर

जयशंकर यांनी आजवरची नरमाई संपवली! 

‘धडाडी आणि धोरण’ हा अग्रलेख (६ जून) वाचला. विकसित देशांनी खडे बोल सुनावल्यानंतर भारत आजवर नरमाईची भूमिका घेताना दिसला. पहिल्यांदाच भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी बडय़ा राष्ट्रांच्या दबावाला बळी न पडता परखडपणे मत मांडले. विकसित राष्ट्रांच्या समस्या या जगाच्या समस्या आहेत, असा वर्षांनुवर्षांपासूनचा समज आहे. या समस्यांना सामोरे ठेवूनच संपूर्ण जगासाठी काही नियम व अटी लागू केल्या जातात. जिथे अशा समस्या नाहीत, अशा विकसनशील देशांना त्याचा नाहक त्रास होतो. राहिला प्रश्न आपले गाऱ्हाणे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा, जगाचा एक भाग तसेच स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपल्याला ते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यावेळी कुठल्या एका राष्ट्राने आपल्या मदतीसाठी येण्याऐवजी स्वतंत्रपणे सर्वसमावेशक विचार करणे अपेक्षित आहे. दुसरीकडे एका विशिष्ट धर्माचा पुरस्कार करणारे सरकार भारतात सत्तेवर आल्याने अल्पसंख्याकांवर अन्याय होतोय हा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी िब्लकेन यांचा दावा निर्थक असून, त्यांचे हे विधान देशात अवास्तव धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. बोटावर मोजण्याइतक्या काही नेत्यांच्या आततायीपणामुळे देशाच्या प्रगतीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीला गालबोट लागत आहे, हे तितकेच खरे.

श्रीकांत शंकरराव इंगळे, पुणे

धडाडीएवढेच वास्तवाचे भान महत्त्वाचे

‘धडाडी आणि धोरण’ हे संपादकीय (६ जून) वाचले. खरेच आजकाल प्रत्येक गोष्ट धडाडीने बोलण्यामुळे होऊ लागली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘डिजिटल इंडिया’, ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ अशा अनेक घोषणा धडाडीने केल्या गेल्या, मात्र त्यामुळे वास्तवात काही बदल झाला का, याचा विचार केल्यास धोरणशून्यता प्रकर्षांने जाणवते. धडाडीने बोलून आपण काही काळ स्वत:ची पाठ थोपटवून घेऊ शकतो, पण धोरण व कृती यांच्या अभावामुळे त्यातील फोलपणा काही दिवसांतच अधोरेखित होतो. सरकारने धडाडी दाखवावी, पण तसे करताना वास्तवाचे भान, कोणत्या ठिकाणी व कशा प्रकारे व्यक्त व्हावे, याचे भान मात्र राखणे, ते धोरण व कृतीद्वारे अमलात आणणे महत्त्वाचे आहे. केंद्र असो वा राज्य सरकार वास्तववादी दृष्टिकोनातून पाहणे हेच समाज व अंतिमत: देशाच्या हिताचे आहे.

राहुल प्रकाश स्वामी, अक्कलकोट (सोलापूर)

शर्मा, जिंदाल यांचा सत्कार करणार का?

नूपुर शर्मा, नवीन जिंदाल यांची वक्तव्ये, भाजपला अपेक्षितच आहेत. या पक्षाच्या नेत्यांच्या मुस्लीमद्वेषात काहीही फरक पडणार नाही. मतांसाठी हे गरजेचे आहे, यावर भाजपचा ठाम विश्वास आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी या विचारांच्या आणि नीतीच्या ठाम विरोधात होते. त्यांच्या विचारांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना कठोरपणे बाजुला सारण्यात आले. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर भाजपमधून शर्मा यांना निलंबित तर जिंदाल यांना बडतर्फ करण्यात आले. या दोघांचे द्वेषाचे फूत्कार आठ दिवसांपूर्वीचे आहेत. आजपर्यंत यांच्यावर एफआरआय नोंदवण्यात आलेला नाही. बंगळूरुतील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीवर शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूल किट प्रसारित केले म्हणून देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून तिला तुरुंगात डांबण्यात आले होते. शर्मा आणि जिंदाल यांच्या मुस्लीमद्वेषाच्या फूत्कारामुळे परदेशांतील भारतीयांचे आणि देशवासीयांचे नुकसान झाले आहे. त्यांना सरकार पुरस्कार देऊन गौरवणार आहे का?

जयप्रकाश नारकर, राजापूर (रत्नागिरी)

पंडितांची काळजी सर्वाना, शेतकऱ्याची कुणाला

गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांच्या बातम्या येत आहेत आणि महाराष्ट्रातील बरेच राजकीय पक्ष पंडितांच्या काळजीने व्याकूळ झाले आहेत. महाराष्ट्रातील सगळे प्रश्न संपले आहेत का? खरीप तोंडावर आला आहे, दरवर्षीप्रमाणे सोयाबीनच्या बियाण्यासाठी शेतकरी सैरभैर झाला आहे, खतांचा तुटवडा आहे, व्यापारी साठेबाजी करून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत, खासगी कंपनीच्या बियाणांची सक्ती केली जात आहे, त्याबद्दल यांना कळवळा नाही. त्याबद्दल उपाययोजना करण्याऐवजी आपण काश्मिरी पंडितांची काळजी वाहतोय. एवढीच जर हिंदूंची काळजी आहे, तर यातील बहुसंख्य शेतकरी हिंदू नव्हेत का? काश्मिरी पंडितांची काळजी केल्याने किंवा आयोध्येला गेल्याने प्रश्न सुटणार नाहीत. शेवटी आपणास मते मागायला शेतकऱ्यांकडे जायचे आहे, काश्मिरी पंडितांकडे नाही.

निळकंठ प्रकाशराव लांडे, एरंडी (लातूर)

जाहिरात कंपनीला परिणामांचा अंदाज नव्हता?

‘आक्षेपार्ह जाहिरात हटवण्याचे यूटय़ूब, ट्विटरला आदेश’ ही बातमी (५ जून ) वाचली. एका मुलीकडे सामूहिक बलात्काराच्या अर्थाने बोट दाखविणाऱ्या मुलांच्या गटावर आधारित ही जाहिरात दर्शवते की २१व्या शतकाच्या २२व्या वर्षीही भारतातील बाजारपेठ बलात्काराला एक वस्तू मानते. लोक बलात्कारावरील विनोदांचा आनंद घेतात. पौराणिक कथांमध्ये द्रौपदीच्या वस्त्रहरणासारख्या अनेक घटना आहेत. भारताच्या संसदीय इतिहासात तमिळनाडू विधानसभेत जयललिता यांच्यावर गुदरलेला प्रसंगही हीच मनोवृत्ती दर्शवतो. अशा समाजात बॉडीस्प्रे विकण्यासाठी एखाद्या स्त्रीवर सामूहिक बलात्कारचा विनोद म्हणून वापर केला जात असेल, तर तो बेकायदा असला, दंडनीय असला तरीही बहुतेकांना त्यात मजा येते. या कंपनीला आणि तिच्या जाहिरात कंपनीला कदाचित या शेवटाचा अंदाज असेल. त्यांनी हे ब्रँड प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी विचारपूर्वक केले असावे.

तुषार अशोक रहाटगावकर, डोंबिवली

भाजपने आधी आपली प्रतिमा सुधारावी!

‘केजरीवालांची महत्त्वाकांक्षी लढाई’ हा महेश सरलष्कर यांचा लेख (६ जून) वाचला. हिमाचल प्रदेश आणि मुख्य म्हणजे गुजरातच्या निवडणुका या भाजपासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे, कारण नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही राज्ये आपल्या हातून जाऊ नयेत यासाठी भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईकडे बघितले पाहिजे. हा भाजपचा रडीचा डाव आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

आपल्याला जो आव्हान ठरेल त्याच्यामागे ईडीचा ससेमिरा लावायचा आणि संबंधितांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा, हेच उद्योग भाजप करत आला आहे. पण केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करणे वाटते तितके सोपे नाही, हे पंजाबच्या निवडणुकीवरून दिसून आले आहे. आता मतदारांना काँग्रेस आणि भाजप यांच्यापेक्षा आम आदमी पक्षच जवळचा वाटत आहे, कारण बाकीचे एकाच माळेचे मणी आहेत, याची त्यांना खात्री पटली आहे. अन्यथा

दिल्लीच्या मतदारांनी सलग तीनदा या पक्षाला सत्ता मिळवून दिली नसती. नरेंद्र मोदी यांचा गेल्या दोन-तीन वर्षांतील कारभार पाहिला तर महागाई आणि वाढत्या इंधनदरांमुळे मतदार मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याऐवजी भाजपने आधी आपली

प्रतिमा सुधारावी!

अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण