फिक्शन
१) पेपर टाऊन्स : जॉन ग्रीन,
पाने : २८०३९९ रुपये.
‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या कादंबरीमुळे जगभर चर्चेत आलेल्या जॉन ग्रीनची ही नवी कादंबरी भारतात पेपरबॅक स्वरूपात उपलब्ध झाली आहे.  
२) गॉड इज गेमर : रवि सुब्रमणियन,         पाने : ३२४२९९ रुपये.
(आयआयटी किंवा) आयआयएममधून पासआऊट झालेल्या आणि साहित्यक्षेत्रात नाव कमावलेल्या लेखकांपैकी हे एक प्रमुख नाव. रवि यांनी रहस्य कादंबरीकार म्हणून नाव मिळवले आहे. ही त्यांची नवी रहस्मय कादंबरी वाचनीय वाटावी.
३) द डेलिब्रेट सिनर : भावना अरोरा,
पाने : १६५१२० रुपये.
सैनिकी पाश्र्वभूमीतून आलेल्या आणि जगभर प्रवास करणाऱ्या तरुण लेखिकेची ही प्रणयरम्य कादंबरी आहे. मराठीतल्या फडके-खांडेकर यांची शिष्या शोभेल अशा पद्धतीची ही कादंबरी आजच्या रीतीने व्यक्त होते, एवढाच काय तो फरक म्हणायचा.
नॉन-फिक्शन
१) नॉट जस्ट अ‍ॅन अकाउटंट : विनोद राय, पाने : २८८५०० रुपये.
माजी महालेखापरीक्षक राय यांचे हे पुस्तक म्हणजे संजय बारुआ, सी. परख, नटरवरसिंग यांच्यानंतर काँग्रेस पक्षावर पडलेला आणखी एक बुक-बॉम्ब, असे या पुस्तकाचे वर्णन ते प्रकाशित होण्याच्या आधीच करण्यात आले. यातच सर्व काही आले.
२) क्लिअर होल्ड बिल्ड- हार्ड लेसन्स ऑफ बिझनेस अँड ह्य़ूमन राइटस इन इंडिया : सुदिप चक्रवर्ती,
पाने : ३२०३७० रुपये.
हे पुस्तक भारतातील मानवी हक्कांची पायमल्ली केंद्र-राज्य सरकार, व्यावसायिक आणि काही हितसंबंधी गटांकडून कशा प्रकारे केली जाते यावर भगभगीत प्रकाश टाकते. लेखकाच्या अभ्यास-संशोधन आणि मेहनतीतून भारताचे वास्तवचित्र समोर उभे राहते.
३) मालविकाग्निमित्रम् – द डान्सर अँड द किंग :  कालिदास, पाने : १७६३९९ रुपये.
कालिदासाच्या नाटकाचे हे एक नवे इंग्रजी भाषांतर. हे नाटक ज्यांनी मूळ संस्कृतमधून वा इतर भाषेतून वाचले असेल त्यांना यात काहीही नवे मिळणार नाही.