– अतुल सुलाखे  jayjagat24@gmail.com

विनोबांच्या व्यक्तित्वात निरंतर अध्ययन, त्याला प्रयोगांची जोड आणि अनाम वृत्ती हे गुण प्रकर्षांने दिसतात. हा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला.

Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Nahar brothers success story
Success Story: इंजिनिअर भाऊ झाले व्यावसायिक; करोना काळात सुरू केलेला व्यवसाय आता १०० कोटींच्या घरात पोहोचला
Prime Minister Narendra Modi  statement on the occasion of Pravasi Bharatiya Diwas
भविष्य हे युद्धाचे नसून, बुद्धांचे! प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता
tarkteerth Lakshman Shastri Joshi
तर्कतीर्थ विचार : ‘गुरुकुल’चे दिवस
ashish shelar artificial intelligence
महाराष्ट्राचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करा : शेलार

भावे घराणे सरदार आणि वैदिक. तथापि नरहरपंतांना या दोहोंचे आकर्षण नव्हते. त्यांनी रसायनशास्त्र आणि उद्योजकता यांची कास धरली. इनामदारी खंगत चालली होती. आणि गागोद्यात कुणाचेच भविष्य घडणार नव्हते हे लक्षात आल्यावर नरहरपंतांनी थेट बडोदा संस्थान गाठले. तिथे रंगाच्या क्षेत्रातील संशोधक म्हणून ते काम करू लागले.

स्वत:चे संशोधन प्रयोगशाळेतच सीमित न ठेवता त्यांनी ते व्यवहारातही आणले. त्यांनी अक्षरओळख करून देणाऱ्या रुमालांचा व्यवसाय सुरू केला. प्रयोगशाळा ते बाजार अशी सर्व व्यवस्था त्यांनी एकहाती उभारली. तिला स्वदेशीचे अधिष्ठान दिले.

संशोधनाच्या क्षेत्रातील त्यांचा अधिकार एवढा मोठा होता की त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका युरोपिअन महिलेने त्यांच्या कामाची वाखाणणी केली. शिवाय या कामासाठी इतके तुटपुंजे वेतन त्यांना मिळावे याचे दु:ख वाटून वेतनात वाढ व्हावी म्हणून प्रयत्नही केले. स्वत: नरहरपंत मात्र मोबदल्याच्या बाबतीत निरिच्छ होते.

थोरल्या मुलाने घर सोडले. गांधीजींचा आश्रम जवळ केला. नंतरच्या दोन्ही मुलांनी त्याचा मार्ग अनुसरला. विनोबांचा निर्णय नरहरपंतांना अपेक्षित होता तथापि एकही मुलगा जवळ राहणार नाही अशी त्यांना कल्पना नव्हती. मात्र त्यांनी मुलांच्या निर्णयाचा स्वीकार केला. एवढेच नव्हे तर मुलांच्या कार्याचे महत्त्व ओळखून देशसेवाही केली.

स्वत:च्या जीवनात आणि घरात आचारांमध्ये त्यांनी एवढी शिस्त आणि व्रतस्थता ठेवली होती की ‘गांधीजींच्या आश्रमातील एकही नियम पाळणे मला कठीण गेले नाही कारण आम्ही घरातच त्याहून कडक नियम पाळत असू,’ असे विनोबा म्हणत. 

पुढे पत्नीचे निधन झाले आणि नरहरपंतांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. ते बडोद्यात एकटे राहू लागले. याच काळात त्यांनी संगीत साधनाही सुरू केली. एका मुस्लीम गवयाकडे ते धृपद गायकी शिकू लागले. दुर्मीळ धृपद बंदिशींखेरीज काही ठुमऱ्या आणि मृदुंगशास्त्र यांचा दस्तावेज ठेवण्याचे काम त्यांनी अंगावर घेतले. महाराष्ट्राला लिखित ठुमरी त्यांच्यामुळे मिळाली.

या संगीत साधनेला त्यांनी आहारविषयक संशोधनाचीही जोड दिली. स्वत:स जडलेल्या मधुमेहामुळे त्यांना हे काम करावे लागले. सोयाबीन आणि मुद्दाम फाडलेले दूध असा आहार घेऊन, त्यांनी मधुमेहावर लक्षणीय नियंत्रण मिळवले होते. या प्रयोगावर लिहून सामान्य जनतेस अधिक मार्गदर्शन करावे, अशी खुद्द गांधीजींची विनंती होती. परंतु हे प्रयोग सामान्यांच्या आटोक्यातील नव्हेत, असे सांगत त्यांनी  नकार दिला.

प्रयोग करताना पायावर अ‍ॅसिड सांडले आणि त्यांच्या अखेरच्या आजाराला सुरुवात झाली. बडोदे सोडून ते धुळय़ाला आले. शिवबांच्या सोबत राहू लागले. ऑक्टोबर १९४७ मध्ये त्यांचे निधन झाले. धुळे आश्रमातील गोशाळेमध्ये त्यांची छोटीशी समाधी बांधली. त्यावर विनोबांनी ‘अवघेचि सुखी असावे ही वासना’ हे तुकोबांचे वचन लिहायला सांगितले. शिवबांनी त्यांचे

वर्णन करताना ‘योगी’ असे उचित संबोधन वापरले आहे.

Story img Loader