– अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

मी क्षरा-अक्षराहूनि वेगळा आणि उत्तम

Tax revenue is vital for civic services and property tax ensures
करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न गरजेचे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची सूचना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Is ESOP or RSU better for employee welfare
कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
Financial assistance, inter-caste marriages, eligible
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत, कोण ठरेल पात्र?
Loksatta explained Why insist on the post of Guardian Minister of a specific district
विश्लेषण : पालकमंत्रीपदासाठी एवढा अट्टहास का ?
Bajaj Seva Trust , Well Farmer Samudrapur Taluka ,
शेतकऱ्यांना विहिरी मोफत ! ‘या’ नामांकित उद्योगाचा पुढाकार

वेद लोक म्हणे मातें म्हणूनि पुरुषोत्तम

–  गीताई १५ – १७

सोपी आणि सूत्रमय भाषा, चिंतन, प्रयोग, विनोबांच्या विचारांच्या अशा विशेषांची नेहमी चर्चा होते. तथापि या चिंतनाचा आणि त्याच्याशी जोडलेल्या प्रयोगांचा गाभा कोणता आहे? गीतेतील तत्त्वज्ञानाचे जे सर्वोच्च शिखर आहे ते विनोबांचेही तत्त्वज्ञान आहे. गीतेच्या भाषेत ‘पुरुषोत्तम योग’ आणि विनोबांच्या भाषेत ‘एकरूपता.’  गीता प्रवचनांच्या १५ व्या अध्यायावरील निरूपणात त्यांनी ही भूमिका सुलभपणे, परंतु सखोल रूपात मांडल्याचे दिसते.

कर्म, ज्ञान आणि भक्ती, जीवनाच्या या तीन अंगांचा विचार करताना विनोबा सांगतात, बरेच साधक यापैकी एकाच मार्गाचा आधार घेतात आणि पुढे जातात. तथापि जीवन म्हणजे कर्म, ज्ञान आणि भक्ती यापैकी एकच काही आहे, हा ‘केवलवाद’ झाला. तो विनोबांना मान्य नाही.

कुणी कर्म, ज्ञान आणि भक्ती यांची मिळवणी करत साधना करतात. विनोबा याला ‘समुच्चयवाद’ म्हणत तोही बाजूला ठेवतात. थोडी भक्ती, थोडे ज्ञान आणि थोडे कर्म, गरजेप्रमाणे त्यांचे आचरण करावे, हा झाला ‘उपयुक्ततावाद’; तोदेखील त्यांना अमान्य आहे. जीवनात या तिन्हींचा मेळ घालावा हा ‘सामंजस्यवाद’ही त्यांना नकोसा वाटतो. मग त्यांची कोणत्या तत्त्वाला पसंती आहे?

इथे बर्फीचे उदाहरण देत विनोबा म्हणतात, ‘‘मला असे अनुभवावेसे वाटते की, कर्म म्हणजेच भक्ती, म्हणजेच ज्ञान. बर्फीच्या तुकडय़ातील गोडी, तिचा आकार, तिचे वजन, या गोष्टी निरनिराळय़ा नाहीत. ज्या क्षणी बर्फीचा तुकडा तोंडात टाकला, त्याच क्षणी तिचा आकारही खाल्ला, तिचे वजनही पचविले तिची गोडीही चाखली. तिन्ही गोष्टी एकत्र आहेत.’’

‘‘बर्फीच्या कणाकणात आकार, वजन व गोडी आहेत. अमक्या तुकडय़ात आकारच आहे, अमक्या तुकडय़ात गोडीच आहे, अमक्या तुकडय़ात वजनच आहे, असे नाही.’’

त्याप्रमाणेच जीवनातील प्रत्येक क्रियेत परमार्थ भरून राहावा, प्रत्येक कृत्य सेवामय, प्रेममय व ज्ञानमय व्हावे, जीवनातील सर्व अंगप्रत्यंगात कर्म, भक्ती व ज्ञान भरून राहावी; याला ‘पुरुषोत्तमयोग’ म्हणतात. सारे जीवन केवळ परमार्थमय करावयाचे ही गोष्ट उच्चारावयास सोपी आहे; परंतु या उच्चारातील भाव, त्याचा जर विचार करू लागलो, तर केवळ निर्मळ अशी सेवा व्हावयास अंत:करणात शुद्ध ज्ञानभक्तीचा जिव्हाळा गृहीत धरला पाहिजे. म्हणून कर्म, भक्ती व ज्ञान अक्षरश: एकरूप आहेत. या परम दशेला पुरुषोत्तमयोग म्हणतात. जीवनाची अंतिम सेवा येथे गाठली गेली.

गीताई चिंतनिकेच्या विवरणात त्यांनी वर दिलेल्या श्लोकाच्या अनुषंगाने याच भाष्याचा पुनरुच्चार केला आहे. तिथे उदाहरण ‘वैद्य आणि रुग्ण’ असे घेतले आहे एवढेच. गांधीजी असोत किंवा विनोबा, यांच्या विचारसृष्टीचा पाया ‘एकरूपता’ आहे. हे ऐक्य गांधीजींच्या गुप्त राखलेल्या ज्ञानात आणि उघड झालेल्या करुणेत शोधावे लागते. विनोबांच्या तत्त्वज्ञानात आणि कृतीमध्ये याच ऐक्याचे दर्शन होते. भूदान यज्ञाचा आरंभ करून विनोबांनी ज्ञान, कर्म आणि सेवा यांचे ऐक्यच जगासमोर ठेवले.

Story img Loader