साठ व सत्तरच्या मेनफ्रेम व लघुसंगणकांच्या कालखंडात सर्व लक्ष हे संगणक व पर्यायाने त्याच्या हार्डवेअरवर केंद्रित झालं होतं. संगणक अधिकाधिक लहान, शक्तिशाली व सर्वाच्या आवाक्यातले कसे बनवता येतील यावरच कंपन्या आपली शक्ती पणाला लावत होत्या..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत व्यावसायिक संगणक म्हणजे मेनफ्रेम हे समीकरण चांगलंच दृढ झालं होतं. मेनफ्रेम संगणकाचं एकंदरच महाकाय रूप, गगनाला भिडणारी किंमत व या क्षेत्रातील स्वत:च्या मक्तेदारीकडे पाहून चक्क आय बी एमनेच असं जाहीर केलं होतं की, येत्या तीन-चार दशकांत संपूर्ण जगभरात फार फार तर तीन लाख संगणक असतील.
आयबीएमच्या या गृहीतकास व अशा अभिजनवादी दृष्टिकोनास जर पहिला हादरा कोणी दिला असेल तर तो केन ओलसन या तिशीतल्या तरुणाने स्थापन केलेल्या डीईसी (डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन) या कंपनीने. ओलसन हा एमआयटी (मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी : अमेरिकेतलं जगद्विख्यात विद्यापीठ) मधून शिकलेला व सतत नावीन्याच्या ध्यासाने झपाटलेला एक हाडाचा अभियंता होता. आयबीएमच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी त्याने एका नव्या प्रकारच्या संगणकाची निर्मिती केली; ज्याला त्याने नाव दिलं – लघुसंगणक (Minicomputer). याचं वैशिष्टय़ म्हणजे कमी आकार, वाजवी किंमत व (मेनफ्रेमच्या तुलनेत थोडी डावी असली तरीही) उत्तम गणनक्षमता. १९७०मध्ये जेव्हा मेनफ्रेम संगणक लाखो डॉलरना विकले जात होते तेव्हा डीईसीचा पीडीपी-११ हा लघुसंगणक फक्त ११००० डॉलरला उपलब्ध होता. यामुळे विविध विद्यापीठांनी व कंपन्यांच्या संशोधन विभागांनी लघुसंगणकांना आपलंसं केलं.
पीडीपी-११ हा लघुसंगणक व्यवसायिकरीत्या एवढा यशस्वी झाला की दस्तुरखुद्द आयबीएमसुद्धा लघुसंगणकाच्या निर्मितीमध्ये उतरली. सत्तरच्या दशकात तर लहान-मोठय़ा तब्बल ५० कंपन्या लघुसंगणकाची निर्मिती करत होत्या. असं असलं तरीही जशी मेनफ्रेम ही आयबीएमचीच मक्तेदारी होती तशीच लघुसंगणकावर डीईसीचीच मक्तेदारी राहिली. १९७७ मध्ये डीईसीने आणलेला VAX नावाचा लघुसंगणक हा आजपर्यंतचा जगातला सर्वाधिक खपलेला लघुसंगणक होता; इतका की एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातदेखील तो वापरला जात होता.
१९७० आणि ८०ची दशकं ही इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी मोठय़ा उलथापालथीची पण तेवढय़ाच उत्कर्षांची होती. संगणकासाठी लागणारं हार्डवेअर हे एकाच वेळेला स्वस्त व सुटसुटीत तरीही अधिक शक्तिमान होत होतं. निर्वात नलिकेपासून सुरू झालेला संगणकाच्या गाभ्याचा प्रवास १९७० मध्ये अतिसूक्ष्म अशा मायक्रोप्रोसेसर चकतीपर्यंत जेव्हा आला तेव्हा इलेक्ट्रॉनिकतज्ज्ञांना संगणक हा सामान्य माणसाच्या घरात नेऊन ठेवण्याची स्वप्नं पडायला लागली.
लघुसंगणक हे स्वस्त असले तरीही वैयक्तिक वापरासाठी आवाक्याबाहेरचे होते. जर सर्वसामान्यांच्या घरी संगणक पोहोचायचा असेल तर त्याचा आकार लहान हवा, किंमत वाजवी हवी व मुख्य म्हणजे सांभाळण्यास सोयीचा हवा. इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञांच्या या स्वप्नांना झेप घेण्यासाठीचे पंख पुरवले ‘इंटेल’ या कंपनीने. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या संगणकावर ‘इंटेल इनसाइड’चं लेबल पाहिलं असेल. हे लेबल असं अधोरेखित करतं की तुम्ही वापरणाऱ्या संगणकाचा गाभा हा इंटेल कंपनीने बनवलेल्या मायक्रोप्रोसेसर चकतींपासून बनला आहे.
याची सुरुवात झाली १९७० मध्ये. त्या वर्षी इंटेलनं संगणकाच्या रचनेत मूलगामी बदल करणाऱ्या ४००४ नावाच्या मायक्रोप्रोसेसर चकतीची निर्मिती केली. हिचा उपयोग केवळ गणनयंत्रासाठी केला गेला असला तरी १९७४ मध्ये आलेल्या ८०८० या चिपने क्रांती घडवली. या अत्यंत छोटय़ा आकाराच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या चमत्कारामध्ये अख्ख्या संगणकाला काबूत ठेवण्याची क्षमता होती.
या क्षमतेचा खुबीने वापर केला एड रॉबर्ट्स या संगणकतज्ज्ञाने! त्याने मिट्स (MITS) नावाच्या छोटय़ा इलेक्ट्रॉनिक कंपनीची स्थापना करून अल्टेअर ८०८० हा इलेक्ट्रॉनिक संच बाजारात आणला. या संचाचं वैशिष्टय़ म्हणजे तो इंटेलच्या ८०८० या मायक्रोप्रोसेसर चकतीचा उपयोग करून बनवला होता. दुसरं म्हणजे त्या संचाचं आरेखन hardware architecture) सर्वाना खुलं होतं, ज्यायोगे कोणीही त्याचा वापर करून संगणक बनवू शकेल. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची किंमत! १९७५ मध्ये जेव्हा सर्वात स्वस्त लघुसंगणक ४५००-५००० अमेरिकन डॉलरला मिळत होता तेव्हा हा अल्टेअर संच फक्त ४०० डॉलरमध्ये उपलब्ध होता! सर्वसामान्यांना परवडेल अशा वैयक्तिक वापरासाठीच्या संगणकयुगाची ही सुरुवात होती.
या साठ व सत्तरच्या मेनफ्रेम व लघुसंगणकांच्या कालखंडात सर्व लक्ष हे संगणक व पर्यायाने त्याच्या हार्डवेअरवर केंद्रित झालं होतं. संगणक अधिकाधिक लहान, शक्तिशाली व सर्वाच्या आवाक्यातले कसे बनवता येतील यावरच कंपन्या आपली शक्ती पणाला लावत होत्या. सॉफ्टवेअर ही अजूनही हार्डवेअरसाठी लागणारी एक पूरक अशी गोष्ट होती; तिला मुख्य प्रवाहात स्थान नव्हतं. जरी त्याही काळात मेनफ्रेम किंवा लघुसंगणकांवर आकडेमोड करण्यासाठी लागणाऱ्या आज्ञावली, या सर्व आज्ञावलींना संगणकावर चढवून एकत्र करणारी जुळवणी प्रणाली व आज्ञावलींचं रूपांतर संगणकाला समजणाऱ्या यंत्रभाषेत करणारी भाषांतर व संकलन प्रणाली यांसारखी सॉफ्टवेअर कंपन्या बनवत असल्या तरी त्या काळातल्या सर्वच सॉफ्टवेअर प्रणालींमध्ये एक मोठी मर्यादा होती. प्रत्येक कंपनीतले संगणक संचालक वेगवेगळ्या आज्ञावली आपल्या गरजेनुसार आपापल्या कंपनीपुरत्या तयार करत असल्याने त्यांचं प्रमाणीकरण झालं नव्हतं व त्यात सुसूत्रतेचा पूर्णपणे अभाव होता.
म्हणजे उदाहरणार्थ मागील लेखात उल्लेखलेली आयबीएमची ओएस/३६० ही ऑपरेटिंग प्रणाली केवळ आयबीएमच्याच एस/३६० (व त्याच्या काही पुढील आवृत्त्या जसं एस/३७०) मेनफ्रेमवरच चालायची. डीईसीच्या पीडीपी लघुसंगणकावर चालणारी एकही सॉफ्टवेअर प्रणाली मेनफ्रेमवर चालायची नाही. याचं कारण म्हणजे संगणकाची हार्डवेअर आरेखन व स्थापत्यशैली कंपनीनुसार विभिन्न होती आणि त्याचे बौद्धिक संपदा हक्क त्या त्या कंपनीकडे सुरक्षित होते. यामुळे सॉफ्टवेअर ही संगणकाचं हार्डवेअर बनवणाऱ्या कंपनीची, कंपनीने, कंपनीसाठी बनवलेली गोष्ट होती.
त्या काळात ग्राहक म्हणून संगणक वापरकर्त्यांला आपल्या संगणकावर कुठलं सॉफ्टवेअर असावं या निवडीचे फारसे पर्याय व अधिकारही नव्हते. सॉफ्टवेअर हे संगणकाचा एक अविभाज्य भाग म्हणून संगणकाबरोबर एकत्रितच वितरित व्हायचं. त्याची स्वतंत्रपणे विक्री होत नव्हती. ते युग हार्डवेअरचं होतं आणि सॉफ्टवेअरची भूमिका ही फार तर एका साहाय्यक अभिनेत्याची होती.
अल्टेअर ८०८० व त्यासारख्या इतर संगणक संचांची लोकप्रियता लक्षात घेऊन आयबीएमने अखेर सामान्यांना परवडेल अशा संगणकाच्या निर्मितीप्रक्रियेत उतरायचं ठरवलं. ते साल होतं १९८० आणि आयबीएमचाच एक विभागप्रमुख बिल लोवे आयबीएमच्या या निर्णयामागे होता. पुढे सर्वतोमुखी झालेल्या आयबीएम पीसी (वैयक्तिक वापराचा संगणक) युगाची ही नांदी होती.
१९८० नंतर मात्र संगणक उद्योगाचा लंबक हार्डवेअरपासून एकदम सॉफ्टवेअरच्या दिशेने जाणार होता. याला कारणीभूत होता आयबीएमनेच अजाणतेपणी घेतलेला एक निर्णय; ज्याचा संगणकक्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार होता. संगणकीय रंगमंचावर एक नवं नाटय़ लिहिलं जाणार होतं, जे संपूर्णपणे सॉफ्टवेअरभोवती गुंफलेलं होतं व या नाटकात प्रमुख भूमिकेत होती, पुढील काळात सॉफ्टवेअरमधील व एकंदरीतच संगणकक्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट बनलेली एक कंपनी – ‘मायक्रोसॉफ्ट’!
लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com