परंपरागत बौद्धिक संपदा हक्क हे कोणत्याही सर्जनशील अभिव्यक्तीला एक संरक्षण कवच देतात.
संगणकासाठी लिहिले जाणारे प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरदेखील याच कॉपीराइटच्या नियमांखाली येते व ते एक प्रकारे कंपन्यांना अधिक चांगल्या दर्जाच्या सॉफ्टवेअर प्रणाली तयार करण्यासाठी प्रोत्साहन देते..
ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े आपण मागील लेखात पाहिली. अगदी सोप्या शब्दात ओपन सोर्स व प्रोप्रायटरी या दोन सॉफ्टवेअर पद्धतींमधला फरक सांगायचा झाला तर तो असा सांगता येईल की, नावाप्रमाणे ओपन सोर्स सॉफ्टवेअरमधल्या ज्या मूळ आज्ञावली (म्हणजेच सॉफ्टवेअरचा सोर्स कोड) असतात त्या सर्वासाठी ‘ओपन’ म्हणजेच खुल्या केलेल्या असतात व त्या सॉफ्टवेअरसोबत वापरकर्त्यांकडे वितरित केल्या जातात. हे मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांच्या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरमध्ये संभवत नाही.
हा सॉफ्टवेअरचा सोर्स कोड म्हणजे संगणकाला दिलेल्या विविध आज्ञांचा एक संच असतो, जो संगणकतंत्रज्ञ त्यांच्या कौशल्याप्रमाणे वेगवेगळ्या आज्ञावल्यांच्या भाषेत (ज्याला प्रोग्रामिंग लँग्वेजेस असं म्हटलं जातं) लिहितात (जसं पास्कल, सी, जावा वगैरे).
आता खरा प्रश्न हा आहे की, अशा एखाद्या आज्ञावलीचा सोर्स कोड खुला केल्याने व्यवस्थेमध्ये कसा आणि किती फरक पडतो? एका साध्या उदाहरणाने हा फरक लगेच स्पष्ट होईल. कोकाकोला किंवा पेप्सी कंपनी आपली विविध शीतपेये आपल्या ग्राहकांना विकते. आपण सर्वच ही शीतपेयं (आरोग्याला अपायकारक असली तरीही) बऱ्याचदा पीत असतो. पण तुम्ही जर या शीतपेयांच्या बाटलीवर लिहिलेली घटकपदार्थाची यादी वाचलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की, या यादीत लिहिलेले सर्व घटकपदार्थ (जसं पाणी, साखर, रासायनिक द्रव्ये वगैरे) हे सर्वसामान्य (ॠील्ली१्रू) स्वरूपाचे आहेत. हे सर्व घटकपदार्थ एका विशिष्ट प्रमाणात एकत्र करून शीतपेय बनविण्याचा ‘सिक्रेट फॉम्र्युला’ कोकाकोला किंवा पेप्सीकडे सुरक्षित आहे.
म्हणजेच आपण कोकाकोला किंवा तत्सम कोणतेही शीतपेय विकत घेऊ शकतो, गटागट पिऊन आपली तहान भागवू शकतो, पण ते शीतपेय बनविण्याचे किंवा त्यात कोणत्याही सुधारणा करण्याचे तंत्र अवगत करू शकत नाही. कारण ते तयार करण्याच्या कृतीचे बौद्धिक संपदा हक्क (इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स) संपूर्णपणे त्या शीतपेयाच्या कंपनीकडे आहेत. थोडक्यात, कोकाकोला बनविण्याच्या कृतीवर केवळ कोकाकोलाचा मालकी हक्क आहे आणि हेच पेप्सीच्या बाबतीतही खरं आहे.
आता पुढील प्रश्न हा आहे की, अशा प्रकारे बौद्धिक संपदा हक्कांचं (ज्याचे पेटंट्स, प्रताधिकार किंवा कॉपीराइट, परवाना किंवा लायसन्सिंग असे विविध प्रकार आहेत) कवच वापरून एखाद्या व्यक्तीला अथवा कंपनीला आपल्याकडल्या ज्ञानाचं संरक्षण का करावं लागतं? आपल्या शालेय जीवनात शिकलेल्या ‘ज्ञान जर सर्वात वाटलं तर ते वृद्धिंगत होतं’ या उक्तीच्या हे विसंगत नाही काय? बौद्धिक संपदा हक्काच्या मागची अर्थशास्त्रीय पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर शीतपेयांच्या या उत्पादन व्यवस्थेमागचं तर्कशास्त्र समजू शकेल.
असा विचार करा की, कोकाकोला बनविण्याचा ‘सिक्रेट फॉम्र्युला’ सर्व जगास खुला झाला असता तर तंतोतंत कोकाकोलासारखं शीतपेय बनविणाऱ्या शेकडो कंपन्या निर्माण झाल्या असत्या. म्हणजेच कोकाकोलाला शीतपेय बनविण्याचा ‘सिक्रेट फॉम्र्युला’ शोधण्याचा कसलाही आर्थिक लाभ झाला नसता. जर असं असेल तर मग मुळात कोकाकोलाने तो फॉम्र्युला शोधलाच कशासाठी असता? बौद्धिक संपदा हक्काचा कायदा अस्तित्वात येण्यामागची हीच पाश्र्वभूमी आहे. बौद्धिक संपदा हक्क हा एखाद्या शोधाचं (मग तो व्यक्तीने लावलेला असो वा कंपनीने) कायदेशीरपणे संरक्षण करून शोधकर्त्यांला शोध लावण्यासाठी प्रोत्साहन देतो; कारण शोधकर्त्यांने शोध लावण्यासाठी जो वेळ, शक्ती व पैसा खर्च केलेला असतो त्याच्या आर्थिक परताव्याची हमी बौद्धिक संपदा हक्क देत असतो.
संगणक सॉफ्टवेअर उत्पादन व्यवस्था अशाच बौद्धिक संपदा हक्कांच्या पायावर उभी आहे व तिच्यासाठीदेखील वरीलप्रमाणेच युक्तिवाद केला जातो. म्हणूनच आपण मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग प्रणाली विकत घेऊ शकतो, आपल्या संगणकावर तिचा वापर करू शकतो, पण तिच्यात बदल करू शकत नाही किंवा कुठला बदल करून तिचे पुनर्वितरण करू शकत नाही. मायक्रोसॉफ्ट आपल्याला विंडोज ऑपेरेटिंग प्रणाली फक्त वापरण्याचा अधिकार देते. विंडोजचे स्वामित्व हक्क व प्रताधिकार मायक्रोसॉफ्टकडे सुरक्षित असल्यामुळे कायदेशीररीत्या मायक्रोसॉफ्ट आपल्याला तिच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल वा सुधारणा करण्यापासून रोखू शकते.
किंबहुना हे तांत्रिकदृष्टय़ादेखील अशक्य आहे. ज्याप्रमाणे कोकाकोला तिची शीतपेय बनविण्याची कृती शीतपेयासोबत वितरित करत नाही त्याचप्रमाणे मायक्रोसॉफ्ट वापरकर्त्यांला विंडोज ऑपरेटिंग प्रणालीसोबत त्या प्रणालीमधल्या आज्ञावलींचा सोर्स कोड वितरित करत नाही.
इथे सोर्स कोडची तुलना कोणत्याही पदार्थाच्या पाककृतीबरोबर करता येईल. एखादा पदार्थ उत्कृष्ट बनवायचा असेल तर त्या पदार्थाच्या पाककृतींमध्ये दिलेल्या सूचनांचे दिलेल्या क्रमाने तंतोतंत पालन करावे लागते. तसंच कुठलीही सॉफ्टवेअर प्रणाली संगणकावर विनासायास चालण्यासाठी त्या प्रणालीच्या सोर्स कोडमध्ये लिहिलेल्या आज्ञांचे तंतोतंत व दिलेल्या क्रमानेच पालन करावे लागते.
आता जर हा सोर्स कोड त्याच्या सॉफ्टवेअर प्रणालीसोबत वितरित झाला तर एखादा संगणक तंत्रज्ञ (ज्याला तो सोर्स कोड ज्या संगणक आज्ञावलीच्या भाषेत लिहिला आहे त्याचे ज्ञान आहे) तो कोड वाचून, समजून त्यात त्याला हवे त्याप्रमाणे बदलसुद्धा करू शकतो. पण मायक्रोसॉफ्ट व तिच्यासारख्या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचं उत्पादन व वितरण करणाऱ्या कंपन्या हा सोर्स कोड आपल्या हाती लागूच देत नाहीत.
या कंपन्या आपल्याला त्यांच्या सॉफ्टवेअरची जी प्रत देतात (ज्याला executable असं म्हटलं जातं) त्यात फक्त संगणकीय द्विमान पद्धतीत यंत्रभाषेमध्ये (म्हणजे ० व १ या दोन अंकांची लांबच्या लांब मालिका) मजकूर लिहिलेला असतो. असा मजकूर संगणकाच्या आत असलेली मायक्रोप्रोसेसर चकती तर समजू शकते, पण हा मजकूर कोणत्याही मनुष्याच्या आकलनापलीकडचा असतो. म्हणूनच तांत्रिकदृष्टय़ा कोणताही संगणक तंत्रज्ञ प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर प्रणालीच्या आज्ञावलींमध्ये कसलाही बदल करू शकत नाही.
परंपरागत चाकोरीबद्ध बौद्धिक संपदा हक्क हे कोणत्याही सर्जनशील अभिव्यक्तीला (मग ती विज्ञानातील असो, कलाप्रांतातील असो वा साहित्यातील), काही काळापुरते का असेना, एक संरक्षण कवच देतात. विज्ञानातल्या एखाद्या शोधासाठी वैज्ञानिकाला अमेरिकन कायद्याप्रमाणे २० वर्षांसाठी पेटंट दिलं जातं तर एखाद्या साहित्यिकाचे त्याच्या साहित्यासाठीचे कॉपीराइट हक्क त्याच्या मृत्यूनंतर ५० ते ७० वर्षांपर्यंत कायम ठेवले जातात. संगणकासाठी लिहिले जाणारे परंपरागत प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरदेखील याच कॉपीराइटच्या नियमांखाली येते व ते एक प्रकारे सॉफ्टवेअर बनविणाऱ्या कंपन्यांना अधिक चांगल्या दर्जाच्या सॉफ्टवेअर प्रणाली तयार करण्यासाठी सर्जनशील व आर्थिक प्रोत्साहन देते, असा दावा प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कंपन्या आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जातो.
ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्था ही परंपरागत बौद्धिक संपदा हक्कांमागे असणाऱ्या सर्व प्रकारच्या तर्काची उलथापालथ करते. ओपन सोर्स व्यवस्थेच्या पुरस्कर्त्यांना बौद्धिक संपदा हक्कांच्या (विशेषत: सॉफ्टवेअरच्या बाबतीतली) मागची कोणतीच गृहीतके मान्य नाहीत.
ओपन सोर्स विचारसरणीमागची वैचारिक बैठक व त्यामुळे बौद्धिक संपदा हक्कांचा (सॉफ्टवेअरचा सोर्स कोड) वगळण्यापासून वितरणाकडे झालेला उलटा प्रवास, यांचा ऊहापोह आपण पुढील लेखात करू.
लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com