प्रा. अ‍ॅण्ड्रय़ू टॅननबॉम आणि टॉरवल्ड्स या दोन दिग्गजांमध्ये लिनक्सच्या उपयुक्ततेवरून वादविवाद  सुरू झाला. या वादात पुढे अनेक तंत्रज्ञांनी भाग घेतला. त्यातील काहींची मग लिनक्सच्या वाढीत भरीव मदत झाली..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लिनक्स हा ओपन सोर्स चळवळींमधला एक मलाचा दगड आहे. ओपन सोर्स प्रकल्प व्यवस्थापनातले अनेक महत्त्वाचे पायंडे व प्रघात लिनक्सपासूनच सुरू झाले आहेत. एवढंच काय कोणत्याही ओपन सोर्स प्रकल्पाच्या यशापयशाचा लेखाजोखा हा लिनक्सचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून व लिनक्सचेच मापदंड वापरून मांडला जातो.

कोणत्याची ओपन सोर्स प्रकल्पाचे (विशेषत: सॉफ्टवेअरच्या बाबतीतल्या) निर्मिती व्यवस्थापन हे एखाद्या कंपनीने आपल्या चार भिंतींच्या आत घडविलेल्या सॉफ्टवेअर प्रकल्पापेक्षा संपूर्णपणे भिन्न असते. एक तर ओपन सोर्स प्रकल्पात आपले ऐच्छिक योगदान देणारे ९९ टक्के लोक हे आपल्या सवडीनुसार काम करतात. ही मंडळी भौगोलिकदृष्टय़ा विखुरलेली असतात व इंटरनेट (ई-मेल, चॅट, ऑनलाइन चर्चामंच) हेच त्यांचे संपर्काचे व संवादाचे मुख्य साधन असते. त्याचप्रमाणे एखाद्या प्रकल्पात आपले योगदान कोणत्या स्वरूपाचे असावे याचा निर्णय हा पूर्णत: वैयक्तिक असतो, कारण तुमच्या कामाचा तसेच दिलेल्या वेळेचा आर्थिक परतावा मिळण्याची कोणतीही हमी नसते.

बऱ्याच ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये एक मुख्य समिती असते व ती प्रकल्पामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या तंत्रज्ञांची बनलेली असते. प्रकल्पाची पुढील वाटचाल ठरवणं, सॉफ्टवेअरच्या नव्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित करणं, प्रकल्पामध्ये सहभाग असलेल्या तंत्रज्ञ वा प्रोग्रामर्सचे कुठले काम अथवा सूचना स्वीकारायच्या याचा निर्णय घेणं अशी कामं ही समिती करत असते. पण एखाद्या कंपनीसदृश संस्थेत असलेली विविध श्रेणींची उतरण (hierarchy) ओपन सोर्स व्यवस्थेत (निदान अधिकृतपणे तरी) नसते. अशा गुणवत्ताधारित व्यवस्थेत तुमचा देश, वय, शिक्षण, लिंग, जात, पात यापैकी कशालाच जरासंदेखील महत्त्व नसतं; जर महत्त्व कशाला असेलच तर ते केवळ तुमची तांत्रिक प्रतिभा आणि कर्तबगारीलाच असतं.

जर तुमचे प्रकल्पात सहभागी असलेल्या मंडळींशी वैचारिक मतभेद झाले तर तुम्ही तो प्रकल्प स्वत:च्या मर्जीनुसार सोडू शकता. यापुढे जाऊन प्रकल्पात उपलब्ध असलेल्या सोर्स कोडचा वापर करून एक नवा प्रकल्प चालू करण्याचेसुद्धा पूर्ण स्वातंत्र्य तुमच्याजवळ असते (यालाच तांत्रिक भाषेत Code Forking  म्हणतात.). पण तुमच्या नव्या प्रकल्पाचं यशापयश हे तुमच्या वैचारिक बठकीस अनुकूल असणारे अनुयायी किती व त्यांचं या नव्या प्रकल्पामध्ये योगदान केवढं यावरच अवलंबून असल्यामुळे सर्वसाधारणपणे काही थोडके अपवाद वगळता ओपन सोर्स प्रकल्पांचे (तांत्रिकदृष्टय़ा सहजशक्य असूनही) ‘फोर्क्स’ फारसे तयार होत नाहीत.

अशा विभिन्न प्रकारच्या निर्मिती प्रक्रियेमुळे ओपन सोर्स प्रकल्पांचं यश हे त्या सॉफ्टवेअरच्या तांत्रिक व व्यावहारिक योग्यतेबरोबरच प्रकल्पात मतभेद कसे हाताळले जातात, प्रकल्पाच्या मुख्य समितीमध्ये असलेले नेतृत्वगुण, त्यांचा संगणक तंत्रज्ञानात असलेला नावलौकिक, प्रकल्पात सहयोगी मंडळींना आपले योगदान सतत सुरू ठेवण्यासाठी प्रकल्पाच्या नेतृत्वाकडून मिळणाऱ्या प्रेरणा अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

लिनक्सच्या जन्मानंतर तिच्या पहिल्या काही वर्षांतच तिचा कस हा तांत्रिक बाबींबरोबरच वर उल्लेखलेल्या व्यवस्थापकीय बाबींवरही लागला व त्यातून तावून सुलाखून निघाल्यावरच लिनक्सची घोडदौड पुढील काळात मोठय़ा जोमाने सुरू झाली.

मागील लेखांत चर्चिल्याप्रमाणे कोणत्याही ऑपरेटिंग प्रणालीचा ‘कर्नल’ हा मध्यवर्ती भाग असतो. त्यामुळेच ऑपरेटिंग प्रणालीची निर्मिती करताना कर्नलचं आरेखन हे तिच्या कार्यक्षमतेवर दूरगामी परिणाम करतं. त्या काळात कर्नल आरेखनाचे दोन प्रकार प्रचलित होते. एक म्हणजे अगदी सुरुवातीपासून चालत आलेले ‘मोनोलिथिक’ कर्नल, तर दुसरं म्हणजे त्याआधीच्या ३-४ वर्षांत उदयास आलेले ‘मायक्रो’ कर्नल.

मोनोलिथिक कर्नल हे मोठय़ा आकाराचे, अखंड व एकात्मिक स्वरूपाचे असत. कर्नलने करावयाची सर्व प्रकारची कार्ये मोनोलिथिक कर्नलमध्ये एकाच मोठाल्या आज्ञावलीमध्ये एकवटलेली असत. त्याविरुद्ध मायक्रो कर्नल हे नावाप्रमाणेच लघू आकाराचे असत. त्यांचा मुख्य उद्देश हा कर्नलचा आकार लहानात लहान ठेवण्याचा असे; ज्यात कर्नलची बरीचशी कामं विविध बाह्य़ आज्ञावलींतर्फे केली जात.

१९९०च्या दशकात कर्नल आरेखनासाठीची मोनोलिथिक पद्धत कालबाह्य़ ठरू लागली होती, तर मायक्रो कर्नलची पद्धत अधिक रूढ होत होती. मायक्रो कर्नलच्या सुटसुटीत व लहान आकारामुळे तसेच कामाच्या विभाजनीकरणाच्या पद्धतीमुळे संगणक तंत्रज्ञ व संशोधकांना मायक्रो कर्नल वापरण्यास व देखभालीस अधिक सोपे व कार्यक्षम वाटत होते.

मायक्रो कर्नलकडे सर्वसाधारणपणे वाढता कल असूनही टॉरवल्ड्सने लिनक्स कर्नलच्या आरेखनासाठी मोनोलिथिक कर्नलचा वापर केला. हा एक मोठाच निर्णय होता. मायक्रो कर्नलचे फायदे माहीत असूनही टॉरवल्ड्सला कर्नलसाठी एकच अखंड आज्ञावली लिहिणे जास्त सोपं, जलद व सयुक्तिक वाटत होतं. त्याचा युक्तिवाद असा होता की एकच एकात्मिक आज्ञावली ही लिनक्सवर काम करणाऱ्या भौगोलिकदृष्टय़ा विखुरलेल्या तंत्रज्ञांना हाताळणं सोपं जाईल. असं असलं तरीही त्याला कल्पना होती की त्याच्या या निर्णयामुळे लिनक्सवर तांत्रिकदृष्टय़ा मागासलेपणाची टीका होऊ शकेल.

आणि त्याची ही भीती लवकरच खरी ठरली. लिनक्स कर्नलच्या आरेखन पद्धतीवर पहिली अधिकृत टीका जर कोणी केली असेल तर ती केली लिनक्सची सुरुवात ज्या मिनिक्स प्रणालीपासून झाली होती तिचा प्रणेता प्राध्यापक अ‍ॅण्ड्रय़ू टॅननबॉमने! १९९१च्या अखेपर्यंत लिनक्सबद्दलची माहिती इंटरनेटवरील न्यूज ग्रुपद्वारे विविध संगणक तंत्रज्ञांच्या वर्तुळात पसरली होती. १९९२च्या सुरुवातीला इंटरनेटवरच्या विविध मंचांवर लिनक्सबद्दलच्या चर्चा एवढय़ा वाढल्या की मिनिक्ससाठी वाहिलेल्या चर्चामंचावरदेखील फक्त लिनक्सबद्दलच चर्चा व्हायला लागल्या. या प्रकाराने टॅननबॉम खवळला. खरं तर त्याला चलबिचल व्हायची काहीच गरज नव्हती.  मिनिक्सचे संगणक अभियांत्रिकी शिकवण्यासाठीचे शैक्षणिक साधन म्हणून महत्त्व अबाधित होते .

तरीही टॅननबॉमला लिनक्सच्या तुलनेत मिनिक्सचं कमी होत चाललेलं महत्त्व रुचलं नाही व त्याने त्याच मंचावर ‘लिनक्स कालबाह्य़ आहे’ अशा मथळ्याचा लेख लिहिला. यात त्याने टॉरवल्ड्सच्या लिनक्ससाठी मोनोलिथिक कर्नल वापरण्याच्या निर्णयावर सडकून टीका केली. त्याचबरोबर लिनक्स ही केवळ इंटेलची चिप असलेल्या हार्डवेअरवरच चालू शकते आणि इतर कोणत्याही प्रकारच्या संगणकावर चालण्यास ती कुचकामी आहे, असेही प्रतिपादन केले.

टॅननबॉमसारख्या प्रथितयश प्राध्यापकाकडून अशी बोचरी व अनाठायी टीका टॉरवल्ड्सला सहन झाली नाही. काही तासांच्या आतच टॉरवल्ड्सने या टीकेस सडेतोड प्रत्युत्तर दिले. मिनिक्सच्या मर्यादांचे दीर्घ विवेचन देण्याबरोबरच त्याने त्याची मोनोलिथिक कर्नलबाबतची भूमिका, लिनक्ससोबत सोर्स कोड वितरण करण्याच्यापाठी त्याला लिनक्सच्या वाढीबद्दल असलेली कळकळ या सर्वाबद्दल विस्ताराने लिहिले.

या दोघा दिग्गजांचा वादविवाद रंगात आला असतानाच एका तिसऱ्या दिग्गजाने, युनिक्सच्या प्रणेत्या केन थॉम्पसनने या चच्रेत उडी घेतली. थॉम्पसनने कर्नलच्या मोनोलिथिक आरेखनांचे तोटे स्पष्ट करताना मायक्रो कर्नलच्या बाजूने कौल दिला. काही आठवडे चाललेल्या वादात पुढे अनेक तंत्रज्ञांनी हिरिरीने भाग घेतला, ज्यातल्या काहींचे लिनक्सच्या वाढीस पुढे भरीव योगदान लाभले. संगणक क्षेत्रातील दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे विरुद्ध एक संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी अशा सामन्यात अंतिम विजय कोणाचा झाला हे सांगणे अवघड आहे; पण या वादविवादात ओपन सोर्स प्रकल्पांमधली संघ बांधणी, मतभेद हाताळणी वगैरे बाबतीतली वैशिष्टय़े समोर येतात.

एक म्हणजे हा संपूर्ण वाद खुल्या ऑनलाइन मंचावर झाला; ज्यातील तपशिलांमध्ये सर्वाना मुक्त प्रवेश होता. यामुळेच या वादविवादांत केलेल्या टीका व मांडलेल्या मुद्दय़ांमध्ये वैयक्तिक आकसांपेक्षा तांत्रिक व तर्कशुद्ध विचारमांडणीला अधिक महत्त्व होतं. लिनक्समध्ये सहभागी असलेल्या मंडळींचा रस या प्रकल्पात टिकून राहावा याकरता टॉरवल्ड्सला लिनक्सच्या आरेखनाबद्दलच्या आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची खुलासेवार कारणमीमांसा करावी लागली. या मुक्त पद्धतीने होणाऱ्या सकस तांत्रिक चर्चाचा व दिग्गजांच्या त्यातल्या सहभागाचा अजून एक सकारात्मक फायदा हा झाला की या वाद-चर्चामध्ये भाग घेण्याच्या निमित्ताने अनेक संगणक तंत्रज्ञ व प्रोग्रॅमर्स लिनक्सशी जोडले गेले व लिनक्स प्रणाली उत्तरोत्तर मोठी होत गेली. लिनक्सची पुढील टप्प्यातली वाढ व तिने ओपन सोर्स तत्त्वांना दिलेले आयाम याची चर्चा आपण पुढील लेखांत करू.