बर्कलेमध्ये १९७५च्या उत्तराधार्त दोन विलक्षण घटना घडल्या. एक म्हणजे थॉम्पसन तिथे वर्षांसाठी प्राध्यापैकीकरण्यासाठी आला. दुसरं म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बिल जॉय या विद्यार्थ्यांने तिथे प्रवेश घेतला . पुढे जॉय व त्याच्या सहकाऱ्याने युनिक्समध्ये महत्त्वपूर्ण बदल केले, ज्यामुळे युनिक्सच्या कार्यक्षमतेमध्ये प्रचंड सुधारणा झाली..

University level admission to vacant posts in agriculture postgraduate course Pune news
कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त; आता विद्यापीठ स्तरावर विशेष प्रवेश फेरी
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
swearing ceremony in Mumbai left many political workers across state despairing
यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : सद्गुणांवर आधारित नैतिक मांडणी
Zee Marathi Lakshmi Niwas serial promo
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची नवी मालिका ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, समोर आली संपूर्ण स्टारकास्ट
Naga Chaitanya and Sobhita Dhulipala wedding Allu Arjun, SS Rajamouli to attend guest list revealed
नागा चैतन्य-सोभिता धुलीपाला ६५० कोटींच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये करणार लग्न, सुपरस्टार्स लावणार कुटुंबासह खास हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर
Huge Salary Opportunities, Cyber ​​Security,
पुण्यात सायबर सुरक्षा, ‘डेटा सायन्स’मध्ये गलेलठ्ठ पगाराच्या संधी! सर्वाधिक वेतन कोणत्या क्षेत्रात जाणून घ्या…
Shocking video of a baby girl caught fire viral video on social media
त्याची एक चूक अन् चिमुकली आगीत अक्षरश: होरपळली; घरात लहान मुलं असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO

१९७३ सालच्या अखेपर्यंत युनिक्सबद्दल तसेच युनिक्सच्या नावीन्यपूर्ण तांत्रिक व व्यवस्थापकीय बाबींबद्दलचे ज्ञान बेल लॅब्सपुरतेच सीमित होते. त्यानंतर मात्र हे चित्र झपाटय़ाने पालटले. त्याला कारणीभूत ठरला त्र्याहत्तर सालच्या ऑक्टोबर महिन्यात एसीएमने (असोसिएशन ऑफ कॉम्प्युटिंग मशिनरी – संगणकशास्त्रावर विविध संशोधनपत्रिका आणि परिषदा आयोजित करणारी अमेरिकेतली एक अग्रगण्य संस्था) आयोजित केलेली ऑपरेटिंग प्रणाली या विषयावरची एक परिषद. या परिषदेत केन थॉम्पसन व डेनिस रिचीने युनिक्सवरचा आपला शोधनिबंध सादर केला.

परिषदेत शेकडोने उपस्थित असलेले संगणक तंत्रज्ञ या नव्या ऑपरेटिंग प्रणालीवरच्या सादरीकरणाने अक्षरश: भारावून गेले. हा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्यांचा हा शोधनिबंध परिषदेने प्रसिद्ध करण्यापूर्वीच युनिक्ससाठीची विचारणा बेल लॅब्सकडे जगभरातून हजारोंच्या संख्येने व्हायला लागली.

खरं तर, बेल लॅब्सची मूळ कंपनी असलेल्या एटीअँडटीकडे (अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी – अमेरिकेतली दूरसंचार आणि दळणवळण क्षेत्रातली बलाढय़ कंपनी) युनिक्सच्या रूपात एक मोठी व्यावसायिक संधी अनायासे चालून आली होती. युनिक्सच्या प्रतींना एवढी मागणी निर्माण झाली होती की कॉपीराइटच्या माध्यमातून एटीअँडटीला लाखो डॉलर कमावता आले असते. पण कंपनीच्या दुर्दैवाने (आणि संगणक विश्वाच्या सुदैवाने ) एटीअँडटी एका न्यायालयीन आदेशाच्या अधीन होती. या आदेशाद्वारे कंपनीला दूरसंचार क्षेत्राखेरीज कोणत्याही इतर क्षेत्रांत व्यावसायिक पद्धतीने महसूल कमावण्यास मज्जाव होता. युनिक्सची निर्मिती बेल लॅब्स व पर्यायाने एटीअँडटीमध्ये झाली असल्यामुळे युनिक्सच्या सोर्स कोडचे कॉपीराइट पूर्णत: एटीअँडटीकडेच सुरक्षित होते, पण युनिक्स हे एक सॉफ्टवेअर असल्याने कंपनी ते विकून पैसे कमावू शकत नव्हती.

आता हेच जर भारतात घडले असते तर इथल्या कंपनीने कायदेपंडितांची मदत घेत कोर्टाच्या निर्णयाचा वेगळा अर्थ लावून युनिक्सला विकण्याची पळवाट शोधून काढली असती. पण एटीअँडटीने असे काही केले नाही. तिने कसलेही रॉयल्टी शुल्क न आकारता, बेल लॅब्समार्फत, युनिक्सला सोर्स कोडसकट काही शे डॉलरच्या बदल्यात (जेवढा खर्च युनिक्स व त्याबरोबर येणाऱ्या इतर आज्ञावलींना चुंबकीय टेपवर चढवायला येई.) विविध विद्यापीठांतल्या संशोधन विभागांना तसेच अमेरिकन शासकीय व संरक्षण विभागांना वितरित करण्यास सुरुवात केली.

पण त्याचबरोबर कसलेही मानधन घेत नसल्या कारणाने एटीअँडटी किंवा बेल लॅब्स या युनिक्स ग्राहकांना ती वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचं साहाय्य पुरवायची नाही. त्याचबरोबर युनिक्समधल्या विविध आज्ञावलींमध्ये जर काही चुका वा त्रुटी राहून गेल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची जबाबदारीदेखील घ्यायची नाही. यातून एटीअँडटीला युनिक्समध्ये कसल्याच प्रकारचा व्यावसायिक रस नाही ही भूमिका सिद्ध करणं सोपं जात होतं.

याचा एक सकारात्मक परिणाम असा झाला की कसलेही अधिकृत साहाय्य मिळत नसल्याने युनिक्सवर काम करणाऱ्या तंत्रज्ञांचे विविध समुदाय तयार झाले. हे समुदाय एकमेकांना युनिक्स अंगीकारण्यास साहाय्य तर करतच असत, पण त्याही पुढे जाऊन आज्ञावलींमध्ये असलेल्या चुकांची दुरुस्ती करणे, काही तांत्रिक त्रुटी दूर करणे किंवा युनिक्समध्ये सुधारणा करून नव्या कार्यक्षमतांची भर घालणे अशी कामं करून सुधारित युनिक्सच्या आवृत्त्यांची एकमेकांसोबत देवाणघेवाण करत असत. अशा अनधिकृत पण मैत्रीपूर्ण सहयोगामुळे युनिक्सची वाढ अगदी झपाटय़ाने झाली.

एटीअँडटीने युनिक्ससोबत सोर्स कोड देण्याचा अजून एक खूप मोठा फायदा युनिक्सच्या वाढीला झाला. केन थॉम्पसनने युनिक्स डीईसी कंपनीच्या लघुसंगणकावर तयार केली होती. पण युनिक्सची कार्यक्षमता एवढी जास्त होती की जगभरातले संगणक तंत्रज्ञ तिच्या वापरास प्राधान्य देऊ  लागले. सोर्स कोड हाताशी असल्याने युनिक्समध्ये यथायोग्य बदल करून त्यांच्यापाशी असलेल्या संगणकावर ती चढवणंसुद्धा शक्य होत होतं. काही वर्षांतच युनिक्स विविध प्रकारच्या व एकमेकांशी कोणत्याही प्रकारची सुसंगती नसणाऱ्या संगणकांवर वापरता येऊ  लागली.

युनिक्सला बेल लॅब्सच्या चार भिंतींच्या बाहेर आणून त्याचा यशस्वीपणे वापर करण्याचा पहिला मान रॉबर्ट फॅब्रीने मिळवला. तो बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात संगणक विभागातला प्राध्यापक होता आणि थॉम्पसन व रिचीच्या युनिक्सवरच्या शोधनिबंधाने प्रचंड प्रभावित झाला होता. त्याने युनिक्सला आपल्या विद्यापीठात आणण्याचा चंग बांधला. वास्तविक त्या वेळी बर्कलेमध्ये केवळ महाकाय मेनफ्रेम संगणकच वापरात होते व युनिक्सवर काम करण्यासाठी डीईसीच्या लघुसंगणकाची गरज होती. फॅब्रीने विद्यापीठातल्या शोधप्रकल्पांसाठी संगणक, गणित व संख्याशास्त्र विभागांच्या प्रमुखांना युनिक्सचं व ती प्रणाली चालविण्यासाठी लागणाऱ्या लघुसंगणकाचं किती महत्त्व आहे ते यथार्थपणे पटवलं व जानेवारी १९७४ मध्ये प्रथमच पीडीपी – ११ हा लघुसंगणक विद्यापीठात दाखल केला. त्याच महिन्यात त्याने थॉम्पसनकडून युनिक्सची प्रत एका चुंबकीय टेपवर घेऊन त्या लघुसंगणकावर युनिक्स वापरायला सुरुवातही केली. बर्कले आणि बेल लॅब्समधल्या असामान्य साहचर्याची ही केवळ एक सुरुवात होती.

१९७५च्या उत्तराधार्त बर्कलेमध्ये दोन विलक्षण घटना घडल्या, ज्यांनी युनिक्सला सहस्र योजने पुढे नेले. एक म्हणजे ७५ सालच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये दस्तुरखुद्द केन थॉम्पसन बर्कलेमध्ये एका वर्षांसाठी प्राध्यापैकीकरण्यासाठी आला व स्वत:बरोबर युनिक्सची नवी कोरी सहावी आवृत्ती घेऊन आला. दुसरं म्हणजे त्याच वर्षअखेरीस बर्कलेमध्ये एका कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला, ज्याचे नाव होते बिल जॉय!

बिल जॉयने अल्पावधीतच केन थॉम्पसनने स्वत:बरोबर आणलेल्या युनिक्सवर व पास्कल नावाच्या, संगणकाला मानवसदृश भाषेत आज्ञा व सूचना देऊ  शकणाऱ्या आज्ञावलीवर प्रभुत्व मिळवले. पास्कलमध्ये तर त्याने इतकी सुधारणा केली की बर्कलेमधले विद्यार्थी संगणकावर काम करण्यासाठी व त्यास विविध सूचना देण्यासाठी प्रामुख्याने पास्कलचाच वापर करू लागले.

१९७६ साली थॉम्पसन बेल लॅब्सला परतल्यानंतर बिल जॉय व त्याचा सहाध्यायी चक हॅले यांनी युनिक्समध्ये (विशेषत्वे तिच्या मूळ गाभ्यात, ज्याला कर्नल असं म्हणतात) काही महत्त्वपूर्ण बदल केले ज्यामुळे युनिक्सच्या कार्यक्षमतेमध्ये प्रचंड सुधारणा झाली.

१९७८ पर्यंत बिल जॉयने केलेल्या पास्कल आज्ञावलीवरच्या कामाची बातमी युनिक्सवर कार्यरत असलेल्या जगभरातल्या समुदायांपर्यंत पोहोचली होती व त्याची मागणी या समुदायांकडून सातत्याने होऊ  लागली होती.

अखेरीस बिल जॉयने पास्कल आज्ञावली व तिच्याशी संलग्न अशी काही साधनं (टूल्स) एकत्र करून त्याचं वितरण करायला सुरुवात केली आणि १९७८ सालात त्याने याच्या ३० प्रती विविध युनिक्स समुदायांमध्ये मोफत वितरित केल्या. या वितरणाचं त्याने बर्कले सॉफ्टवेअर डिस्ट्रिब्युशन असं नामकरण केलं होतं. हेच पुढे ओपन सोर्स समुदायांत व एकंदरीतच संगणकविश्वात बीएसडी (Berkeley Software Distribution चं लघुरूप) म्हणून सुपरिचित झालं.

जगभरातल्या विखुरलेल्या समुदायांमध्ये सहयोगाची, साहचर्याची व देवाणघेवाणीची संस्कृती व प्राथमिक स्तरावरील यंत्रणा आता विकसित होत होती. अशा चैतन्यमय वातावरणात ओपन युगाची पहाट व्हायला सुरुवात झाली होती.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com

Story img Loader