प्रल्हादानं अनन्यभक्ताचं अंतरंग कसं असतं, तेच उघड केलं आहे. तो आपला साधनपथावरचा आदर्श असला पाहिजे. आणखी एक विलक्षण गोष्ट पहा.. हिरण्यकशिपूनं घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेत वर मागितलाच होता. या चराचरातला कुणीही मानव, दानव वा पशू मला कधीही मारू शकणार नाही, इतकं मोठं कवच त्या वरानं त्यानं प्राप्त केलं होतं. त्या वरानं तिन्ही लोकांवर त्याची अर्निबध सत्ता सुरू झाली, पण अखेर? अखेर दैन्यवाणीच झाली आणि त्याचाच पुत्र प्रल्हाद! यानं एकही वर मागितला नाही, पण आपल्या भक्तिप्रेमानं त्यानं भगवंतालाच कायमचं अंकित केलं.. मग तिन्ही लोकांवर त्याच्या प्रेमाची सत्ता आहे, यात काय आश्चर्य? तेव्हा एकानं वर मागून स्वत:चा घात करून घेतला आणि एकानं वर मागण्यातच भक्ताच्या आध्यात्मिक जीवनाचा कसा अंत आहे, हे दाखवून दिलं! रामाशिवाय अन्य काही कामना आहेत का? मग तुम्ही या घडीला भक्त म्हणून वावरत असलात तरी तुमच्या आध्यात्मिक जीवनाची अखेर दैन्यवाणी होण्याचा धोका आहे, हेच प्रल्हाद शिकवत आहे. इथंच ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ९७व्या श्लोकाचा सांधा चपखल जुळतो आहे. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा