मनुष्य जन्म लाभण्याचा मूळ उद्देश कोणता, या दुर्लभ अशा मनुष्य जन्माला येऊन कोणतं परम कार्य माणसानं साधलं पाहिजे आणि ते तो कसं करू शकतो, याचं व्यापक विवरण समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’च्या १०२व्या श्लोकाच्या शेवटच्या दोन चरणांत आहे. हे चरण असे : ‘‘देहे कारणीं सर्व लावीत जावें। सगूणीं अती आदरेंसी भजावें।।’’ आधीच्या पहिल्या दोन चरणांत काय सांगितलं? तर, संतसज्जनांना संतोष होईल असं स्व-भावत: परमभावात लीन झालं पाहिजे. आता परमभावात हे जे लीन होणं आहे ते कसं साधेल, हे या दोन चरणांत मोठय़ा खुबीनं सांगितलं आहे. ‘‘देहे कारणीं सर्व लावीत जावें।’’चा अर्थ काय? तर हा देह भगवंताच्या आणि जीवमात्रांच्या सेवेत राबवावा, असा अर्थ सर्वसाधारणपणे गृहीत धरला जातो. या चरणाकडे नीट लक्ष दिलं तर जाणवेल, समर्थ सांगत आहेत की, सर्व देह कारणी लावा!

आता सर्व देह म्हणजे काय? देह तर एकच आहे ना? पण सनातन तत्त्वज्ञान सांगतं की देह चार आहेत. महाकारण देह, कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देह! जे प्रथमच असं काही वाचत वा ऐकत आहेत, त्यांनी बिचकून न जाता थोडा सूक्ष्म विचार करीत पुढील विवरण पाहावं, अशी विनंती आहे.

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Squids Have Hearts in Their Heads
Animal Has Heart in Head : छातीत नव्हे तर चक्क डोक्यामध्ये आहे ‘या’ प्राण्याचे हृदय, तुम्हाला माहितीये का?
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
enior citizen declared brain dead and his liver donation saved persons life
अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्ण मृत्यूनंतर दुसऱ्याला जीवदान देऊन गेला!
Womans leg cut due to nylon manja needs 45 stitches
अकोला : सावधान! नायलॉन मांजामुळे महिलेचा पाय कापला; तब्बल ४५ टाके…

नीट लक्ष दिलं तर आणि अंतर्मुख होऊन एकूणच जीवनप्रवाहाचा विचार केला तर आकलन सहज साधेल. आता हे चार देह आपण ऐकले.. महाकारण देह, कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देह. यापैकी स्थूल देह तर आपल्या परिचयाचा आहेच. म्हणजे बाहेरून तो आम्हाला माहीत आहे बरं का!

आपलाच हा देह असूनही आणि जन्मापासून त्यातच आपण राहत असूनही त्या देहाच्या आत नेमकं काय आहे, देहांतर्गत रचना नेमकी कशी आहे, तिचं कार्य नेमकं कसं चालतं हे आपल्याला माहीत नाही. ही ‘दृष्टिआडची सृष्टी’ आम्हाला पूर्ण परिचयाची नाही. आपण खातो त्या अन्नाचा घास मुखात ठेवेपर्यंतच आपल्याला दिसतो. त्याचा आतला अन्ननलिकेतला प्रवास, पचन, घाम, रक्त आणि मलमूत्रात त्याचं होणारं रूपांतर जन्मापासून घडत असलं तरी आम्हाला नेमकेपणानं माहीत नाही. या स्थूल देहात काही तरी बिघाड झाला तरच त्या देहाची आपल्याला जाणीव होते.

जर रोजच्या सवयीच्या असलेल्या स्थूल देहाची ही कथा, तर मग सूक्ष्म, कारण आणि महाकारण देह लगेच कळतील, असा दावा नाही. पण थोडा विचार करू, थोडा समर्थाचाच आधार घेऊ. स्थूल देहानंतर जो सूक्ष्म देह आहे ना, त्याची थोडी कल्पना करता येते. आपल्याला देहापेक्षा तीव्रपणे जाणवतं ते मन. किंबहुना मन आहे म्हणूनच ‘मी’ची जाणीव आहे! हे मनच मनन करतं तेव्हा मन म्हणून जाणवतं. चिंतन करतं तेव्हा चित्त होतं. निर्णय करतं तेव्हा बुद्धी बनतं आणि ‘मी’पणानं स्फुरत असतं तेव्हा अहं असतं. हे जे मनन, चिंतन, कल्पना, निर्णयविचार आणि अहंचं स्फुरण आहे ना, ते सारं सूक्ष्म आहे, ते आपलं आपल्यालाच जाणवत असतं. दुसऱ्याशी होणारा आपला व्यवहार, मग तो प्रेमाचा असो की द्वेषाचा असो, त्यामागे जो सुप्त भाव आणि हेतू असतो तो आपला आपल्यालाच माहीत असतो.

हा जो आंतरिक सूक्ष्म वासनापुंज आहे ना तो सूक्ष्म देहाचा मोठा भाग आहे. या देहाच्या वासनातरंगानुसार जे काम, क्रोध, मोह, शोक आणि भय उत्पन्न होतात त्यांची प्रतिबिंबे स्थूल देहाच्या क्रियांमध्येही उमटतात. या स्थूल देहाला लागणारी भूक, तहान, येणारं आळसावलेपण, झोप आणि लैंगिक ऊर्मी या गोष्टी स्थूल देहाच्या असल्या तरी त्यांच्या प्रेरणा या सूक्ष्म देहाशीच जखडल्या असतात. तेव्हा स्थूल आणि सूक्ष्म देहाचा असा अन्योन्य संबंध आहे!

 

 

 

Story img Loader