संतजनांना आणि सज्जनांना संतोष होईल अशी लय परमात्म्यात साधावी. ती साधण्यासाठी जो परमात्म्याशी एकरूप आहे अशा सद्गुरूशी एकरूप होणंच आवश्यक आहे. मनुष्य जन्माच्या या सर्वोत्तम आणि एकमेव ध्येयासाठी सर्व देह कारणी लागावा. त्यातून ‘मी’पणाच्या ज्या वासनेतून जन्म-मृत्यूचा हा पसारा मांडला गेला आहे तो ‘मी’ त्या सद्गुरूंशी अखंड जोडला जाऊन केवळ ‘तू’पणानं भरून जावा. या ध्येयप्राप्तीसाठी सगुण रूपात साकारलेल्या सद्गुरूची भक्ती, अर्थात त्यांच्यापासून कधीही विभक्त न होणं, हाच एकमेव मार्ग आहे. समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’च्या १०२व्या श्लोकाचा हा गूढार्थ आपण विस्तारानं जाणून घेतला. आता सद्गुरूभक्तीच्या या विराट प्रक्रियेचं विवरण ‘मनोबोधा’च्या पुढील श्लोकापासून सुरू होत आहे. त्यातील १०३व्या श्लोकाकडे आता वळू. प्रथम हा मूळ श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ पाहू, मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :

हरीकीर्तनें प्रीति रामीं धरावी।

decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
1st anniversary celebrations of Ram Lalla idol consecration
अयोध्येत रामभक्तांची गर्दी ; रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन सोहळा
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी।

परद्रव्य आणीक कांता परावी।

यदर्थी मना सांडि जीवीं करावी ।।१०३।।

प्रचलित अर्थ : कीर्तनप्रसंगी रामाच्या गुणरूपाविषयी अत्यंत प्रेम धरावे आणि निरूपणप्रसंगी देहबुद्धी पार विसरावी. परद्रव्य आणि परस्त्री यांचा मनातून सर्वस्वी त्याग करावा. कारण सदाचार पाळला जाईल तरच कीर्तनाचा आणि निरूपणाचा उपयोग होईल. नाहीतर परमार्थ लटका होईल. आता मननार्थाकडे वळू. या श्लोकापासून सद्गुरूप्राप्ती आणि भक्तीची वाटचाल खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे.

यात्रेला निघण्याआधी आपण संपूर्ण नकाशा पाहून घेतो ना? वाटेतले टप्पे कोणकोणते, धोक्याची स्थानं कोणकोणती आणि शेवटचं मुक्कामाचं ठिकाण कोणतं, ते कसं आहे, ते कसं गाठायचं, हे सारं आपण जाणून घेतो. तर या टप्प्यावरही आपण ते जाणून घेऊ.

१०३वा श्लोक श्रवण, मनन आणि लौकिक जीवनातील आचरण ही त्रिसूत्री सांगतो. १०४ ते ११५ हे श्लोक आचरण कसं सुधारावं हे सांगतात. ११६ ते १२७ हे श्लोक रामाचं प्रेम हृदयात निर्माण व्हावं, यासाठीच्या कीर्तनाचे अर्थात श्रवणभक्तीचे आहेत. १२८ ते १३० हे तीन श्लोक मननाचं आणि त्यानं साधणाऱ्या संकल्पशक्तीचं महत्त्व सांगणारे आहेत. १३१ ते १४० हे श्लोक सन्मार्गाचं प्रत्यक्ष आचरण आणि त्यात येत असलेला अहंभावाचा अडथळा मांडणारे आहेत. १४१ ते १४४ हे श्लोक खऱ्या सद्गुरूची गरज मांडणारे आहेत. १४५ ते १५० हे श्लोक या सद्गुरू भेटीची तळमळ जागवा, हे विनविणारे आहेत. या सद्गुरू आधारानं काय साधतं, त्या गुरूभेटीत अहंभाव कसा आड येतो, सज्जनांच्या योगे त्याचं निरसन करता येत असलं तरी त्या सत्संगातही अहंकार कसा मोडता घालू पाहातो; याचं विवरण १५१ ते १७३ या श्लोकांत आहे. खरा सद्गुरू कोण, तो काय घडवतो आणि त्याच्यायोगे खरं काय प्राप्त करून घ्यायचं, याचं विवरण १७४ ते २०४ या ३० श्लोकांत आहे. अखेरचा २०५वा श्लोक फलश्रुतीचा आहे.

तर, पुढच्या अंतर्यात्रेचा नकाशा आणि मार्ग हा असा आहे!

 

 

Story img Loader