हिंदी सिनेसृष्टीतला आजचा आघाडीचा दिग्दर्शक व नट फरहान अख्तरने ‘मर्द’ अर्थात Men Against Rape and Discrimination अशी मोहीम सुरू केली आहे. यासाठी फरहानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या कवितेचा मराठी अनुवादही झाल्याचे वाचले. मर्द स्थापन करण्यामागे स्त्री-पुरुष समानता रुजवण्याचा प्रयत्न असल्याचे फरहानने म्हटले आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे यात शंका नाही. पण यानिमित्ताने काही मुद्दय़ांची चर्चा व्हायला हवी. इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे चित्रपटसृष्टीतही स्त्री-पुरुष असमानता दिसून येते. शिवाय इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रात स्त्रियांच्या शोषणाचे प्रमाण अधिक असल्याचे
पण हे होणार नाही. कारण स्त्री-शोषणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सर्वच कमीअधिक प्रमाणात सहभागी असतात. तेव्हा हे करणे सोपे नाही.
या ठिकाणी मावा अर्थात Men Against Violence and Abuse या मुंबई इथल्या स्वयंसेवी संस्थेचा विशेष उल्लेख करावा लागेल. प्रामुख्याने युवकांमध्ये काम करणाऱ्या या संस्थेच्या कामात समुपदेशन, युवा हेल्पलाइन, लिंगभाव जाणीव-जागृती अर्थात gender sensitization, युवा मत्री, युवा संवाद, मानुष अशा अभिनव उपक्रमांचा समावेश आहे. स्त्री-पुरुष समानता- लंगिकता व आरोग्य यावर संवाद घडवून आणण्याचे कार्य युवा मत्रीमार्फत केले जाते; तर लिंगभाव समानतेचे परिपाठ युवा संसदमध्ये दिले जातात. मानुष म्हणजे पुरुषाचे माणूसपणाच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणता येईल. तसेच युवकांसाठी gender and masculinity यावरही उद्बोधन करण्यात येते. ग्रामीण भागात संस्था लिंगभावावर आधारित िहसा या प्रश्नावर प्रामुख्याने कार्य करते. १९९६ पासून ‘माणूसपणाच्या वाटेवरची पुरुष स्पंदनं’ हा दिवाळी अंक प्रकाशित करते.
फरहानच्या मर्दच्या निमिताने, महाराष्ट्र/मुंबईत एक संस्था करीत असलेले मूलभूत कार्यही लोकांसमोर यावे!
– प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक
‘मर्द’च्या मर्यादा आणि ‘मावा’ची स्पंदनं
हिंदी सिनेसृष्टीतला आजचा आघाडीचा दिग्दर्शक व नट फरहान अख्तरने ‘मर्द’ अर्थात Men Against Rape and Discrimination अशी मोहीम सुरू केली आहे. यासाठी फरहानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या कवितेचा मराठी अनुवादही झाल्याचे वाचले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-06-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mard men against rape and discrimination a social campaign