राज्य महिला आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी नागपूर येथील कार्यक्रमात दिलेल्या सल्ल्यावरील ‘वैचारिक दिवाळखोरी’ हा अन्वयार्थ तसेच लोकमानसमधील पत्र (लोकसत्ता, ३० जाने.) वाचले. समाजाच्या कोणत्याही थरावर महिलांवरील अत्याचारास सहानुभूती मिळत नाही. आपला भारतच काय, परंतु अमेरिकेसारख्या देशातही महिलांवरील अत्याचाराकडे गंभीर गुन्ह्य़ाच्या स्वरूपात बघितले जाते. दुर्दैवाने महिलांवर आज राजरोसपणे होणारे अत्याचार ही बाब आता बातमी राहणार नाही की काय अशी भीतीही वाटू लागलीय. परंतु या गंभीर प्रश्नाकडे आपण महिला एकीकडे आणि शासनकत्रे दुसऱ्या बाजूला अशी विभागणी करू पाहतोय.
कायदा सुव्यवस्था यांची चोख व्यवस्था पाहण्याचे काम शासनाचे हे निसंशय. परंतु महिलांच्या अंगावरील अपुरे कपडे अशा गुन्ह्य़ाला कारणीभूत नसून केवळ वखवखत्या नजरा आणि लिंगपिसाटच जबाबदार आहेत. पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत हे सांगणारी मंडळी रोजगारासाठी किंवा अन्य कार्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या युवती व महिलांना कोणता मौलिक सल्ला देऊ इच्छितात? अंग नीटपणे झाकणे हा कपडय़ाचा मुख्य हेतू असताना अंगावरील कमीत कमी कपडय़ाने समाजात कसला संदेश जातो? पुरेसे अंग झाकणारे कपडे घालून बाहेर पडण्याचा दंडक ज्या समाजात आहे, अशा समाजातील युवती व महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण खूप कमी असते. रात्री-बेरात्री रेल्वे स्थानकात, थिएटरबाहेर थिल्लरपणे गप्पा मारताना आपण कोणत्या मानसिकतेचे दर्शन जाणाऱ्या-येणाऱ्यांना घडवतो, याचा विचार मिरगे यांच्या विधानावर तुटून पडणाऱ्यांनी केला पाहिजे.
आशा मिरगे यांनी सामाजिक जाणीव व जबाबदारीतून महिलांबद्द्ल विधान केले आहे असे मला वाटते. संध्याकाळी सातच्या आत घरी, पुरेसे कपडे घालणे यालाच जर मध्ययुगीन समाजाची मानसिकता म्हणून हिणवायचे असेल तर अश्मयुगीन मानसिकता स्वीकारू नका असा आग्रह तरी कोणाचा आहे?
-पद्मा चिकुर, माहीम
मिरगे यांचे विधान सामाजिक जबाबदारीतून
राज्य महिला आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी नागपूर येथील कार्यक्रमात दिलेल्या सल्ल्यावरील ‘वैचारिक दिवाळखोरी’ हा अन्वयार्थ तसेच लोकमानसमधील पत्र (लोकसत्ता, ३० जाने.) वाचले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-01-2014 at 01:41 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mirge statement in social responsibility