मोदी सरकारने प्रथमच प्रचंड रेल्वे भाडेवाढ करून आपल्यावर नामुष्की ओढवून घेतली आहे. ही भाडेवाढ करताना गृहपाठ नीट केला नाही असे म्हणावे लागेल. केवळ एका समितीने केलेल्या शिफारशीनुसार मुंबईकरांचे रेल्वे पास वाढविले व ते दुपटीपेक्षा जास्त वाढविले. सरकार वेगवेगळ्या समित्या नियुक्त करीत असते व त्यांचे अहवाल सोयीनुसार कधीही अमलात आणले जातात. मुंबईकरांच्या पासाचे पुनरीक्षण करून भाडेवाढ करण्यापूर्वी प्रत्यक्षात दोन स्थानकांच्या अंतरातील पासाचे भाडे नक्की कितीने वाढते हे मोदी सरकारच्या हुशार चमूने पहिले असते तर एवढी मोठी भाडेवाढ त्यांनी सुचविली नसती.
मंत्री किंवा अन्य सरकारी तथाकथित उच्चभ्रूंना स्वखर्चाने प्रवास करावा लागत नाही. त्यामुळे त्यांना दैनंदिन पास व अन्य तिकिटांचे दर माहीत असण्याचे कारण नसते. पण जनतेच्या दृष्टीने एखादा निर्णय घेण्यापूर्वी हे पाहणे गरजेचे आहे. आता ही प्रचंड भाडेवाढ लक्षात आल्यावर भाजपचे खासदार मंत्री महोदयांना भेटून ती कमी करण्याची विनंती करून आले आणि आश्वासनानुसार ही वाढ कमी होईलच अशी आशा करावयास हरकत नाही कारण ती अगोदरच अवाजवी होती. मात्र सर्वच बाबतीत हे असेच होत राहिले तर लोकांचा सरकारवरील विश्वास उडावयास वेळ लागणार नाही आणि सरकारने कितीही चांगली कामे केली तरी त्यांचा लोकांवर परिणाम होणार नाही. कारण सामान्य माणसाला दररोजच्या जगण्याचीच भ्रांत असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा