‘थैल्यांची हंडी..’ हे अन्वयार्थ सदरातील स्फुट (३० जुलै) वाचले. दहीहंडी उत्सवावरच बहिष्कार घालण्याचा गोिवदा पथकांचा इशारा म्हणजे राज्य सरकारला वेठीला धरण्याचाच प्रकार आहे, असे मुळीच नाही. उत्सवावर बहिष्कार घालण्याने वेठीला धरले जाईल ते सरकार नव्हे, तर या उत्सवाचे आयोजक, याला पसा पुरवणारे धनदांडगे आणि त्याला बळी पडणारे स्वत: गोिवदा. हे लवकरच संबंधितांच्या लक्षात आले आहे आणि त्यांनी आता उत्सवावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा बदलून सरकारच्या निर्णयावरच बहिष्कार टाकू, असा उद्दाम इशारा दिला आहे.
पूर्वी राजे-महाराजे, संस्थानिक आणि रईसजादे लोक कोंबडय़ांना दाणे टाकून त्यांच्या लढतीचा खेळ स्वत:च्या मनोरंजनासाठी, जुगारासाठी आणि बडेजावासाठी खेळत असत. गोिवदाचे सध्याचे ‘इव्हेंटीकरण’ हा त्याच प्रकाराचा आधुनिक आणि अधिक अमानुष प्रकार आहे. खेळाच्या नावाखाली गरीब तरुणांना मोठमोठय़ा रकमेचे आमिष दाखवून जिवावर उदार व्हायला भाग पडून स्वत:चे मनोरंजन, प्रतिष्ठा, प्रसिद्धी साध्य करण्याचा हा पुंजीपती आयोजक आणि राजकारणी यांचा खेळ आहे. निवडणुकीची पूर्वतयारी हे उद्दिष्टही यातून साधले जाते. शारीरिक कौशल्याचे प्रदर्शन आणि रोखीकरण करण्यासाठी इतर अनेक पर्याय आहेत. गोिवदाच्या या विकृत स्वरूपापेक्षा रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारा, आधी खेळ दाखवून नंतर थाळी फिरवणारा डोंबारी अधिक प्रामाणिक असतो.
शासनाने या प्रकरणात कडक धोरण स्वीकारण्याची गरज आहे. दहीहंडीला पसे लावण्यास किंवा तसे बक्षीस जाहीर करण्यावर सरसकट बंदी घालावी. गोिवदाच्या वयाबरोबरच दहीहंडीच्या उंचीवरही नियंत्रण असणारे कायदे आणि त्याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीचे बाजारीकरण करण्याचा अट्टहास सोडला तरच आपले उत्सव निखळ आनंददायी होऊ शकतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा