शन्नांचे निधन, त्या अनुषंगाने आलेली वृत्ते व ‘आनंदसंप्रदायाचे अधिपती..’ हे संपादकीय (२६ सप्टेंबर) वाचले. ‘शन्ना’ आणि डोंबिवली यांचे नात्यांपलीकडले नाते होते. त्यांच्या या अचानक एक्झिटमुळे डोंबिवलीकरांच्या सांस्कृतिक शहरात नव्हे तर साहित्य क्षेत्रांत नक्कीच पोकळी निर्माण झाली. सदैव स्मितहास्य चेहऱ्याने त्यांनी खऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्र फुलवले. इतकेच नव्हे तर अनेक सांस्कृतिक चळवळीत त्यांच्या योगदानाने या शहराला खऱ्या अर्थाने लौकिक प्राप्त झाला. केवळ साहित्य नव्हे तर अनेक गरजू संस्थांना ते सामाजिक बांधीलकीच्या दृष्टिकोनातून बघून सर्वतोपरी सहकार्य करीत असत. असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आपल्यात नाही याची जाणीव सदैव आपल्या मनांत राहील. म्हणूनच त्यांनी दिलेली प्रेरणा, त्यांचे साहित्य व इतर उपक्रमातील वारसा असाच सदैव पुढे नेणे, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल!
-पुरुषोत्तम आठलेकर, डोंबिवली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा