शिवसेनेसह प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाही असून या घराणेशाहीशी भाजपची लढाई आहे, असे विधान नुकतेच भाजपचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला वाव नाही आणि घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे नुकसान झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार भाषणांमधून सांगत असतात. काँग्रेस किंवा विविध राज्यांमधील प्रादेशिक पक्षांवर कुरघोडीसाठी घराणेशाहीच्या विरोधात भाजपकडून आवाज उठविला जातो. आमच्याकडे घराणेशाहीला अजिबात थारा नाही, असा दावा भाजप नेते करीत असले तरी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपमध्ये घराणेशाही अनुभवास येते. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातही घराणेशाहीची लव्हाळे वाचली आहेत. पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांना घराणेशाहीचा नियम बहुधा लागू नसावा कारण त्यांचे पुत्रच आमदार आहेत. घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठविणारे पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांच्या सासू जयश्री बॅनर्जी यांनी मध्य प्रदेशात भाजप सरकारमध्ये मंत्रीपद तसेच लोेकसभेची खासदारकीही भूषविली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा