हृषीकेश दत्ताराम शेर्लेकर
गेल्या काही लेखांकांत आपण उदयोन्मुख तंत्रज्ञांना (इमर्जिग टेक्नोलॉजिस्)बद्दल जाणून घेत आहोत. तशा प्रकारचे निरनिराळे संशोधन सध्या जगभरातील विविध प्रयोगशाळांत सुरू असून, प्रत्येकाचा आढावा घेणे इथे अशक्यच. परंतु अधिक माहितीसाठी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या संकेतस्थळावरील पुढील दुवा पाहावा : http://www3.weforum.org/docs/WEF_Top_10_Emerging_Technologies_2019_Report.pdf
आता इथून पुढे लेखमालेच्या तिसऱ्या सत्रात- आपण भविष्यातील जग, २०५० पर्यंत माणसाचे आयुष्य कसे बदलून गेलेले असेल, तेव्हाचे राहणीमान, आव्हाने व एकंदरीत परिवर्तनांबद्दल चर्चा करू. पुढील दोन-तीन दशकांत अत्यंत आमूलाग्र, रंजक व काही प्रमाणात घाबरवणाऱ्या शक्यता येऊ घातल्या आहेत. उदाहरणार्थ, ह्य़ुमन ऑर्गन फॅक्टरी, जीनोमिक्समधून निर्माण झालेली ‘डेथ बाय चॉइस’ ही संकल्पना.. आणि त्याच्याउलट अन्नधान्य तुटवडा, त्यावर उपाय म्हणून प्रयोगशाळेत निर्मिलेले मांस/अन्न. वैद्यकीय संशोधन इतके पुढे जाईल, की एके दिवशी मनुष्याचे विविध अवयव प्रयोगशाळेत निर्माण होतील, पालकांमधील आनुवंशिक रोग नवजात बालकांमध्ये येण्याच्या आधीच जनुकीय तंत्रज्ञान वापरून टाळले जातील आणि शेवटी नैसर्गिक पद्धतीने मृत्यूवर मनुष्याने विजय संपादन केल्यावर वेळ येईल ‘स्वत:हून स्वत:चा मृत्यू ठरविण्याची’ संकल्पना.. डेथ बाय चॉइस! पण हे सारे घडेल ते पुढच्या २०-३० वर्षांनंतर. त्यामधून काही सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नही निर्माण होतील. या साऱ्याची या लेखमालिकेच्या तिसऱ्या सत्रात चर्चा करू, पण थोडक्यात. (तर.. लेखमालिकेच्या शेवटच्या चौथ्या सत्रात आपल्या तरुण व बाल पिढीला पुढील अपरिहार्य अशा ऑटोमेशन, रोबोटिक्स नामक परिवर्तनास सामोरे जाण्यासाठी काय-काय उपाययोजना, तयारी, शिक्षण व बदल आतापासूनच अंगीकारावे लागतील, त्याबद्दल मुद्देसूद चर्चा करू.)
२०५० सालात शिरण्याआधी संक्षिप्त रूपात पुन्हा एकदा आपला पृथ्वीवरील एक सामान्य प्राणी ते सायबर-फिजिकल विश्व निर्माण करणारा जगज्जेता मनुष्यप्राणी इथवरचा थक्क करणारा प्रवास, थोडक्यात पाहू या. सर्वात आधी औद्योगिक क्रांती अर्थात- इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन १.० ते ४.० (आयआर १.० ते ४.०) याचा आढावा घेऊ..
(अ) आयआर १.० (इ.स. १७८४) :
– मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक शक्तीचा उगम. त्याआधी मानवाचा फक्त स्वत:चे व प्राण्यांचे शारीरिक बळ वापरण्याकडे भर होता.
– वाफेवरील इंजिन, जलशक्ती, कोळशातून ऊर्जा व त्यावर चालणारी उपकरणे निर्माण झाली.
– प्रवासाची नवीन साधने निर्माण होऊन जग एकमेकांच्या जवळ येऊ लागले.
– फॅक्टरी, कारखाने इत्यादी सुरू झाले.
(ब) आयआर २.० (इ.स. १८७०) :
– या टप्प्यात इलेक्ट्रिकल म्हणजे विद्युतशक्तीचा उगम. त्याआधी मानवाचा फक्त यांत्रिक शक्ती आणि अर्थातच स्वत:चे व प्राण्यांचे शारीरिक बळ वापरण्याकडे भर होता.
– विजेवरील बल्ब, इलेक्ट्रिक मोटार, आदींची निर्मिती.
– कृत्रिम प्रकाश निर्माण करण्याच्या शोधामुळे माणसाचे राहणीमान आमूलाग्र बदलले.
– स्वयंचलित उपकरणांचा शोध, यंत्रे हाताळणे सोपे होऊ लागले.
– विद्युत उपकरणांमुळे कारखान्यांची प्रचंड प्रमाणात उत्पादकता वाढीस लागून असेम्ब्ली लाइन इत्यादी सुरू झाले.
(क) आयआर ३.० (इ.स. १९६९) :
– इलेक्ट्रॉनिक शक्तीचा उगम. मूलभूत कण, अणू-रेणूवर मनुष्याचे नियंत्रण. तोवर मानवाचा विद्युत-यांत्रिक शक्ती आणि अर्थातच स्वत:चे व प्राण्यांचे शारीरिक बळ वापरण्याकडे भर होता.
– त्यातून मग संगणकाचा शोध व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार होऊ लागली.
– टेलिकॉम म्हणजे दूरसंचार सेवा सुरू होऊन दूरस्थ माणसांशी बसल्या जागी बोलता येऊ लागले.
– अवजड, शारीरिक कार्याचे स्वयंचलन (ऑटोमेशन) सुरू झाले.
– भौतिक जगाच्या जोडीला एका नवीन आभासी (व्हच्र्युल) विश्वाची मुहूर्तमेढ रचली गेली.
(ड) आयआर ४.० (सध्या) :
– संगणकीय शक्तीची अत्यंत झपाटय़ाने वाढ होऊन सर्वत्र डिजिटल तंत्रज्ञानाचा आविष्कार.
– एका सायबर-फिजिकल विश्वाची निर्मिती, ज्यामध्ये आधीच्याच भौतिक विश्वासोबत एका पर्यायी, समांतर व नव्या सायबर विश्वाचे निर्माण.. ज्याला ‘डिजिटल युग’ असेदेखील संबोधतात.
– मनुष्याच्या प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीला शक्य असेल तिथे डिजिटल पर्यायाची निर्मिती.
– मोबाइल, स्मार्टफोन नामक उपकरणांमुळे जणू ‘दुनिया मुठ्ठी में’ आली.
– कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), वस्तुजाल (इंटरनेट ऑफ थिंग्ज), विदा विश्लेषण (डेटा-अॅनालिटिक्स) आदी शोधांमुळे अनेक नवीन गोष्टी शक्य.
– प्रचंड डिजिटल विदेची निर्मिती होत आहे. गेल्या दोन दशकांत म्हणे जगातील ९५ टक्के विदा ‘डिजिटल’ स्वरूपात उपलब्ध झाली.
– प्रचंड प्रमाणात संगणकीय शक्ती, विदा साठवण (डेटा-स्टोरेज) आदी वाजवी दरात क्लाऊडवर उपलब्ध झाले व आपल्या हातातील उपकरणांचे आकार छोटे होऊ लागले आहेत.
– मानवी इतिहासात सर्वप्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता बहाल केलेल्या बुद्धिमान यंत्राचा उदय.
..आणि औद्योगिक क्रांतीच्या वरील टप्प्यांव्यतिरिक्त मानवी उत्क्रांतीमधील काही महत्त्वाचे शोध खालीलप्रमाणे :
(१) आग (चार ते दहा लाख वर्षांपूर्वी)
(२) शिजवलेले अन्न (इ.स.पूर्व २० हजार वर्षे, चीनमध्ये)
(३) निवारा, घर (इ.स.पूर्व दहा हजार वर्षांपूर्वी, जेव्हा शेतकरी गावे वसवू लागला.)
(४) शेती (इ.स.पूर्व १० हजार वर्षे)
(५) चाक (इ.स.पूर्व ३,५०० वर्षे), पूर्वकालीन वाहन (इ.स.पूर्व चार हजार वर्षे), जलवाहतूक (इ.स.पूर्व दीड ते तीन हजार वर्षे)
(६) धातू (इ.स.पूर्व नऊ हजार वर्षे तांबे, कांस्य; इ.स.पूर्व तीन हजार वर्षांपूर्वी लोखंड)
(७) कागद, शाई (इ.स.पूर्व १०० वर्षे, चीनमध्ये) छपाई (इ.स. १४४०)
(८) नकाशे (इ.स. १५०७)
(९) चलन, नाणी (इ.स.पूर्व पाच हजार वर्षे)
(१०) होकायंत्र व त्यावरून सुरू झालेल्या जागतिक शोधमोहिमा, नवीन खंडांचे व देशांचे शोध (इ.स.पूर्व दुसरे शतक, चीनमध्ये)
(११) कृत्रिम थंडी, प्रशीतक (रेफ्रिजरेशन) उपकरणे आणि अन्न साठवण्याच्या पद्धतींमध्ये स्थित्यंतर (इ.स. १७५० च्या सुमारास)
(१२) नळ, पाणी वाहतूक, मोऱ्या व प्लम्बिंग (इ.स.पूर्व तीन हजार वर्षे, भारतात)
(१३) औषधे आणि विविध वैद्यकीय उपकरणे (इ.स.पूर्व ३७०)
(१४) गन-पावडर व दारूगोळा (इ.स.पूर्व नववे शतक, चीनमध्ये)
(१५) कॅमेरा (इ.स. १८८५)
(१६) आण्विक शक्ती (इ.स. १९३४)
ही यादी आणखी बरीच लांबवता येईल; पण जगभरातील मान्यवरांच्या म्हणण्यानुसार सर्वात महत्त्वाचे आणि आपले मानवी राहणीमान पूर्णपणे बदलून टाकणारे विषय नोंदले आहेत. थोडी गंमत म्हणून विचार करून बघा, वरील काही गोष्टी जगात नसत्याच तर आपले सध्याचे आयुष्य कसे असते, ते! उदा. विजेचा विचार करू या. ज्या विजेला आपण जगण्याची मूलभूत गरज मानतो, तीच एके काळी मनुष्याला कल्पनेतही ठाऊक नव्हती!
औद्योगिक क्रांती ५.० काय असू शकेल?
(१) माणूस आणि यंत्राचा एकत्रित वावर असलेले जग?
(२) डेथ बाय चॉइस.. म्हणजेच माणसाचा नैसर्गिक मृत्यूवर विजय?
(३) अंतराळातील वसाहत, टाइम ट्रॅव्हल?
(४) उडणाऱ्या गाडय़ा?
(५) सामान्य कृत्रिम बुद्धिमत्ता की परम-बुद्धिमत्ता? काय असेल कृत्रिम बुद्धिमत्तेची शेवटची पायरी?
पुढील लेखात पाहू या- औद्योगिक क्रांतीपूर्व आणि मानवी उत्क्रांतीमधील काही महत्त्वाच्या शोधांच्या खोलात शिरून आपण इथपर्यंत कशी मजल मारलीय, याचा रंजक इतिहास आणि काही विस्मयकारक साम्य!
लेखक टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
hrishikesh.sherlekar@gmail.com