|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर
वस्तुजाल किंवा ‘आयओटी’ आजही वापरले जाते आहे, त्याची व्याप्ती वाढते आहे आणि आव्हाने असली तरी उपायही आहेत. येणारा काळ हा वस्तुजालाचा आहे.. तो आपण साऱ्यांनीच घडवायचा आहे!
इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) म्हणजेच वस्तुजालाबद्दल आपण मागील काही लेखांतून माहिती करून घेतली, त्या मालिकेतील शेवटचा लेख आजचा. अर्थात, मानवी व्यवहार सुकर करण्यासाठी वस्तुजाल वापरून इतक्या विविध शक्यता (आयओटी सोल्यूशन्स) आहेत, की त्या सर्वाची नोंद करायची म्हटल्यास पुढील अनेक लेख खर्ची पडतील, इतकी त्यांची व्याप्ती. तरीही उजळणी म्हणून काही प्रसिद्ध आणि बऱ्याच अंशी आपल्या देशात कुठे ना कुठे प्रत्यक्ष राबविण्यात आलेल्या आयओटी सुविधांचे प्रकार, त्यांचे इंग्रजीत सहसा केले जाणारे वर्णन आणि त्यांची उदाहरणे इथे पाहू.
(१) ‘स्मार्ट होम’ : अलेक्सा, गूगल होम आणि असे विविध आयओटी प्लॅटफॉर्म वापरून घरातील इलेक्ट्रिक उपकरणे- जसे पंखा, लाइट, दरवाजा, म्युझिक सिस्टीम आदींवर मोबाइलद्वारा नियंत्रण आणि देखरेख.
(२) उद्योग ते ग्राहक : ‘स्मार्ट रीटेल’, दूरनियंत्रणशील उपकरणे (उदा. कनेक्टेड एसी, फ्रिज, टीव्ही, इत्यादी), तसेच मोठय़ा श्रेणीतील किराणा दुकानांत आयओटी संवेदकांद्वारा मालाच्या साखळी प्रक्रियेवर स्वयंचलित पद्धतीने देखरेख व नियंत्रण.
(३) ‘स्मार्ट होम सिक्युरिटी’ : हल्ली बऱ्याच विकासकांनी महागडय़ा इमारतींमध्ये या दूरनियंत्रित, स्वयंचलित सुरक्षा सुविधा पुरवणे सुरू केले आहे.
(४) ‘स्मार्ट हेल्थ’ : रुग्णाची काळजी/ देखरेख इ. (उदा. काही रुग्णालय-समूह रुग्ण घरी गेल्यानंतरही त्यांच्यावर २४ तास आयओटी हेल्थ सेन्सर्सद्वारा स्वयंचलित पद्धतीने देखरेख ठेवतात आणि गरज पडल्यास तातडीने सेवा देतात.), याखेरीज ‘कनेक्टेड हेल्थ’ वा सर्व नागरिकांची माहिती आणि सर्व रुग्णालयांतील सुविधा यांचा ताळमेळ.
(५) ‘स्मार्ट कार’ : ‘हॅलो एमजी’ गाडीची जाहिरात आपण ऐकली/ पाहिली असेल. तसेच हल्लीच्या नवीन श्रेणीतील गाडय़ांमध्ये आयओटी सुविधा दिसू लागल्या आहेत.
(६) ‘स्मार्ट एनर्जी’ : ऊर्जा बचत, देखरेख व वेळेआधीच दुरुस्ती.
(७) ‘स्मार्ट मॅन्युफॅक्चिरग’ : अवजड उद्योग व उत्पादन, अवजड यंत्रांना वस्तुजाल संवेदक जोडून त्यांची स्वयंचलित पद्धतीने देखरेख, नियंत्रण आणि गरज पडल्यास वेळेआधीच दुरुस्ती, धोक्याची सूचना आदी.
(८) ‘स्मार्ट फ्लीट’, ‘स्मार्ट ट्रान्सपोर्ट’ : विमान वा जलवाहतूक कंपन्या, वाहतूक उद्योगातील ट्रेलर आणि ट्रक्स आदी वाहनांना वस्तुजाल संवेदक जोडून त्यांची स्वयंचलित पद्धतीने देखरेख, नियंत्रण आणि गरज पडल्यास वेळेआधीच दुरुस्ती करणे, धोक्याची सूचना देणे आणि मालाची नासाडी टाळणे.
(९) ‘स्मार्ट सिटी’ : सार्वजनिक स्थळांसाठी ‘स्मार्ट’ सुरक्षा आणि देखरेख, इत्यादी.
(१०) ‘स्मार्ट अॅग्रिकल्चर’ : उदाहरणार्थ, शेतजमिनीतील ओलावा/ आद्र्रता, क्षार, खतांचे प्रमाण आदींचे ‘हीट मॅप’द्वारा प्रत्यक्षदर्शन, स्वयंचलित छाननी आणि गरज आहे तिकडेच आणि गरज आहे तेव्हाच पाणी, खतांचा वापर,
(११) ‘स्मार्ट’ शिक्षण : दूरच्या गावांतही, शिक्षकाविना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अध्ययन गतीनुसार शिक्षण.
या अकरांपैकी पहिल्या चार प्रकारच्या सुविधा ‘उद्योग ते ग्राहक’ या वापर-गटात येतात; तर पुढील चार सुविधांचा वापर-गट ‘उद्योग ते उद्योग’ असा आहे. ‘स्मार्ट सिटी’ आदी प्रकारच्या सुविधांच्या वापर-गटाला ‘सरकारी व सार्वजनिक प्रकल्प’, तर ‘स्मार्ट अॅग्रिकल्चर’ आदी प्रकारच्या सुविधांच्या वापर-गटाला ‘सामाजिक प्रकल्प’ असे म्हटले जाते. मात्र या प्रत्येक वापर-गटासाठी, आयओटी प्रकल्प अमलात आणताना अनेक अडचणी येऊ शकतात. प्रमुख आव्हाने (आणि त्यांचे उपाय) खालीलप्रमाणे :
(अ) बदलाचे व्यवस्थापन : प्रस्तावित बदलाला होणारा विरोध, नवीन गोष्टीची भीती आणि ‘आहे तसेच चालू देऊ या ना’ अशी मानसिकता. असल्या प्रकारचे आव्हान तंत्रज्ञान सोडाच, पण कुठल्याही नवीन प्रकल्पात घरोघरी, कार्यालयांत असतेच. सर्वात वरिष्ठ अधिकारी/ पुढारी/ कुटुंबप्रमुखाची भूमिका, त्या जोडीला बदलाकडील प्रवास व्यावसायिक पद्धतीने हाताळणारे अनुभवी सल्लागार आणि सर्व थरांतील लोकांशी (ग्राहक, कर्मचारी, भागीदार) योग्य व नियमित संवाद आणि मुख्य म्हणजे, ज्यांच्या कामाच्या स्वरूपात आयओटी प्रकल्पामुळे बराच बदल संभवतो, त्यांच्यासाठी खास ‘बदल-व्यवस्थापन कार्यक्रम’ राबवणे.. असे काही उपाय नक्कीच केले जातात.
(आ) विदा-व्यवस्थापन (डेटा मॅनेजमेंट) : वस्तुजाल तंत्रज्ञानामध्ये लाखो प्रकारचे संवेदक असू शकतात. प्रत्येक जण गरजेनुसार बाजारात उपलब्ध असलेले सेन्सर्स वापरतात किंवा स्वत:च इलेक्ट्रॉनिक सर्किट जोडून नवीन तयार करतात. त्यातून निर्माण झालेली विदा इतर सिस्टीम्सना बरेचदा, वेगवेगळ्या ‘फॉरमॅट’मुळे समजत नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न- इतकी भरमसाट विदा हाताळण्याचा खर्च आणि सामग्री प्रचंड.
म्हणूनच आयओटी तंत्रज्ञान एका ठरावीक उपाययोजनेसाठी वापरल्यास वरील आव्हाने फारशी जाणवत नाहीत. जसे- अख्ख्या कारमध्ये वाहनाविषयीची सर्व विदा पुढे पाठवण्यासाठी एकच आयओटी संवेदक लागलेला असतो; पण स्मार्ट-सिटीसारख्या प्रचंड व्याप्तीच्या प्रकल्पात विविध सेन्सर-हार्डवेअर आणि त्यांची एकमेकांशी जोडणी व संवाद असल्याने अडचणी येतात. अर्थातच, जागतिक पातळीवर सर्वव्यापी ‘आयओटी डेटा-एक्स्चेंज प्रोटोकॉल’ निर्माण झाले आहेत, म्हणजेच ‘पद्धतींची रीत’ घालून दिली गेल्यामुळे पुढील वाटचाल सुटसुटीत नक्कीच होणारेय.
(इ) दूरस्थ जोडण्या : दूरच्या किंवा निर्जन स्थळी बॅटरीवर चालणारी आयओटी उपकरणे लागतात. त्यातच, इतका डेटा सतत नेटवर्कद्वारा क्लाऊड-आयओटी-प्लॅटफॉर्मला पाठवत राहायचा म्हणजे कायमचा खर्च. या दूरस्थ नेटवर्कची कार्यक्षमता कमी असते. मात्र दिवसेंदिवस इथेही सुधारणा होते आहे. येऊ घातलेल्या ‘फाइव्ह-जी नेटवर्क’मुळे आमूलाग्र बदल घडण्याची शक्यता दिसते आहे.
(ई) नियम व कायदे : हल्लीच आपल्या देशात भारतात निर्माण झालेला डेटा भारतातच राहावा अशा दृष्टीने पावले उचलायला सुरुवात झालीय, तसेच कायदे युरोपातील ‘जीडीपीआर’मुळे लागू झाले आहेत- म्हणजे त्यांचा डेटा तिथल्याच देशात राहावा असा नियम. आयओटी तंत्रज्ञानासाठी विशिष्ट कायदे अजून तरी बनायला काही वेळ लागणार आहे, तेही जागतिक पातळीवर. तोपर्यंत परिस्थिती काहीशी गोंधळाचीच आहे असे म्हणावे लागेल.
(उ) विदेचा खासगीपणा व सुरक्षा : इथला प्रमुख मुद्दा म्हणजे, आयओटी डेटा हा वैयक्तिक असू शकतो. सर्वोत्तम उदाहरण म्हणजे- गाडीचालकाच्या गाडी चालवण्याच्या सवयी त्याच्या वाहन कंपनीला ठाऊक आहेत, पण त्यांनी तोच डेटा जर वाहन-विमा कंपनीला विकला तर? तसेच तुम्ही-आम्ही घातलेल्या हेल्थ-बँडमधील वैयक्तिक डेटा त्यांनी आयुर्विमा कंपन्यांना विकला तर? तिसरा मुद्दा म्हणजे, हे तंत्रज्ञान इतके नवीन असल्यामुळे सुटसुटीत कायदे व नियम बनायला अजून बराच कालावधी आहे; तोपर्यंत कुणाचा डेटा कोण मिळवतोय, कोण वापरतोय आणि कोण त्याचा नक्की मालक, असे मूलभूत प्रश्न आहेतच.
एक मात्र खरे की, पुढील दोन-तीन दशकांत या पृथ्वीतलावर असतील नऊ ते दहा अब्ज माणसे अधिक १०० अब्ज आयओटी सेन्सर्स जे सतत एकमेकांशी संपर्क ठेवून ‘मॅन (नैसर्गिक बुद्धिमत्ता) + मशीन (कृत्रिम बुद्धिमत्ता)’ विश्वाची नांदी ठरतील! असो. आज इंटरनेट-ऑफ-थिंग्ज (आयओटी) या भागाचा शेवट तुम्हाला काही प्रश्न विचारून करतो आहे. अपेक्षा एवढीच की, तुमच्यातील कल्पकतेला चालना मिळावी आणि तुमच्याकडूनही काही तरी नवीन शिकायला मिळावे.
(१) तुमच्या घरात, कार्यालयात आयओटी तंत्रज्ञान वापरून कुठली महत्त्वाची समस्या तुम्ही सोडवू शकाल? त्याने कोणाला, कसा, कुठला फायदा होईल? गुंतवणुकीचा परतावा कसा ठरवाल? (२) वरील तंत्रज्ञान अमलात आणताना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात? एकंदरीत आयओटी सोल्यूशन कशा स्वरूपाचे असेल? (३) वरील तंत्रज्ञान अमलात आणताना व कार्यान्वित केल्यावर कुठल्या महत्त्वाच्या अडचणी, आव्हाने येऊ शकतील? त्यावर काय उपाययोजना करू शकाल? (४) ‘डिजिटल री-इमॅजिनेशन’ची संकल्पना वापरून वस्तुजाल तंत्रज्ञानाद्वारा तुमच्या सध्याचा व्यवसाय/ कार्यक्षेत्र कशा प्रकारे वृद्धिंगत करता येईल?
तुमच्या प्रतिक्रिया व विचार मला जरूर कळवा. या प्रश्नांवर तांत्रिक उत्तर अर्थातच अपेक्षित नसून फक्त व्यावहारिक शक्यता मांडाव्यात. लक्षात असू द्या की, वस्तुजालाचा येणारा काळ हा आपण सारे मिळूनच घडवणार आहोत!
लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
hrishikesh.sherlekar@gmail.com