|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजार, निदान, शक्यता, उपचार यांच्या जगड्व्याळ माहितीवर ‘कृत्रिम प्रज्ञे’ची प्रक्रिया होऊ लागली, तर?
हॅलोऽ, मी डॉ. मानसी, तुमची ‘व्हर्च्युअल’ मेडिकल असिस्टंट बोलतेय.. तुम्ही आपल्या आरोग्याविषयी प्रश्नांसाठी, आजाराचे निदान आणि उपचारांची शिफारस करण्यासाठी माझ्याशी बोलण्यास इच्छुक आहात? आताच तुमच्या मनगटातील ‘कनेक्टेड’ हेल्थबॅण्डद्वारा ‘डाऊनलोड’ केलेल्या डेटामध्ये मला फारसं काही वावगं आढळलं नसलं तरी तुमच्या स्थिर ‘हार्ट रेट’वरून दिसतंय की, गेल्या तीन दिवसांत तुम्ही काहीच ‘फिजिकल अॅक्टिव्हिटी’ किंवा व्यायाम नाही केलाय.. आणि हो खाण्याचा ‘इनटेक’सुद्धा लॉग नाही केलाय..
..एव्हाना वाचकांना कळलंच असेल, आजचा लेख आरोग्यक्षेत्र व ‘एआय’ (आर्टिफिशिअल इंटलिजन्स किंवा कृत्रिम प्रज्ञा) यावर असणार आहे! पण जगातील किती टक्के लोक भविष्यात अशा मोबाइल, लॅपटॉपमधल्या डिजिटल डॉक्टरशी बोलायला उत्सुक असतील? बारीकसारीक सल्ले ठीक; पण रोगनिदान आणि उपचारांची शिफारस? समजा तयार झालाच तर फक्तस्वत:साठी की लहानग्यासाठीदेखील? किंवा तुम्ही रोबोटिक सर्जरीला तयार असाल, छोटीशीच का असेना?.. याच प्रश्नांवरील जनमत युरोपीय देशांमध्ये हल्लीच घेण्यात आले, त्यात जवळजवळ ४० टक्के लोकांनी होकारार्थी मत दिलंय. एक नक्कीच लक्षात येतं की सध्याची तरुण पिढी आपल्या आरोग्याबद्दल ‘रिअॅक्टिव्ह- निष्क्रिय’ न राहता बऱ्याच प्रमाणात ‘प्रोअॅक्टिव्ह- सक्रिय’ झालीय. दिवसेंदिवस यात वृद्धही सहभागी होताहेत आणि त्याला बऱ्याच अंशी करणीभूत आहे डिजिटल तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेली साधने व ज्ञान आणि महत्त्वाचं म्हणजे जागरूकता.
प्रथम थोडं मागे वळून पाहू. वैद्यकीय क्षेत्राची तीन प्रमुख कालावधींत मांडणी करायची म्हटल्यास खालील प्रकारे वर्गीकरण करता येईल :
(१) मागील दशक व त्याआधी – एकंदरीत ‘हॉस्पिटल व आजार’केंद्रित उपचारपद्धती. ‘रिअॅक्टिव्ह’ प्रकारची विचारसरणी.
(२) सध्याचे दशक – आजार हा शब्द बाद होऊन ‘हेल्थ’, ‘वेलनेस’केंद्रित ‘रिअल-टाइम’ उपचारपद्धती. वैद्यकीय ज्ञान, वैयक्तिक हेल्थबॅण्ड व इतर उपकरणे यांचा प्रसार, प्रेडिक्शन व प्रिव्हेन्शन म्हणजे अंदाज आणि वेळीच प्रतिबंध यांवर भर.
(३) पुढील दशक – मेडिकल ‘इंटेलिजन्स’, अॅनालिटिक्स आणि सेल्फ-हेल्प म्हणजे डेटा व बायो-डिव्हायसेस वापरून वैयक्तिक वैद्यकीय देखरेख, चाचण्या, निदान व प्राथमिक उपचार शिफारस तुमच्या हाताशी. ‘काय झालंय’पेक्षा काय होऊ शकते व काय खबरदारी घ्यावी, तुमचे मेडिकल रिपोर्ट आणि जनतेच्या डेटाचे तुलनात्मक विश्लेषण, अशा प्रकारची ‘प्रिव्हेन्टिव्ह’ विचारसरणी. प्रेडिक्शन व प्रिव्हेन्शन यांबरोबरच डेटा बेस्ड प्रिस्क्रिप्शन, म्हणजे आधीच काय उपाययोजना करा, इतर काय करताहेत यावर भर.
डेटा अॅनालिटिक्समुळे काय काय उपयुक्त माहिती निर्माण होऊ शकते याबद्दल एक उत्तम उदाहरण. आपण हल्ली बरेच जण फिटनेस बॅण्ड हातात घालतो, त्यात आपले हार्ट रेट, बीएमआय, वजन, कॅलरी, फिजिकल अॅक्टिव्हिटी, झोप इत्यादी २४ तास मोजले जाते. फिटबिट या कंपनीने, जगभरातील एक कोटी लोकांचा काही वर्षांचा डेटा (सुमारे १५० अब्ज तासांचा हार्ट रेट डेटा) वापरून विविध कल (ट्रेण्ड्स) आणि विश्लेषण मिळवले. त्यातून अत्यंत मनोरंजक, तितकीच उपयुक्त अशी वैद्यकीय माहिती बाहेर आली; जी आतापर्यंत कुठेही उपलब्ध नव्हती. वयोगट, देश, िलग आणि हार्ट रेट असे विविध आलेख, फिजिकल अॅक्टिव्हिटी, झोप, बीएमआयवरून बदलणारा हार्ट रेट आणि मुख्य म्हणजे हार्ट रेट योग्य पातळीवर असणाऱ्यांची लाइफस्टाइल, तेदेखील जगभरातील एक कोटी लोकांची सरासरी म्हटल्यावर आक्षेप घ्यायला जागाच नाही. त्यातील एक आलेख असे दाखवतो की सर्वात कमी हार्ट रेट असणाऱ्या माणसांची सरासरी झोप दिवसाला सात तास होती. त्यापेक्षा कमी झोपणारे व जास्त, दोन्हीकडे तो वर गेलेला होता. काही म्हणतील यात नवीन काय ते, डॉक्टरही हेच सांगतात! पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघायचे तर – माझा हार्ट रेट सध्या किती? माझ्या वयाच्या माणसांची जागतिक सरासरी किती? तो सर्वात योग्य असणाऱ्यांची जीवनशैली अभ्यासून मी स्वत:मध्ये काय काय बदल करू शकतो हे तर नक्कीच कळते. त्याशिवाय होणारी प्रगती योग्य दिशेने होतेय का हेदेखील आपण दररोज मॉनिटर करू शकतो. अधिक महितीसाठी : https://www.digitaltrends.com/health-fitness/fitbit-resting-heart-rate-study/
डिजिटल तंत्रज्ञान मग ते अॅनालिटिक्स असो की कृत्रिम बुद्धिमत्ता, हल्ली मुबलक प्रमाणात आणि वापरकर्त्यांसाठी वाजवी दरांतही उपलब्ध होत आहे. पण अभाव आहे तो वरील प्रकारच्या डेटाचा- तोही जागतिक पातळीवर प्रचंड प्रमाणात व तितकाच अचूक, खराखुरा डेटा. भविष्यात वेअरेबल बॅण्डस, इन्सर्टिबल बायो-डिव्हायसेस अशा वैयक्तिक वैद्यकीय उपकरणांचा वापर सर्रास वाढेल आणि सध्या फक्तउच्च मध्यम वर्गाला परवडणाऱ्या किमतींमध्ये लक्षणीय घट होईल.
जागतिक संशोधनानुसार, भविष्यातील वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञा व रोबोटिक्स आमूलाग्र बदल घडवून आणू शकतील असे पाच महत्त्वाचे ट्रेंडस:
(१) पारंपरिक उपचार पद्धती वि. वैद्यकीय आव्हाने – जगभरात वैद्यकीय सेवाक्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक कुठे झाली असेल तर ती ‘हॉस्पिटल व आजार’केंद्रित उपचारपद्धतीमध्ये. पण हल्लीची महागाई, वैद्यकीय खर्च, जुनाट रोग व दीर्घकालीन उपचार, आयुष्याच्या शेवटपर्यंत सेवा व मर्यादित पायाभूत सुविधा अशी एका बाजूची आव्हाने, तर दुसऱ्या बाजूला नवीन पिढी, ‘प्रोअॅक्टिव्ह वेलनेस’साठी लागणारे तंत्रज्ञान, तज्ज्ञ व संस्था यांचा मर्यादित पुरवठा अशा स्थितीत, नवीन सुविधा पुरविणाऱ्या सेवाक्षेत्राची प्रचंड प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. एका बाजूला नवनवीन मेडिकल प्रॉडक्टस, औषधे, उपचार, डॉक्टर – हॉस्पिटले, वैयक्तिक बायो-डिव्हायसेस यांत झपाटय़ाने वाढ होते आहे, पण हे अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवणाऱ्या, सेवा देणाऱ्या संस्थांची कमालीची कमतरता आहे आणि म्हणूनच एकंदर साखळी अपूर्ण राहते. मी इथे ग्राहक म्हणतोय, पेशंट नाही कारण आजारी पडायच्या आधी व बरा झाल्यानंतर सेवा पुरविली जाईल. भारतात हल्लीच आलेल्या ‘हेल्थिफायमी’सारख्या स्टार्ट-अपचा विस्तार यामुळे होत असावा.
(२) मेडिकल डेटामध्ये लक्षणीय वाढ – वैद्यकीय डेटा झपाटय़ाने वाढतोय, डिजिटल पद्धतीने साठवला जातोय. एंड-यूजर डेटा, रिसर्च अहवाल, फार्मा व क्लिनिकल डेटा, इन्शुरन्स क्लेम्स, लोकसंख्या व इतर सरकारी डेटा, हॉस्पिटल-डॉक्टरकडून, चाचण्या व लॅबमधून अशा विविध प्रकारांनी प्रचंड माहिती उपलब्ध होते आहे. ती पूर्वीही होत होतीच म्हणा; पण हा सर्व डेटा एकत्रितपणे जोडून मग त्याचे विश्लेषण व प्रसार, वापर हे नव्यानेच होते आहे. यापैकी ८० टक्के डेटा ‘अन-स्ट्रक्चर्ड’ असल्यामुळे पारंपरिक सॉफ्टवेअर इथे कामी येत नव्हती, पण एआयच्या प्रसाराने ती उणीवही भरून निघाली.
(३) माहिती तंत्रज्ञानाचा मेडिकल क्षेत्रामधे वाढता प्रसार – पूर्वी या क्षेत्रात फक्तफार्मा व मेडिकल उपकरणे बनविणाऱ्या कंपन्या, हॉस्पिटल संस्था जास्त करून गुंतवणूक करत. आता आयटी कंपन्या, टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स या क्षेत्रात (प्रामुख्याने सेवा-पुरवठा व डेटा संबंधित व्यवसायात) प्रचंड गुंतवणूक करताहेत.
(४) मेडिकल माहिती, डेटाचे लोकशाहीकरण – माहिती, ज्ञान, अनुभव यांद्वारे डॉक्टर वा कुठलाही व्यावसायिक आपले काम करत असतो. हीच वैद्यकीय माहिती ‘डिजिटल’ स्वरूपात सर्वाना समजेल, वापरता येईल अशी उपलब्ध झाली तर? अचूक निदान व उपचार शिफारस करण्याचे वैद्यकीय ज्ञान सॉफ्टवेअरमध्ये आणता आली तर? असे सॉफ्टवेअर म्हणजेच जगभरच्या डॉक्टरांनी केलेल्या कोटय़वधी निदानांचा डेटा वापरणार म्हणजेच लोकल डॉक्टरपेक्षा किती तरी जास्त अनुभव त्यात उपलब्ध असणार. अशी अद्ययावत एआय बेस्ड सॉफ्टवेअर तुमच्या-आमच्या वापर-कक्षेत आली तर? उदाहरणार्थ काय होतेय ती लक्षणे एंटर करा, मग लगेचच कुठल्या चाचण्या कराव्या लागतील, काय काय आजार असू शकतील, जगात कुठले उपचार जास्त प्रभावी ठरलेयत, कुठले बेस्ट रेटिंगचे डॉक्टर आहेत जवळपास.. ही सर्व माहिती आपल्या मोबाइलवर घरबसल्या. भविष्यातील वाटचाल एकंदर याच दिशेने चाललीय याबाबत कोणाचेच दुमत नसावे बहुतेक.
(५) सामान्य जनतेची इच्छा, जागरूकता – परंतु वरील सर्व शक्य होऊ शकेल फक्तआपल्या सामान्यांच्या अनुमतीमुळे, स्वीकारीकरणामुळे. शहरातले आपण म्हणू, ‘नको बाबा, आमचे लोकल डॉक्टरच बरे’. कितीही प्रगती झाली तरी डॉक्टरची गरज सरणार नाही याबद्दल दुमत नसावे, पण जिथे डॉक्टरच नाहीत तिथे? किंवा परवडण्यासारखे, अत्यंत कमी संख्येत उपलब्ध आहेत तिथे? आणि डॉक्टरकडे आपण आजारी पडल्यावरच जातो, इतर वेळी?
एक मात्र नक्की की येणारा काळ हा फक्तडॉक्टर- पेशंटपर्यंत सीमित राहणार नसून ‘माणूस – मशीन – डेटा – डॉक्टर’ असा असेल.
पुढील लेखात वैद्यकीय क्षेत्रात एआय व रोबोटिक्समुळे निर्माण झालेल्या नवीन शक्यता बघू.
hrishikesh.sherlekar@gmail.com
लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.