काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला हे खूप आजारी होते. पण उत्तरोत्तर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. काही दिवसांनी तर ते घरीही गेले. येत्या काही दिवसांत ते हिंडू-फिरू लागतील.. सभा-संमेलनांमधून भाषणंही करू लागतील, अशीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा असेल.
‘लाँग वॉक फॉर फ्रीडम’ हे त्यांचं आत्मचरित्र जगभर गाजलं. त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवादही प्रकाशित झाले. त्यांची छोटी-मोठी चरित्रंही आजवर प्रकाशित झाली .
वय वर्षे ९५ असलेल्या मंडेलांनी विसाव्या शतकातल्या जवळपास सर्व महत्त्वाच्या उलथापालथी पाहिल्या. कृष्णवर्णीयांसाठी कितीतरी मोठे काम केले आहे. त्यांचे ‘मंडेला- द लाइफ ऑफ नेल्सन मंडेला’ हे रॉड ग्रीन यांनी लिहिलेले आणि भरपूर दुर्मीळ छायाचित्रे असलेले चरित्र लवकरच प्रकाशित होत आहे. उत्कृष्टरीत्या सजवलेल्या या पुस्तकात मंडेलांविषयीची आजवर प्रकाशात न आलेली माहिती असेल. त्यामुळे हे चरित्र वैशिष्टय़पूर्ण ठरावे.
फ्रंट शेल्फ
टॉप ५ फिक्शन
ऑन अ विंग अँड अ प्रेयर : अरुण शर्मा, पाने : २५२२५० रुपये.
कॉम्बॅट ऑफ श्ॉडोज : मनोहर माळगावकर, पाने : १३६२९५ रुपये.
धीस प्लेस : अमिताभ बागची, पाने : २६०४९९ रुपये.
सीता-अॅन इलस्ट्रेटेड रिटेलिंग ऑफ द रामायणा : देवदत्त पटनाईक, पाने : ३२८४९९ रुपये.
हिरोज ऑफ ऑलिम्पस- द हाऊस ऑफ हेड्स : रिक रिओर्दान, पाने : ५६५४९९ रुपये.
टॉप ५ नॉन-फिक्शन
इंडिया अॅट रिस्क : जसवंत सिंग, पाने : ३०४५९५ रुपये.
करेज अँड कन्व्हिक्शन : जनरल व्ही. के. सिंग, पाने : ३९६५९५ रुपये.
डेस्टिनेशन मार्स : एस. के. दास, पाने : १७६/१९५ रुपये.
अॅक्रॉस द चिकन नेक : नंदिता हक्सर, पाने : २८०४९५ रुपये.
सायन्स इन इंडिया : व्ही. व्ही. सुब्बरायप्पा, पाने : ६२४१५०० रुपये.
सौजन्य – फ्लिपकार्ट.कॉम