फिक्शन
१) इद्रीस-किपर ऑफ द लाइट : अनिता नायर, पाने : ३४०५९९ रुपये.
अनिता नायर यांची ही नवी सहावी कादंबरी; दक्षिण भारतात घडते. पण तिचा काळ आहे सोळावे शतक. इद्रीस हा सोमालियन व्यापारी केरळमध्ये येतो, एका उत्सवासाठी. तिथे त्याला त्याचा हरवलेला नऊ वर्षांचा मुलगा भेटतो. मग ते दोघे प्रवास करतात. सोळाव्या शतकातले हे कथानक नायर यांनी रंगतदार आणि वाचनीय केले आहे.
२) शांती मेमोरिअल : शादाब खान, – पाने : १७११४५ रुपये.
ही आहे एक भयकथा. प्रसिद्ध अभिनेते अमजद खान यांचे चिरंजीव असलेल्या शादाब खान यांची ही पहिलीवहिली कादंबरी. अभिनयात जम बसला नाही म्हणून ते लेखनाकडे वळले आहेत. आणि त्यांनी ‘सिरिअल किलर’ची कहाणी सांगणारी ही पहिली कलाकृती पेश केली आहे. याचा दुसरा भागही येतो आहेच. तोवर हा वाचून पाहता येईलच.
३) द ट्रेझर ऑफ काफुर : अरुण रामन, पाने : ३९९२९९ रुपये.
पंधराव्या शतकात घडणारी ही कादंबरी. मुघल सम्राट अकबर सर्वात मोठय़ा संस्थानाचा राजा, पण त्याला खूप शत्रू, तसेच त्याच्या साम्राज्यात बंडखोरही होते. खान्देशातील राजा असफ बेग आणि त्याच्या कारस्थानांची ही नाटय़मय कथा. ऐतिहासिक असल्याने त्यात युद्ध, साहस, कपट हे प्रकार आलेच.
नॉन-फिक्शन
१) द गुड, द बॅड अँड द रिडिक्युलस : खुशवंत सिंग, हुम्रा कुरेशी,
पाने : २२०१९५ रुपये.
खुशवंत सिंग यांच्या या नव्या पुस्तकात छोटी छोटी एकंदर ३५ व्यक्तिचित्रं आहेत. म. गांधी, बॅ. जीना, अमृता शेर-गिल, मदर तेरेसा, संजय गांधी, पं. नेहरू, जॉर्ज फर्नाडिस यांच्याविषयी माहीत नसलेल्या काही गोष्टी या पुस्तकातून समजतात, त्याही खास खुशवंतीय शैलीत.
२) द न्यू क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन : मिन्हाझ र्मचट, पाने : ३२८५०० रुपये.
आर्थिक आणि भौगोलिक संतुलनाने सत्तेचे केंद्र पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकू लागले आहे. राजकारण, अर्थकारण, इतिहास आणि विज्ञान या पातळ्यांवर भारताची आगेकूच चालू आहे. त्याचा अमेरिका, चीन आणि इस्लाम या यांच्या तुलनेत कसा आलेख आहे याची मांडणी पत्रकार र्मचट यांनी केली आहे.
३) इंडिया इन शेम्बल्स : के. सी. अगरवाल, पाने : ४०१/२५० रुपये.
भारतीय सरकार आणि प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी, लालफितीच्या चालढकलीविषयी आणि कुठलाच निर्णय योग्य पद्धतीने न घेण्याविषयी परखड भाष्य करणारे हे पुस्तक भारतीय न्यायव्यवस्थेवर मात्र पूर्णपणे विश्वास ठेवून आहे. त्यामुळे हा देश अजून सुरळीत आहे, असा निर्वाळाही देते.
विशलिस्ट
अनिता नायर यांची ही नवी सहावी कादंबरी; दक्षिण भारतात घडते. पण तिचा काळ आहे सोळावे शतक. इद्रीस हा सोमालियन व्यापारी केरळमध्ये येतो,
First published on: 18-01-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New books releases