उदारीकरणाच्या गेल्या वीस वर्षांच्या काळात भारतात पुष्कळ बदल झाले आहेत. उद्योग, सेवासुविधा, शिक्षण, शेती अशा अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश होतो. ते टिपण्याचे काम इंग्रजीमध्ये आता होऊ लागले आहे. त्या पुस्तकांपैकीच एक असलेले ‘द कॅप्टनशिप’ हे संपादित पुस्तक याच आठवडय़ात प्रकाशित होईल. अन्या गुप्ता यांनी संपादित केलेले आणि अनिता बालचंद्रन यांनी सजवलेले हे तरुण उद्योजकांची ओळख करून देणारे पुस्तक आहे. यात १९९१नंतर उदयास आलेल्या नऊ उद्योजकांचा प्रवास त्यांच्याच शब्दांत सांगितला आहे. ‘हेलियन व्हेंच्युअर पार्टनर्स’चे सहसंस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक संजीव अगरवाल, ‘माइंड ट्री’चे सहसंस्थापक आणि चेअरमन सुब्रतो बागची, ‘नेट अँबिट’चे संस्थापक, चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गिरीश बात्रा, ‘इन्फो एज’ (नोकरी डॉट कॉम)चे संस्थापक संजीव बिखचंदनी, ‘क्रिस कॅपिटल’चे सहसंस्थापक आशीष धवन, ‘हेलियन व्हेंच्युअर पार्टनर्स’चे सहसंस्थापक आशीष गुप्ता, ‘एझेडबी अँड पार्टनर्स’च्या संस्थापक झिया मोदी, ‘करिअर लाँचर’च्या संस्थापक सत्या नारायण आणि ‘वन नाइन्टीसेव्हन कम्युनिकेशन्स’चे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा अशा नऊ तरुण उद्योजकांचा यात समावेश आहे.
अर्थात अशा प्रकारची पुस्तकं ही बऱ्याचदा संबंधितांच्या प्रेरणेनच तयार होतात, लिहून घेतली जातात. पण हे पुस्तक मात्र ब्लूम्सबरीसारख्या प्रतिष्ठित प्रकाशनसंस्थेने काढलेले असल्याने ते ग्राह्य़ मानायला हरकत नसावी.
गेल्या वीस वर्षांत बीपीओ, आयपीओ, ऑनलाइन सेवा असे नवे उद्योग पुढे आले आहेत. त्यात नव्या पिढीने चांगलीच मजल मारली आहे, याचा काहीसा अंदाज या पुस्तकातून करता येईल. पण व्हच्र्युअल जगातल्या व्हच्र्युअल उद्योगांचं काही खरं नसतं, हेही तितकंच खरं.
फ्रंट शेल्फ
टॉप ५ फिक्शन
द ओथ ऑफ द वायुपुत्राज : अमिष त्रिपाठी, पाने : ६००३५० रुपये.
तंत्र : अदि, पाने : ३४४१९५ रुपये.
इन्फेरनो : डॅन ब्राऊन, पाने : ५२८७५० रुपये.
हाफ अ रुपी : गुलज़ार, पाने : २३२२९९ रुपये.
मुंबईस्तान : पियूश झा, पाने : २४८१९५ रुपये.
टॉप ५ नॉन-फिक्शन
इंडिया – द फ्युचर इज नाऊ : संपा. शशी थरुर, पाने : १८४४९५ रुपये.
माय कॅन्सर इज मी – द जर्नी फ्रॉम इलनेस टू होलनेस : विजय भट, नीलिमा भट, पाने : २७२३५० रुपये.
द डाएट डॉक्टर-द सायंटिफिकली प्रूव्ह वे टू लॉस वेट : इशी खोसला, पाने : २३२२५० रुपये.
सोफी सेज : जुडी बालन, पाने : २५२/२५० रुपये.
टेकिंग द ताज : शिवजित कुलर, पाने : ३७७३२५ रुपये.
सौजन्य : फ्लिपकार्ट डॉट कॉम