पाउलो कोएलोची ही नवी कादंबरी बेस्टसेलर ठरली आहे, यात काहीच कौतुकाचा भाग नाही. आहे तो एवढाच की, ही ‘अल्केमिस्ट’छाप अतार्किक आणि फेकू फँटसी नाही.
२) हक्स्टर- द रिव्होल्यूशन बिगिन्स : संकल्प कोहली, परितोष यादव, पाने : २८८२२५ रुपये. ही आदर्शवादाचं गाजर कसं लोभस असतं याचा परवचा उजळणारी कादंबरी आहे. व्यवस्थेवरचा माणसांचा विश्वास उडतो तेव्हा कुणी एक जण क्रांतीच्या पवित्र्यात उभा राहतो आणि ती घडवून आणण्याचा प्रयत्न करतो.
३) किलिंग आशीष कर्वे : सलिल देसाई, पाने : २६०१९९ रुपये.
ही पारंपरिक रहस्यकथा आहे. एका इन्स्पेक्टरचा खून होतो.. मग त्याचा तपास सुरू होतो. दरम्यान अनेक घडामोडी घडतात. त्यातून शेवटी सत्य सापडतं वगैरे. रस असेल तर या पुस्तकाच्या वाटेला जावं.
नॉन-फिक्शन
खुशवंतसिंग यांच्या निवडक साहित्याची संकलने आजवर बरीच प्रकाशित झाली आहेत. हे त्यापैकीच एक. यात ९९ वर्षांच्या निमित्ताने खुशवंतसिंग यांच्या साहित्यातील ९९ वेचे निवडले आहेत आणि त्यांचे संपादन केले आहे ग्रंथसंपादक डेव्हिड दाविदार यांनी.
२) किंगडम ऑफ द सोप क्वीन-द स्टोरी ऑफ बालाजी टेलिफिल्म : कोविद गुप्ता, पाने : २४०२९९ रुपये.
बालाजी टेलिफिल्मवर खरं म्हणजे याआधीच पुस्तक यायला हवे होते. पण ते आता आले. ‘क’च्या बाराखडीच्या मालिका आणि ‘देमार’ चित्रपट यांबाबत लौकिक संपादन केलेल्या शोभा व एकता कपूर यांची ही गोष्ट आहे.
३) इंडो-ब्रिटिश इन्काउंटर : आर. बी. पाटणकर, संपादन – अशोक जोशी, अरुण टिकेकर, पाने : २७१२९५ रुपये.
ज्येष्ठ समीक्षक रा. भा. पाटणकर यांच्या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद. ब्रिटिश वसाहतवादाचा अनेक बाजूंनी विचार करणारं हे पुस्तक वाचनीय आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा