पाकिस्तानात इंग्रजी साहित्याचं एवढं मोहोळ उठलेलं कधी दिसलं नसेल.. ६ ते ८ फेब्रुवारीला कराचीत आणि सध्या (२० व २१ फेब्रु.) लाहोरमध्ये जमण्याचं निमित्त इंग्रजीत लिहिणाऱ्यांना मिळालं, ते म्हणजे लिटफेस्ट.
भारतात जयपूर लिटररी फेस्टिव्हलनं सात वर्षांपूर्वी ‘लिटफेस्ट’ची हवा दक्षिण आशियात निर्माण केली,
विक्रम सेठ आणि भारतीय संस्कृतीच्या प्रदर्शनासाठी नवी योजकता दाखवणारे डिझायनर-संघटक राजीव सेठी, कादंबरीकार मंजू कपूर, आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झालेल्या एकेकाळच्या भारतसुंदरी बिना रामाणी, भारताबाहेरच अधिक राहणाऱ्या लेखिका शर्बाणी बसू आणि चित्रपटकार मीरा नायर, चित्रकला-इतिहासकार यशोधरा दालमिया, शोभा डे आदींची (प्रत्यक्ष वा व्हिडीओद्वारे हजेरी) लाहोरच्या लिटफेस्टात आहे.
कराचीत मात्र भारतीय सहभाग कमीच होता. आशीष नंदी यांचा परिसंवादात समावेश, ए. जी. नूरानी यांच्या काश्मीर प्रश्नाविषयीच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि राजमोहन गांधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद आणि महमूद फारुकी यांची ‘दास्तानगोई’ एवढय़ा तीन-चारच प्रसंगी भारतीय चेहरे इथं दिसले. भारतीय वंशाच्या आणि आपल्या ‘पॉप्युलर’ भटकळांसह आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था चालविणाऱ्या मंदिरा सेन याही इथं होत्या. कराची हे शहर मूळचंच बहुढंगी- अठरापगड वगैरे असल्यामुळे बिनू शाह, निकेश शुक्ला, मीनू गौड अशा नावांची पाकिस्तानी (पण आता पाश्चात्त्य देशांतच राहणं पसंत करणारी) लेखक मंडळी या फेस्टिव्हलच्या निमित्तानं खास निमंत्रित होती.
लाहोरात सध्या वातावरण ढगाळ आहे.. पाऊसही पडतो आहे. पण पाकिस्तानातल्या साहित्यिक कार्यक्रमात इतके भारतीय लेखक असण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि या पावसातही, किमान संशयाचे ढग तरी नाहीत.
आहे थरारकथा तरीही..
भारतातील जंगलात वाढलेला नथानिएल हा अँग्लो इंडियन मॉर्निग स्टारच्या पहिल्याच मोहिमेवर आह़े लुपिनने मात्र याआधीही अशी कामे केली आहेत़ दोघांना एक लालचुटूक माणिक हुडकून नष्ट करून टाकायचा आह़े त्यासाठी त्यांनी केलेले जीवापाड प्रयत्न आणि त्यादरम्यान त्यांच्यात निर्माण झालेले नातेसंबंध या मूळ गाभ्यावर ‘टेरर ऑन द टायटॅनिक’ ही समित बसू यांची गूढकथा बेतली आह़े
विविध प्रसंगांतून खुलणारे मानवी नातेसंबंध, नौकेवरील विरोधी गटातील प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या अनभिज्ञतेचा शाप पुसत चालल्यामुळे नथानिएलला त्यांची नव्याने होणारी ओळख, त्यातून निर्माण होणारे भावबंध यांचे सुरेख चित्रण या पुस्तकात करण्यात आले आह़े सुरुवातीपासून शेवटापर्यंत प्रत्येक व्यक्ती आणि गोष्टीबद्दल गूढ पेरण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आह़े परंतु पुस्तकांच्या शीर्षकाप्रमाणे थरारकथा किंवा साहसकथा वगैरे निर्माण करण्याचा लेखकाचा प्रयत्न असेल, तर तो काही तितकासा यशस्वी झालेला दिसत नाही़ कारण श्वास रोखून धरावे असे प्रसंग पुस्तकात अगदी नगण्यच आहेत़ काही ठिकाणी- विशेषत: कथेच्या मध्यात गूढाची हलकेच उकल करण्याच्या वेळी लेखकाकडून त्याच्या मूळ संवादात्मक शैलीचे बंध तुटले आहेत़ त्यामुळे कथानक अचानक एखाद्या पाठय़पुस्तकाप्रमाणे ‘माहितीपर’ व्हायला लागत़े पण सुदैवाने पुस्तकात अशा जागा कमी आहेत़
पृथ्वीवरचा सर्वात प्रगत प्राणी मनुष्य असला तरीही या ब्रह्मांडात अनेक ठिकाणी मनुष्याहूनही प्रगत लोक अस्तित्वात आहेत़ ज्यांना एलियन्स म्हणतात़ हे परग्रहवासी इतके प्रगत आहेत की, आपण जसे विमानाने एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका खंडातून दुसऱ्या खंडापर्यंतचाही प्रवास सहज करतो; तसे हे एलियन्स ब्रह्मांडातील एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहापर्यंतचा प्रवास त्यांच्या अंतराळयानातून बायका-मुलांसह अगदी सहज करतात़ या प्रवासादरम्यान एकदा त्याचे प्रचंड मोठे यान फुटते, काही लोक मरतात़ काही इतरत्र विखुरतात़ त्यांपैकी काही एलियन्स पृथ्वीवरही पडतात़ इथे वर्षांनुवष्रे, पिढय़ान्पिढय़ा जुळवून घेतात़ पण त्यांना त्यांच्या मूळ ग्रहावर परतायचे आह़े या पिढीत नाही तर पुढच्या पिढीत तरी..
दुर्दैवाने त्यांच्या मूळग्रहवासीयांमध्ये मात्र त्याच्यासाठी प्रयत्न करणारे कुणीच नाही़ पण त्यांच्या परतीसाठी एक गोष्ट मात्र पृथ्वीवर विखुरलेल्या या जमातीला उपलब्ध आह़े ती म्हणजे माणिक! ज्याला ‘साम्राज्याचा डोळा’ असे म्हणण्यात आले आह़े अडचण फक्त एकच आहे की, आताच्या एलियन्सचे पूर्वज जेव्हा पृथ्वीवर पडले तेव्हाच्या घिसडघाईमध्ये तो कुठेतरी हरवला आह़े
येनकेनप्रकारे हे माणिक विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या आरंभी अपघातात रसातळाला गेलेल्या टायटॅनिक या अवाढव्य नौकेवरून लंडनहून अमेरिकेला जाणार असल्याची माहिती एलियन्सच्या एका गटाला मिळते आणि त्याचबरोबर या माणिकाची महती आणि मानवासाठीच्या दुष्परिणामांची माहिती असणाऱ्या ‘मॉर्निग स्टार’ शोधक संस्थेलाही मिळत़े त्यामुळे मानव्याच्या हितार्थ हे माणिक अमेरिकेपर्यंत पोहोचू न देण्याची जबाबदारी संस्थेकडून जेनेव्हिह लुपिन आणि नथानिएल ब्राऊन या एजंटवर सोपविण्यात येत़े ़
एकंदरीत, गूढकथेसाठी आवश्यक असणारा कल्पनाविलास, खिळवून ठेवणारी आणि डोळ्यांपुढे प्रसंग प्रत्यक्ष उभा करणारी कथनशैली, चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे पुढे सरकणारे कथानक आणि चित्रपटाप्रमाणेच ‘क्लायमॅक्स’ गाठणारा शेवट अशा गुणवैशिष्टय़ांमुळे हे पुस्तक गूढकथेची आवड असणाऱ्यांना समाधान देणारे ठरत़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा