राखीव खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी न दिल्याबद्दल सुनील गावस्करांनी केलेली टीका योग्यच आहे. पण गावस्कर जुन्या पिढीचे पडले, त्यामुळे त्यांना फक्त खेळाशीच देणेघेणे होते. आजचा जमाना वेगळा आहे. ‘राखीव खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर संघातील कायम खेळाडूंचे काय होईल’ या वाक्यातच आपला संघ कसा बांधला जातो याचे दर्शन होते. याचाच अर्थ चांगली कामगिरी करा अथवा न करा, संघातील स्थान पक्के असते. पूर्वी केवळ गुणवत्तेवर भारतीय संघाचे दरवाजे मुंबईतून उघडायचे. या काळात वाढलेल्या गावस्करांना नक्कीच ठाऊक असेल की हल्ली भारतीय संघाचे दरवाजे हे चेन्नईतून उघडतात आणि त्यात गुणवत्ता वगरे ‘दुय्यम’ गोष्टींना स्थान नसते.
हंगामी संघनायक कोहलीची मानसिकताही यात दिसून येते. अफगाणिस्तानसारख्या कमकुवत संघाविरुद्धसुद्धा अकरापकी एखाददुसरा खेळाडू बदलून संघाचा आत्मविश्वास डळमळीत होत असेल, यात त्या न खेळवलेल्या खेळाडूवर दाखवलेला अविश्वास त्या खेळाडूंना जास्त त्रासदायक वाटत असेल. हीच चूक कोहलीने गेल्या वर्षी झिम्बाब्वेत केली होती. कर्णधार असताना मालिका जिंकल्यावरसुद्धा काश्मीरच्या परवेझ रसूलला खेळवले नव्हते. वास्तविक जम्मू काश्मीरसारख्या प्रदेशातला एक खेळाडू भारतातर्फे पहिल्यांदा खेळला असता तर त्या घटनेला खेळापलीकडे बरेच संदर्भ होते. पण कोहलीचे कारण तेव्हा होते. ‘भारतातर्फे खेळायला वाट ही पाहावीच लागते.’ स्वत: जेमतेम १० रणजी सामने खेळून, युवा विश्वचषक आणि मग आयपीएलच्या द्वारे भारतीय संघात दाखल झालेल्या कोहलीने कुठच्याही खेळाडूला वाट पाहावी लागते हे सांगणे तितकेसे पटत नाही. ईश्वर पांडेने गेल्या दोन हंगामात स्थानिक सामन्यात नक्कीच सातत्य दाखवले होते आणि कसोटी सामन्यात द्रविड गेल्यावर पुजाराशिवाय आपले चालत नाही. अशा खेळाडूंवर कोहलीने दाखवलेला अविश्वास हा त्यांच्या न खेळण्याच्या क्षमतेबद्दल नसून गावस्कर म्हणतात त्याप्रमाणे चुकून चांगले खेळले तर काय करायचे याबद्दलच जास्त वाटतो.
कोहलीचे कर्णधारपदाचे गुरुबंधू धोनीने सपासप लक्ष्मण, द्रविड, गांगुली, सेहवाग यांचे पत्ते कापले. यात लक्ष्मणचा धक्का तर चटका लावणारा होता. आपल्या सुदैवाने सचिन तेंडुलकरला त्याला धक्का मारता आला नाही आणि त्याला सन्मानाने निवृत्त होता आले. त्याच पावलावर पाऊल ठेवून चेला कोहली आपल्याला हवे त्यांचाच चमू बांधत असतो.
कोहलीमध्ये गुणवत्ता आहे, वय त्याच्या बाजूला आहे. थोडक्यात, कर्णधार बनायची लायकी आहे. फक्त कर्णधाराचे नुसते नावच विराट असून चालत नाही मनही विराट असावे लागते हे कळणे महत्त्वाचे आहे.
नसर्गिक आपत्तीला आचारसंहितेतून वगळावे..
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश व नाशिक भागात गारपीट व वादळी पावसामुळे चार हजार कोटींचे नुकसान झाले आहे. फळबागा, पालेभाज्या, जनावरे, पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही प्रमाणात जीवितहानीही झाली आहे.
त्सुनामी, पूर, भूकंप, गारपीट, वादळी पाऊस, दुष्काळ यांसारख्या नसíगक आपत्ती देशात कधीही येऊ शकतात. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असल्यामुळे सरकार कुठल्याही लोककल्याणकारी घोषणा करू शकत नाहीत. जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना जनतेला नसíगक आपत्तीतून सावरण्यासाठी अधिकार दिले असले तरीही त्यांना निधीची मर्यादा आहे. निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कुठलीच मदत पीडितांना करू शकत नाहीत. नैसर्गिक आपत्ती येण्याचा नेम नसल्यामुळे आदर्श आचारसंहितेतून तिला वगळण्यात यावे. म्हणजे आपत्तीग्रस्तांना पुरेशी मदत वेळीच मिळू शकेल.
सुजित ठमके, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा