मंगळयान मंगळाजवळ पोहोचले आहे, त्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यापूर्वी भारताची ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही अणुसज्ज प्रचंड युद्धनौकेचे उद्घाटनदेखील मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने केले होते. अशा वेळी हे विसरले जाते की, ही नौका ताफ्यात सहभागी होण्यासाठीचे नियोजन आणि त्यासाठीच्या खर्चासह सर्व तांत्रिक बाबी काँग्रेसच्या कार्यकाळात तडीस गेल्या होत्या. मोदींनी फक्त श्रेय स्वतकडे घेतले.
काँग्रेसच्या सत्ताकाळातच जसे भारताचे चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचले, तसे आता विहित कालावधीनंतर मंगळयान मंगळाजवळ पोहोचले आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळातच भारताच्या अणुसज्जताक्षम क्षेपणास्त्रांनी (न्यूक्लिअर केपेबल मिसाइल) पाच हजार कि.मी. पर्यंत अचूक लक्ष्यवेध करण्यात यश मिळवले होते.  भारताचे अनेक दळणवळण उपग्रह अवकाशात स्थिर झाले, त्यासाठी एकंदर २५ यशस्वी उड्डाणे मोदी सत्तेवर येण्याअगोदर झालेली होती. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी भारतीय सेनादले सज्ज झाली, तीही प्रामुख्याने काँग्रेसच्या सत्ताकाळातच. देशाच्या अनेक शहरांत मेट्रो रेल्वेची आखणी करून, दिल्ली, मुंबई व बेंगळूरुमध्ये मेट्रो रेल्वेही काँग्रेसने आणली. मुख्य म्हणजे, या प्रगतीत परकी गुंतवणुकीचा वाटा अत्यल्प होता.
 ‘काँग्रेसने देश के लिए कुछ भी नही किया’ असे  भाषणांमधून सांगणारे मोदी सध्या तरी आयतोबाची भूमिका वठवीत आहेत असे लक्षात येते. देशात विकास प्रकल्प राबविण्यासाठी, इतकेच काय पण देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी ते परकीयांनाच आवाहने करीत आहेत. त्यामुळे भारताच्या औद्योगिक क्षेत्रावर परकीय देशांचे वर्चस्व आता स्थापन होणार आहे. भारतीय बाजारपेठ परकीयांच्या हवाली केल्यास महागाई वाढणार, हे उघ आहे.

सेवेत स्वखुशी हवी!
निवृत्तांचा वेळ सत्कारणी लागावा व त्यांच्या अनुभवाचा फायदा निवडणूक आयोगास व्हावा, यासाठी निवृत्तांना निवडणुकीची कामे द्यावीत, हे पत्र ( लोकमानस, २३ सप्टें) वाचले. खरे तर निवृत्तांच्या वेळेची काळजी आयोगाने करण्याचे काही कारण नाही. निवृत्तांना निवडणुकीच्या कामांचा भरपूर अनुभव असला तरी त्यांचा अनुभव देशाला कुठवर पुरणार! निवृत्तांकडे बोट दाखवण्यापेक्षा सेवेत असणाऱ्यांनीच स्वेच्छेने पुढे यावे. निवृत्तीपर्यंत जादा काम टाळून, निवृत्तीनंतर ‘अनुभवाचा लाभ’ देण्यात काही अर्थ नाही.
सुभाषचंद्र सोनार, राजगुरूनगर.

बँक-सुटय़ांचा बाऊ नको!
‘बँक-व्यवहारांना सुटय़ांचा दणका!’ हे वृत्त (लोकसत्ता- २४ सप्टेंबर) वाचले. दरवर्षी एक-दोन वेळा असे प्रसंग नक्की येतात, की बँका सलग सुटय़ांमुळे दोन-तीन दिवस बंद असतात आणि प्रत्येक वेळी त्याची बातमी होते. मात्र यात बातमी काय आहे, हे समजायला मार्ग नाही.
वार्षकि सुटय़ांचे वेळापत्रक, मग ते बँकांचे असो वा इतर सरकारी / खाजगी आस्थापनांचे असो, नवीन वर्ष सुरू होण्याअगोदरच जाहीर होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सुटय़ांची आणि विशेषत: सलग सुटय़ांची माहिती आधीपासूनच असते. आणि  बँकांच्या सलग सुटय़ांना नावे ठेवणारी हीच ‘सर्वसामान्य जनता’ स्वत: मात्र सलग सुटय़ा साधून सहलींचे नियोजन करत असते (प्रसंगी, अगदी मतदानासारखे राष्ट्रीय कर्तव्यदेखील बाजूला सारून! अर्थात, त्यात काही गर आहे की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे).
तसेही, आजकाल इंटरनेट बँकिंग, इलेक्ट्रॉनिक क्लिअिरग आणि डेबिट-क्रेडिट कार्डाच्या वापरामुळे बँकेतून पसे काढणे वा धनादेश जमा करणे याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. तेव्हा सलग सुटय़ांच्या नावाने गळे काढण्यात आता तितकासा अर्थ उरलेला नाही. या दोन-तीन दिवसांपुरते लोकांनी आपले आíथक नियोजन आधीच केले आणि बँकांनी ऑटोमेटेड टेलर मशीन्समध्ये (एटीएम) ‘ठणठणाट’ होणार नाही याची काळजी घेतली की झाले.
– परेश वसंत वैद्य, गिरगाव, मुंबई</strong>

चरित्रातील ‘वास्तव’ वेगळे आहे
‘वास्तववादी राहिले तरी ..’  या पत्रातील  (लोकमानस, २४ सप्टें. ) उल्लेख वस्तुस्थितीवर आधारित नाही, हे धनंजय कीर  यांनी लिहिलेल्या सावरकर चरित्रावरून सहज लक्षात येते. या चरित्रातील प्रकरण २१ (लाल किल्ल्यातील अभियोग) वरून खालील गोष्टी कळतात :
 गांधी हत्येच्या खटल्यात सावरकरांच्या बाजूने िहदू महासभेचे अध्यक्ष व नामांकित विधिज्ञ ल.ब.भोपटकर हे काम चालवीत होते. या कामी त्यांना जमनादास मेहता, दिल्लीचे लाला गणपतराय, पुण्याचे कुंजविहारी भोपटकर, कलकत्त्याचे जे.पी.मित्तर व मद्रासचे एन.पी.अय्यर हे मदत करत होते. याखेरीज, सावरकरांचे वकील म्हणून पी.आर.दास यांचाही उल्लेख करावा लागेल. कारण सावरकरांनी स्वत पत्र पाठवून, लाल किल्ला अभियोगात आपली बाजू खंबीरपणे मांडून आपले निरपराधित्व सिद्ध करणारे भाषण केल्याबद्दल त्यांचे कृतज्ञतेने आभार मानले होते. तसेच, गाय ए.अल्द्रेद याने सावरकरांना न्याय मिळावा म्हणून जी खटपट केली व जो नतिक पाठिंबा मोठय़ा प्रमाणावर मिळवून दिला, त्याबद्दल त्यालाही सावरकरांनी मनपूर्वक धन्यवाद दिल्याचा उल्लेख (प्रकरण – २२) मिळतो.
आता प्रश्न हा की पत्रलेखक म्हणतात त्याप्रमाणे, ‘सावरकरांची बाजू न्यायालयात मांडणारे’ हे ‘भिडे वकील’ कोण? सावरकर सदनात तळमजल्यावर सावरकरांचे माजी कार्यवाह, नाणावलेले िहदू महासभा नेते, व ‘फ्री िहदुस्थान’ या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक भिडे गुरुजी, (अ.स.भिडे) राहत होते. ते जर वकील असते, तर त्यांच्या नावापुढे तसा उल्लेख केला असता. त्यांनी खटल्याच्या कामी मदत केली, असे असते, तर तशी मदत करणाऱ्या एवढय़ा व्यक्तींच्या (वकिलांच्या) यादीत, त्यांचेही नाव आले असते.
 याखेरीज, प्रकरण २७ (राष्ट्राचे अभिवादन) मध्ये असेही उल्लेख आढळतात की, २४ डिसेंबर १९६० या दिवशी- सावरकरांना ब्रिटिश सरकारने जी दोन जन्मठेपेची शिक्षा १९१०साली दिली होती- तिची ५० वष्रे पूर्ण झाली असती. तो दिवस ‘मृत्युंजय दिन’  म्हणून साजरा करावा, या कल्पनेचे जनक अ. स. भिडे तथा भिडे गुरुजी हे होते. सावरकरांच्या पत्नी- यमुनाबाई यांच्या अंत्यविधीला ज्या काही मोजक्याच व्यक्तीनी स्मशानात भाषणे करून श्रद्धांजली वाहिली, त्यातही अ.स.भिडे होते. तेव्हा इतपत घरगुती संबंध असलेल्या स्वतच्या माजी कार्यवाहाला जर त्यांनी भेट नाकारली असेल, तर ते केवळ प्रकृती अस्वास्थ्यामुळेच असणार. असो. एकंदरीत पत्राचा सूर सावरकरांविषयी पूर्वग्रहदूषित दिसतो.
-श्रीकांत पटवर्धन, कांदिवली पूर्व, मुंबई
सुरेश पटवर्धन (कल्याण), उदय दिघे (विलेपार्ले), दिनेश सबनीस,  
यांनीही अशाच आशयाची पत्रे पाठविली आहेत.
*निवडणुकीतील कळीच्या राजकीय मुद्दय़ाविषयी वाचक सुरेन्द्र बेलकोणीकर
यांनी पाठविलेले व्यंगचित्र

pm narendra modi try to take credit of isro project done by congress

Story img Loader