मंगळयान मंगळाजवळ पोहोचले आहे, त्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यापूर्वी भारताची ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही अणुसज्ज प्रचंड युद्धनौकेचे उद्घाटनदेखील मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने केले होते. अशा वेळी हे विसरले जाते की, ही नौका ताफ्यात सहभागी होण्यासाठीचे नियोजन आणि त्यासाठीच्या खर्चासह सर्व तांत्रिक बाबी काँग्रेसच्या कार्यकाळात तडीस गेल्या होत्या. मोदींनी फक्त श्रेय स्वतकडे घेतले.
काँग्रेसच्या सत्ताकाळातच जसे भारताचे चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचले, तसे आता विहित कालावधीनंतर मंगळयान मंगळाजवळ पोहोचले आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळातच भारताच्या अणुसज्जताक्षम क्षेपणास्त्रांनी (न्यूक्लिअर केपेबल मिसाइल) पाच हजार कि.मी. पर्यंत अचूक लक्ष्यवेध करण्यात यश मिळवले होते. भारताचे अनेक दळणवळण उपग्रह अवकाशात स्थिर झाले, त्यासाठी एकंदर २५ यशस्वी उड्डाणे मोदी सत्तेवर येण्याअगोदर झालेली होती. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी भारतीय सेनादले सज्ज झाली, तीही प्रामुख्याने काँग्रेसच्या सत्ताकाळातच. देशाच्या अनेक शहरांत मेट्रो रेल्वेची आखणी करून, दिल्ली, मुंबई व बेंगळूरुमध्ये मेट्रो रेल्वेही काँग्रेसने आणली. मुख्य म्हणजे, या प्रगतीत परकी गुंतवणुकीचा वाटा अत्यल्प होता.
‘काँग्रेसने देश के लिए कुछ भी नही किया’ असे भाषणांमधून सांगणारे मोदी सध्या तरी आयतोबाची भूमिका वठवीत आहेत असे लक्षात येते. देशात विकास प्रकल्प राबविण्यासाठी, इतकेच काय पण देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी ते परकीयांनाच आवाहने करीत आहेत. त्यामुळे भारताच्या औद्योगिक क्षेत्रावर परकीय देशांचे वर्चस्व आता स्थापन होणार आहे. भारतीय बाजारपेठ परकीयांच्या हवाली केल्यास महागाई वाढणार, हे उघ आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा