हिटलरच्या प्रोपगंडाला प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर पहिल्यांदा हिटलर कोणत्या मातीचा बनलेला आहे हे समजून घेणे आवश्यक होते. त्यासाठी अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सव्र्हिसेस’ने वॉल्टर सी. लँगर या तेव्हाच्या आघाडीच्या मनोविश्लेषणतज्ज्ञाचे साह्य़ घेतले. त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने हिटलरचा मनोविश्लेषणात्मक गोपनीय अहवाल तयार केला. हिटलरचे स्वत:बद्दलचे मत, त्याच्या भूमिका, त्याच्या मित्रांचे त्याच्याविषयीचे मत असे सर्व समजून घेतल्यानंतर लँगर यांनी काही निष्कर्ष मांडले होते. त्यातला एक होता हिटलरच्या आत्महत्येच्या शक्यतेबद्दलचा. हे सांगण्याचे कारण म्हणजे यातून या २८१ पानी अहवालाची उंची आणि दर्जा लक्षात यावा. या अहवालात एके ठिकाणी लँगर यांनी हिटलर आणि त्याचा एक मित्र अर्न्स्ट हँफस्टँगल यांच्यातील संभाषण दिले आहे. त्यात हिटलर म्हणतो – ‘मेंदूत फार कमी जागा असते.. आणि तुम्ही ती तुमच्या घोषणांनी भरून टाकली, की मग विरोधकांना तेथे नंतर कोणतेही चित्र ठेवायला जागाच उरत नाही, कारण मेंदूचे ते अपार्टमेन्ट तुमच्या फर्निचरनेच भरून गेलेले असते.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा