प्रोपगंडा केवळ राजकीय क्षेत्रातच असतो असे नव्हे. तो जेवढा बाजारपेठेत सुरू असतो जाहिरातींद्वारे, तेवढाच तो प्राथमिक शिक्षणापासून अध्यात्मापर्यंतच्या विविध क्षेत्रांत असतो. प्रश्न आहे तो त्यापासून स्वत:ला कसे वाचवायचे याचा. एकच साधा उपाय आहे त्यावर. तो कोणता?

या जगात आपल्यासमोर येतो तो सगळाच प्रोपगंडा असतो का? मग सत्य, तथ्य, वस्तुस्थिती असे काही असते की नाही? सगळाच प्रोपगंडा वाईट असतो का? म्हणजे कर्करोग रोखण्यासाठी धूम्रपानाचे दुष्परिणाम रंगवून सांगितले ते अयोग्य समजायचे का? अखेर खरे आणि खोटे तरी काय असते? तेही प्रोपगंडा नसेल कशावरून? आणि आता या निवडणूक प्रचाराचे उदाहरण घ्या. नुसता प्रचार करून का कोणी जिंकून येतो? त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज लागतेच ना शेवटी? लोक काय उगाचच कोणाच्याही प्रचारावर विश्वास ठेवत नाहीत. ते शहाणे असतात. शिवाय आता तर समाजमाध्यमांमुळे लोकांना बरोबर समजते की जगात नेमके काय चालले आहे. पूर्वी फक्त वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्या होत्या. त्यातून जे सांगितले जाते, तेच खरे मानले जाई. आता फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आलेय. जमाना इंटरनेटचा आहे. त्यातून ‘खरी वस्तुस्थिती’ समजणारच लोकांना. पुन्हा लोक सुशिक्षित झालेत आता. काही तर अतिसुशिक्षित. त्यांना स्वत:चे विचार असतात. स्वत: अभ्यास करून निर्णय घेतात ते.. हे सर्व ऐकल्यानंतर असे नाही वाटत, की प्रोपगंडा या गोष्टीचा जरा जास्तच उदोउदो केला जात आहे? अनेकांच्या मनात असे विविध प्रश्न असतील.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा

प्रश्न पडायलाच हवेत, पण त्याचबरोबर आणखीही काही सवाल आपल्या मनात यायला हवेत. म्हणजे उदाहरणार्थ – ‘नवे’, ‘लगेच’, ‘सोपे’, ‘अधिक मोठे’, ‘अमेझिंग’, ‘इंट्रोडय़ुसिंग’.. असे शब्द जाहिरातीत वापरले, की त्या वस्तूंचा खप कसा काय वाढतो? महादुकानांमध्ये ग्राहकाच्या दृष्टिरेषेत मांडून ठेवलेला माल अधिक का खपतो? महादुकानांतील मालाच्या आळीत अगदी शेवटी किंवा बाहेर पडण्याच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू विकल्या जाण्याची शक्यता कशामुळे वाढते? प्राणी, गोड मुले किंवा ‘सेक्स अपील’ यांचा वापर केलेल्या जाहिराती या कार्टून वा ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा वापर केलेल्या जाहिरातींहून अधिक परिणामकारक का बरे ठरतात? ‘बंडल प्राइसिंग’ म्हणजे एखादी वस्तू उदाहरणार्थ दोन रुपयाला एक याऐवजी चार रुपयाला दोन अशा प्रकारे एकत्रित विकली, तर ग्राहकांच्या दृष्टीने त्या वस्तूचे ‘मूल्य’ लगेच कसे वाढते? आणि ते वाढतेच. विशिष्ट शब्दांच्या वापराने माल अधिक खपतो. हे वर्तनविषयक प्रयोग आणि अभ्यासातून सिद्ध झालेले आहे.

अतिशय साध्या असतात या गोष्टी. आपण कधी त्याचा विचारही करीत नाही, की उदाहरणार्थ – पूर्वी युद्ध मंत्रालय असे. ते हल्ली संरक्षण मंत्रालय कशामुळे झाले? किंवा पूर्वीचे नगरपाल आज नगरसेवक असतात. प्रत्यक्षात ते काही वेगळेच असतात. हल्ली लोक गरीब नसतात, ते आर्थिक अक्षम असतात. माणसे म्हातारी होत नाहीत, ती ज्येष्ठ नागरिक बनतात. अपंग हे अचानक दिव्यांग होतात. मंत्रचळ हा आपल्यासमोर नव्या रूपात ‘ओसीडी’ म्हणून येतो आणि मग त्यावरचे महागडे उपचार, औषधे बाजारात येतात. फार काय, कंपनीतून हल्ली कामगार एकगठ्ठा काढत नसतात. कंपनीचे ‘रिसाइजिंग’ केले जाते. युद्धात सामान्य नागरिक मरत नसतात. ते ‘कोलॅटरल डॅमेज’ असते. एखाद्या समाजाची कत्तल केली जात नाही. ‘एथनिक क्लिन्सिंग’ – साफसफाई – होते त्याचे. एका देशावरचा हल्ला ‘वॉर ऑन टेरर’ असतो आणि अणुबॉम्ब अचानक ‘वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन’ होऊन जातो. कुठून येतात बुवा हे मंगलध्वनी शब्द, असा प्रश्न खरे तर आपल्याला पडायला हवा.

आणि एकदा असे प्रश्न पडू लागले, की आपल्या लक्षात येईल, की आपण मान्य करो वा न करो, प्रोपगंडा आपल्या मनावर राज्य करीतच असतो. एडवर्ड बर्नेज सांगतात त्याप्रमाणे, ‘जनसमूहाच्या संघटित सवयी आणि मते यांची जाणीवपूर्वक आणि अत्यंत हुशारीने हेराफेरी’ केलीच जात असते. हे करणाऱ्यांना त्यांनी ‘अदृश्य सरकार’ म्हटले आहे. त्यांनाच नायजेल ओक्स ‘माइंडबेन्डर’ – मन वाकवणारे, वळवणारे – असे म्हणतात. हे ओक्स म्हणजे ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज’चे संस्थापक. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या व्यक्तीला अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसविण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ ही त्यांच्याच कंपनीचा एक भाग आहे म्हटल्यावर त्यांच्या मताचे महत्त्व लक्षात येते. हे ‘माइंडबेन्डर’ सातत्याने आपल्याला भंजाळवत असतात. त्यासाठी जी विविध तंत्रे वापरण्यात येतात, त्यांचा वेध विविध उदाहरणांतून आपण वर्षभर घेतला. प्रोपगंडाची विविध माध्यमे आणि त्यांचा वापर आपण पाहिला. ते अर्थातच पुरेसे नाही. याचे कारण प्रोपगंडाची तंत्रे साधारणत: तीच असली, तरी माध्यमे मात्र बदलली आहेत. वारंवारता हे प्रोपगंडाचे एक महत्त्वाचे अस्त्र. नव्या माध्यमांमुळे आजचा प्रोपगंडा वारंवारतेच्याही पलीकडे गेला आहे. त्याच्या धुरक्याने आपल्याला वेढून टाकलेले आहे. दूरचित्रवाणी, मोबाइल दूरध्वनी, इंटरनेटवरील संकेतस्थळे, वृत्तपत्रे यांतून तो धबाबा कोसळत आहे. समाजमाध्यमांद्वारे आपण आपले मन नग्नपणे लोकांसमोर अगदी मोफत मांडत असतो. त्याचा फायदा घेण्याची शास्त्रे विकसित झालेली आहेत. ब्रेग्झिट, ट्रम्प निवडणूक यांत त्याचा भयकारी प्रत्यय आला. आपल्याकडे २०१४च्या निवडणुकीतही ‘फेसबुक ग्लोबल गव्हर्नमेंट अँड पॉलिटिकल टीम’च्या केटी हरबॅथ यांनी मोदी यांना ज्या प्रकारे प्रचारसाह्य़ केले होते, तेही असेच चिंताजनक होते.

हा प्रोपगंडा केवळ राजकीय क्षेत्रातच असतो असे नव्हे. तो जेवढा बाजारपेठेत सुरू असतो जाहिरातींद्वारे, तेवढाच तो प्राथमिक शिक्षणापासून अध्यात्मापर्यंतच्या विविध क्षेत्रांत असतो. प्रश्न आहे तो त्यापासून स्वत:ला कसे वाचवायचे याचा. एकच साधा उपाय आहे त्यावर. – प्रश्न विचारा. कोणी कोणाला फॅसिस्ट, दहशतवादी, नक्षलवादी, स्यूडोसेक्युलर असे काही म्हणत असेल, तर स्वत:स विचारा – काय आहे त्या शब्दाचा खरा अर्थ? त्या व्यक्तीचा आणि त्या नामाचा एकमेकांशी खरोखरच संबंध आहे काय? ते नाम बाजूला ठेवले तर ती व्यक्ती वा तो विचार जे सांगतो ते योग्य आहे का? जे अशा बद-नामकरणाच्या तंत्राबाबत, तेच चमकदार सामान्यतेबाबतही. राष्ट्रप्रेम, लोकशाही, मानवता, विज्ञान, धर्म यांच्या आडून जे सांगितले जाते, त्याबाबतही हेच प्रश्न विचारा. कोणी दुष्काळाला टंचाईस्थिती म्हणू लागले, की ओळखा हे मंगलभाषी तंत्र आणि मग त्याचा तथ्यांशी संबंध शोधू लागा. दंतमंजनाच्या जाहिरातीतील डेंटिस्टच्या गळ्यात स्टेथोस्कोप दिसतो, तेव्हा त्या प्रतिमांची, चिन्हांची जादू समजून घ्या. एरवी डेंटिस्टच्या गळ्यात तर कधी स्टेथोस्कोप नसतो. तो येथेच का? अशाच प्रकारे सभा, संमेलनातील, निवडणूक प्रचारातील चिन्हांची उपस्थिती आवर्जून लक्षात घ्या. राहुल गांधी मंदिर परिक्रमा करतात तेव्हा त्यामागील प्रोपगंडा ध्यानात घ्या. अशा प्रकारे एकाची प्रतिष्ठा दुसऱ्याला जोडून त्याला प्रतिष्ठा मिळवून देणे ते हेच ट्रान्सफर नामक तंत्र. समाजातील प्रतिष्ठित, लोकप्रिय व्यक्तींकडून किंवा अगदी आपल्यातल्याच व्यक्तीकडून वस्तूचा, व्यक्तीचा, धोरणाचा प्रचार करण्याचे टेस्टिमोनियल तंत्र तर आपल्या नेहमीच्या पाहण्यातले. तेथे विचारा, की त्या व्यक्तीला आपण त्या विषयातला तज्ज्ञ वा माहीतगार का समजावे? तो जे सांगतो आहे त्याचा तो सांगतो म्हणून नव्हे, तर स्वतंत्रपणे विचार करा. म्हणजे अमिताभ म्हणतो म्हणून थंडाथंडा तेल वापरू नका. ते चांगले वाटले तरच वापरा. यातील एक टाळण्यास अवघड असे तंत्र म्हणजे बँडवॅगन. सगळेच एखादी गोष्ट करतात म्हणून आपणही तीच करावी, हे सोपे. फॅशन, प्रवाह असेच तर पसरवले जातात; पण खरोखरच सगळा समाज एखाद्या गोष्टीमागे धावतो आहे का, हे तपासून पाहिले पाहिजे आणि धावतही असला, तरी प्रसंगी त्यात गटांगळ्या न खाण्याची हिंमतही राखली पाहिजे. वस्तुस्थितीबाबतचे मानसचित्र बदलण्यासाठी भय या भावनेचाही असाच उपयोग केला जातो; पण ही भावना एकटी येत नाही. त्याबरोबर तो धोका दूर करण्याचा उपायही येतो. आपण त्या उपायांवर लक्ष दिले पाहिजे. ते रोगापेक्षा भीषण नाहीत ना किंवा तो धोका खरोखरच तेवढा गंभीर नाही ना, हे जाणून घेतले पाहिजे.

आज बहुसंख्य जनता व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठाची स्नातक बनू लागलेली असल्याने प्रोपगंडाकारांचे काम भलतेच सोपे झाले आहे, हे खरे; पण त्यांच्या तंत्राशी लढणे अशक्य नाही. त्यासाठी आपल्यालाही एक तंत्र परजून ठेवावे लागेल. ते म्हणजे तर्कबुद्धीचे. सारे काही – मग ती व्यक्ती असो वा विचार वा वस्तू – पारखून घेण्याचे. प्रोपगंडाचा मुकाबला करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. (समाप्त)

ravi.amale@expressindia.com

Story img Loader