बिटकॉइनविषयीचे दोन लेख (लोकसत्ता रविवार विशेष, २९ डिसेंबर) वाचनात आले. एकुणात दोन्ही लेखांचा सूर असा होता की या नव्या आणि खुल्या चलनाने प्रस्थापित सार्वभौम चलनांना विचार करायला भाग पडले आहे. परंतु, कुठल्याही चलनाची किंमत ही जोपर्यंत लोकांचा त्यावर किंवा ते चलन जारी करणाऱ्या संस्थेवर विश्वास आहे तोपर्यंतच टिकून राहते. गणेश कुलकर्णीच्या लेखाप्रमाणे २१४० पर्यंत फक्त २.१ अब्ज बिटकॉइन बाजारात येऊ शकतात. म्हणजे साधारण बाजाराचा विचार, करता हे चलन २१४० सालीसुद्धा इल्लिक्विड किंवा कोठेही चटकन वटवणे अशक्य असलेले चलनच राहील (सध्या रोजच्या फोरेक्स विनिमयाची उलाढाल चार ट्रिलियन डॉलर आहे). जयराज साळगावकरांच्या लेखात म्हटले आहे की हे मुक्त चलन असल्याने (रिझव्र्ह बँकेसारख्या) केंद्रीय बँकांची बंधने या चलनाला नसतील. त्याचप्रमाणे चलनवाढ इत्यादी प्रकार यात नसतील. पण कुलकर्णीचा लेख हे स्पष्टपणे सांगतो की बिटकॉइनचे दर एरवीच प्रचंड अस्थिर आहेत. हे दर एका वर्षांत १ : १३ वरून १: १३०० वर गेले होते, आणि आता १: ७००वर आहेत. म्हणजेच या चलनाने जवळपास अध्र्या वर्षांत १०० पट डिफ्लेशन अनुभवले आहे.
बिटकॉइनची वेबसाइटदेखील बिटकॉइन मार्केट प्रचंड अस्थिर (Volatile) असल्याचा इशारा देते. सगळ्या केंद्रीय बँका आपापल्या चलनाचे असे चढउतार रोखण्यासाठी बांधील असतात; पण या चलनाची तशी बँक अस्तित्वात नसल्याने या प्रकाराला कोणीच वेसण घालू शकत नाही. तशी बँक काढायची म्हटली तर चलनाच्या मर्यादित उपलब्धतेमुळे गंगाजळी (Reserves) तयार करण्यावर मर्यादा येतात. म्हणूनच हे चलन विनिमयासाठी अत्यंत वाईट ठरते. गुंतवणुकीसाठी ठीक असले तरी चलन म्हणून या प्रकाराला विशेष किंमत उरत नाही. राहिला मुद्दा फायनान्सचा; या चलनाची सेन्ट्रल बँक नाही म्हणून बँक रेट नाही; आणि म्हणून बिटकॉइनमधून स्थिर पतपुरवठा शक्य नाही. याशिवाय, या चलनाच्या अस्थिरतेमुळे कोणी फोरेक्स डीलर्स गुंतवणूक म्हणून बिटकॉइनकडे विश्वासाने पाहतील काय हीदेखील शंका वाटते. जरी काही लोकांनी त्यात गुंतवणूक केली असली तरी, सध्या या तथाकथित चलनाकडे मार्केट बबल म्हणूनच पाहायला हवे.
या मुद्दय़ांवर अधिक प्रकाश टाकणारे लेख ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले तर अधिक चांगले ठरेल कारण Monetary Economicsसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा (किंवा धडा) असू शकतो.
-श्रीनिधी घाटपांडे
बिटकॉइनच्या विनिमयमूल्याबद्दलचे प्रश्न कायम
बिटकॉइनविषयीचे दोन लेख (लोकसत्ता रविवार विशेष, २९ डिसेंबर) वाचनात आले. एकुणात दोन्ही लेखांचा सूर असा होता की या नव्या आणि खुल्या चलनाने प्रस्थापित सार्वभौम चलनांना विचार करायला भाग पडले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-12-2013 at 12:46 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Questions remain about bitcoin value exchange