रेल्वे दरवाढीविरोधात संताप हे वृत्त (२२ जून )वाचले. कोणत्याही नवीन कार्यास आपण दणक्यात सुरुवात करतो त्याप्रमाणे केंद्र सरकारने खुर्चीत बसल्या बसल्याच रेल्वे प्रवासी भाडे वाढविण्यास हिरवा सिग्नल दिला. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने सत्तेत असताना रेल्वे बजेटमध्ये केलेली हातचलाखी यास कारणीभूत आहे. पण केंद्राने सबुरीने घेत याप्रश्नी पावले टाकणे आवश्यक होते. आमच्याच खिशातून अशाप्रकारे पसे काढून घेऊन तुम्हाला आम्ही सुविधा दिल्या हे दाखवण्यासाठी तर हा आटापिटा सुरू नाही ना? अत्यंत ‘जेट’ वेगाने झालेल्या या वाढीमुळे जनतेचे मासिक ‘बजेट’च कोलमडणार आहे. कष्टाची कमाई जर अशाप्रकारे महागाईचे भक्ष्य बनत असेल तर घरी शिजवायचे काय? एक सांगावेसे वाटते की रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रकारे पुष्कळ लाड करते. त्यांनाही आपण कात्री लावली तर बरे होईल. थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे याबाबतीत विचार केला तर त्यात रेल्वेचाच आíथक फायदा आहे. महागाईने जनता साफ पिचून गेली असल्याने तिला कोणत्याही क्षेत्रातील आíथक वाढ ही न परवडणारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा