राम का रे म्हणाना..! हा अग्रलेख (२५ फेब्रुवारी) वाचला. दलित राजकारणाचे आठवलेकरण हा शब्दप्रयोग पटला; कारण त्यांचे प्रत्यंतर अवतीभोवती अनुभवायला येत आहे. दलित मंडळी एकगठ्ठा मतदान करतात या चुकीच्या गृहीतकावर आधारित त्यांच्या नेत्यांना चुचकारण्याची भाजपची व काँग्रेसची जुनी खोड आहे.
पण नीट डोळे उघडून पाहिले तर अनेक दलितांनी आंबेडकरवादाचीही साथ केव्हाच सोडली आहे, असे लक्षात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूर्तिपूजेचा धिक्कार केला. आताचे कैक दलित गणपती, नवरात्री, सत्यनारायण, मंगळागौर, पोथी-पूजापाठ, नारायण नागबली यात व्यवस्थित रमतात. कित्येकांनी हिंदू धर्माचा छुपा पुरस्कार करणाऱ्या संप्रदायांचे अनुयायी होणे पसंत केले आहे. त्याबद्दल पृच्छा केली तर ‘यापूर्वी आमचे पुष्कळ हाल झाले, निदान आता तरी देवाधर्माच्या माध्यमातून सवर्णाच्या अवतीभवती राहू द्या,’ असे उत्तर ही मंडळी देऊ लागली आहेत. दलितांमधला जीवनसाथी शोधण्याऐवजी तो सवर्णातला असेल तर बरा, अशी मानसिकता तरुणाई बाळगू लागली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाची दुकाने चालविणारे थिटे नेतृत्व तर त्यांच्या तत्त्वांना हरताळ फासत आहेच, पण आंबेडकरी समाजातील मोठा भाग आंबेडकरी विचारांशी फारकत घेऊन प्रस्थापित राजकीय, धार्मिक विचारसरणीच्या वळचणीला गेला आहे. वर्णनापुरते दलितवर्ग वगैरे ठीक आहे, पण त्याची असंख्य शकले झाली असून, संपादकीयात म्हटल्याप्रमाणे त्यांच्या राजकीय ताकदीने कधीच राम म्हटलेला आहेच आणि अनेक दलितांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारसरणीलाही अखेरचा जयभीम केला आहे याचे वाईट वाटते.
त्यांनी ‘राम’ही म्हटले व ‘अखेरचा जयभीम’ही केला
राम का रे म्हणाना..! हा अग्रलेख (२५ फेब्रुवारी) वाचला. दलित राजकारणाचे आठवलेकरण हा शब्दप्रयोग पटला; कारण त्यांचे प्रत्यंतर अवतीभोवती अनुभवायला येत आहे. दलित मंडळी एकगठ्ठा मतदान करतात या चुकीच्या गृहीतकावर आधारित त्यांच्या नेत्यांना चुचकारण्याची भाजपची व काँग्रेसची जुनी खोड आहे.पण …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-02-2014 at 02:25 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram vilas paswans ljp ties up with bjp in bihar