इतर अनेक मासिकांत खूप चांगले चांगले लेख येत असतात, पण ते सर्वानाच वाचायता येत नाहीत. पण त्या लेखांचा सारांश नेमकेपणाने देणारे एखादे मासिक काढले तर ते नक्कीच चांगले चालू शकेल, या कल्पनेतून १९२२ साली डेविट वॉलेस आणि लिला वॉलेस या अमेरिकन दाम्पत्याने ‘रीडर्स डायजेस्ट’ हे मासिक सुरू केले. ते अल्पावधीतच लोकप्रियही झाले. ७० देशातल्या चार कोटी वाचकांपर्यंत पोहचणारे, एकवीस भाषांत ४९ आवृत्त्या प्रकाशित होणारे हे मासिक गेली अनेक वर्षे सातत्याने प्रकाशित होत होते. वर्तमानपत्र आणि पुस्तक यांच्यामधली दरी भरून काढण्याचे काम हे मासिक करत असल्याने त्याला ‘पॉकेट युनिव्हर्सिटी’ असे म्हटले जाई. जगात सर्वाधिक वाचले जाणारे मासिक असाही त्याचा लौकिक होता. मात्र २०१० आणि २०१२ या वर्षी हे मासिकही अमेरिकेतील मंदीचा फटका बसून काही काळ प्रकाशितच होऊ शकले नाही. तर मागच्या पंधरवडय़ात या मासिकाची मातृकंपनी – आरडीए होल्डिंग कंपनी -दुसऱ्यांदा दिवाळखोरीत निघाली आहे. चार वर्षांतील ही तिची दुसरी वेळ. त्यामुळे ‘रीडर्स डायजेस्ट’चा आता अस्तित्वासाठीचा लढा सुरू झाला आहे. ९० वर्षांती खणखणीत परंपरा असलेल्या या मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक प्रकाशित झाला आहे, पण मार्चचा अंक प्रकाशित होईल की नाही, याबाबत थोडी साशंकताच आहे.
फ्रंट शेल्फ
टॉप ५ नॉन-फिक्शन
सिग्नल अँड द नॉइज : नेट सिल्व्हर, पाने : ५४४५९९ रुपये.
टू सेल इज ह्य़ुमन : डॅनिअल पिंक, पाने : २७२५५० रुपये.
लिगसी : सुधा मेनन, पाने : २७२३९९ रुपये.
मुंबई रिडर १३ : संपादित, पाने : २५२२९५ रुपये.
द इकारोस डिशीओशन : सेट गॉडिन, पाने : २५६५९९ रुपये.
टॉप ५ फिक्शन
द ओथ ऑफ द वायपुत्राज : अमिष, पाने : ६००३५० रुपये.
गॉन गर्ल : गिलियन फ्लिन, पाने : ४६६७३३ रुपये.
कॅलकटा : अमित चौधुरी, पाने : ३०७३९९ रुपये.
साल्व्हेशन ऑफ अ सेंट : कैएगो हिगाशिनो, पाने : ३८४३५० रुपये.
फारअवे म्युझिक : स्त्रिमोयी पिऊ कुंडू, पाने : ३२४२९९ रुपये.