इतर अनेक मासिकांत खूप चांगले चांगले लेख येत असतात, पण ते सर्वानाच वाचायता येत नाहीत. पण त्या लेखांचा सारांश नेमकेपणाने देणारे एखादे मासिक काढले तर ते नक्कीच चांगले चालू शकेल, या कल्पनेतून १९२२ साली डेविट वॉलेस आणि लिला वॉलेस या अमेरिकन दाम्पत्याने ‘रीडर्स डायजेस्ट’ हे मासिक सुरू केले. ते अल्पावधीतच लोकप्रियही झाले. ७० देशातल्या चार कोटी वाचकांपर्यंत पोहचणारे, एकवीस भाषांत ४९ आवृत्त्या प्रकाशित होणारे हे मासिक गेली अनेक वर्षे सातत्याने प्रकाशित होत होते. वर्तमानपत्र आणि पुस्तक यांच्यामधली दरी भरून काढण्याचे काम हे मासिक करत असल्याने त्याला ‘पॉकेट युनिव्हर्सिटी’ असे म्हटले जाई. जगात सर्वाधिक वाचले जाणारे मासिक असाही त्याचा लौकिक होता. मात्र २०१० आणि २०१२ या वर्षी हे मासिकही अमेरिकेतील मंदीचा फटका बसून काही काळ प्रकाशितच होऊ शकले नाही. तर मागच्या पंधरवडय़ात या मासिकाची मातृकंपनी – आरडीए होल्डिंग कंपनी -दुसऱ्यांदा दिवाळखोरीत निघाली आहे. चार वर्षांतील ही तिची दुसरी वेळ. त्यामुळे ‘रीडर्स डायजेस्ट’चा आता अस्तित्वासाठीचा लढा सुरू झाला आहे. ९० वर्षांती खणखणीत परंपरा असलेल्या या मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक प्रकाशित झाला आहे, पण मार्चचा अंक प्रकाशित होईल की नाही, याबाबत थोडी साशंकताच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा