‘आप’ म्हणजे वय वष्रे दोन, अरिवद केजरीवाल यांनाही राजकारणाचा अनुभव तितकाच. कार्यकर्त्यांच्या कायम फौजेचा अभाव. अशा परिस्थितीत केजरीवाल यांचा प्रामाणिक हेतू लक्षात घेऊन प्रसारमाध्यमांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत उचलून धरले व जनतेलाही त्यांचा हेतूची प्रामाणिकता पटल्याने यश मिळाले. त्यांचे मुद्दे हे देशातील बुद्धिवंतांना रुचणारे आहेत. ते स्वत प्रामाणिक नसते तर काँग्रेस पक्षाने केव्हाच त्यांना फाडून खाल्ले असते. त्यामुळे इतर राज्यात कार्यकर्त्यांचे जाळे ना आíथक ताकद, त्यामुळे वैयक्तिक क्षमतेवरच उमेदवार उभे करावे लागले. साधी चित्रवाणीवर एक जाहिरातही त्यांनी दिल्याचे दिसले नाही. नभोवाणीवर थोडय़ा फार कमी खर्चाच्या जाहिराती होत्या. भारतीय निवडणुकीत असणारे पैसा व कार्यकत्रे यांचे बळ असणे किती प्रभाव टाकू शकते हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे हत्ती व मुंगी असा सामना होता. म्हणून मुंगीने हत्तीला आव्हान देऊच नये असे कसे म्हणता येईल?
अग्रलेखातील (९ जून) दुसरा अक्षेप म्हणजे ‘आप’ ने ४०० जागा ताकद नसताना कशासाठी लढवल्या. इतक्या जागा लढवल्याने टक्केवारीत ‘आप’ राष्ट्रीय स्तरावर पाचव्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शिवाय मते व निवडून येणाऱ्या जागा यांचे कोणत्याही प्रकारे त्रराशिक नाही. या पक्षाला चार जागा पंजाबात अनपेक्षित लागल्या व त्यांचा लोकसभेत प्रथम प्रवेश सुकर झाला. हा खासदारांचा आकडा भाजपच्या १९८४ सालच्या खासदार संख्येपेक्षा दुप्पट आहे, ही गोष्ट दृष्टीआड करून चालणार नाही.
तिसरा मुद्दा मतभेदांचा. भारतीय राजकारणात लोकशाही आहे याचा अर्थ सर्व राजकीय पक्षांमधील संबंध लोकशाही तत्त्वावर आहेत. पण एखादा पक्ष सोडला तर प्रत्येक पक्षात एका व्यक्तीचा अधिकार चालतो. म्हणजेच पक्षांतर्गत हुकूमशाही आहे. जहाज बुडू लागल्यावर काही लोकांची चलबिचल होऊन ते पक्षाबाहेर जाऊ पाहतात. अशावेळी भोके बुजवून रंगसफेदी केली जाऊन परत पक्षात हुकूमशाही येऊन स्थैर्य येते. पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीमुळे आजपर्यंत एकही पक्ष टिकू शकलेला नाही. उदा. संघटना काँग्रेस हा ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी काढलेला पक्ष इंदिरा गांधींसमोर सामूहिक नेतृत्वामुळे टिकू शकला नाही. तीच गोष्ट जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून जन्माला आलेल्या जनता पक्षाची झाली. त्यामुळे भारतातील पक्षीय हुकूमशाहीचे अस्तित्व आपण व्यावहारिक गरज म्हणून स्वीकारण्यास पर्याय नाही.
दिल्लीत सत्तेवर बसवण्यासाठी बिनशर्त दिलेला पाठिंबा स्वीकारण्यास वेळ लावला तेव्हा राजकीय निरीक्षकांनी केजरीवाल यांच्यावर कोणती टीका केली हे विसरून चालेल? जनलोकपाल विधेयकाची घाई केली हे केजरीवाल यांनी उशिरा का होईना, मान्य केले. मुख्यमंत्रीपद म्हणजे मिळालेली सत्तेची खुर्ची सोडल्याची उदाहरणे भारतीय राजकारणात किती पाहायला मिळतात? उलट प्रत्येक वेळी सत्तेची खुर्ची सांभाळण्यसठी किती प्रकारच्या उडय़ा माराव्या लागतात हे नरस्िंाह रावांनी पंतप्रधानपद राखताना दाखवून दिले. यासाठी सर्वाधिक टीकेचे निष्कारण धनी मनमोहन सिंग झाले. यूपीए-२च्या स्थापनेपासून ज्या तडजोडी कराव्या लागल्या त्यांची गणतीच नाही. त्यामुळे सरकार टिकवले नाही म्हणून केजरीवाल यांना दांभिक म्हणणेही पटत नाही.
मोदींना वाराणसीत आव्हान देणे हे ‘उंटाच्या पाश्र्वभागाचा मुका घेणे आहे’ हे म्हणणे म्हणजे राजनारायण यांनी इंदिरा गांधींना दिलेले यशस्वी आव्हान देणे हाही मूर्खपणा होता असे म्हणायचे काय? शीला दीक्षित यांनाही त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात यशस्वी आव्हान केजरीवाल यांनीच दिले होते. त्यांना टीका करून नामोहरम करू पाहणे अन्यायाचे नव्हे का? मोदींना केजरीवाल यांची भीती वाटत नसती तर बडोदा मतदारसंघातूनही उभे राहण्याची काय गरज होती? बरे केजरीवाल हे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे उमेदवार आहेत. एक प्रकारे त्यांनी आपण निधडय़ा वृत्तीचे आहोत हेच दाखवून दिले. त्यामुळे राजकीय निरीक्षकांनी एकांगी टीका करून कोणालाही सरसकट झोडपण्यापेक्षा त्या त्या वेळी घडलेली चूक दाखवून देणेच उचित होईल.
-प्रसाद भावे, सातारा
सरसकट झोडपणारी एकांगी टीका नको
'आप' म्हणजे वय वष्रे दोन, अरिवद केजरीवाल यांनाही राजकारणाचा अनुभव तितकाच. कार्यकर्त्यांच्या कायम फौजेचा अभाव. अशा परिस्थितीत केजरीवाल यांचा प्रामाणिक हेतू लक्षात घेऊन प्रसारमाध्यमांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत उचलून धरले व जनतेलाही त्यांचा हेतूची प्रामाणिकता पटल्याने यश मिळाले. त्यांचे मुद्दे हे …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-06-2014 at 12:15 IST
TOPICSवाचकांचा प्रतिसादReaders Responseवाचकांचे ईमेलReaders Emailवाचकांचे मेलReaders Mailवाचकांच्या प्रतिक्रियाReaders Reaction
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers reaction on news