‘तिसऱ्या इंतिफादाकडे?’ या अग्रलेखात (१४ जुलै) सध्या दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात झडत असलेल्या संघर्षांबाबत ‘वृद्धाश्रम, नागरी वस्ती आदी कशाचाही अपवाद इस्रायलकडून केला जात नसून नृशंसपणे पॅलेस्टिनी मारले जात आहेत,’ असे विधान केले गेले आहे ते वास्तवाला धरून नसल्याने त्याबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. इ.स. २००० पासून हमास इस्रायलच्या नागरी वस्त्यांवर रॉकेटहल्ले करत आहे. आत्तापर्यंत या रॉकेटची माराक्षमता २-८ किलोमीटर असल्यामुळे काही हजार इस्रायली लोक या हल्ल्यांच्या सावटाखाली होती. पण गेल्या काही वर्षांत इराण आणि सीरियाकडून चोरटय़ा मार्गानी हमासने हजारो दीर्घ पल्ल्याची रॉकेट मिळवली असून आता ती इस्रायलची राजधानी जेरुसलेम आणि आíथक राजधानी तेल-अवीवच्या पलीकडे पोहचत आहेत. आज इस्रायलची निम्मी जनता या रॉकेटच्या सावटाखाली जगत आहे. हमासकडून रॉकेट डागले गेल्यानंतर इस्रायली लोकांना सुरक्षित जागी लपण्यासाठी अनेकदा १५ सेकंदांचा अवधी मिळतो. दिवसातून अनेकदा हातातले काम टाकून तळघरात लपावे लागल्याने महत्त्वाचे सर्व व्यवहार ठप्प होतात. लहान मुले, वृद्ध आणि विकलांगांवर या परिस्थितीचा खूप विपरीत परिणाम होतो. या रॉकेट हल्ल्यावर उपाय म्हणून इस्रायलने स्वप्रयत्नांनी ‘आयर्न डोम’ म्हणजेच ‘पोलादी छत्र’ ही रॉकेटविरोधी यंत्रणा विकसित केली असून अशी यंत्रणा जगातील कुठल्याच देशाकडे (अगदी अमेरिकेकडेही) नाही. या यंत्रणेमुळेच हमासच्या रॉकेटमुळे होणारा इस्रायली नागरिकांचा संहार मोठय़ा प्रमाणावर कमी झाला आहे.
अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या गाझापट्टीत जमिनीवरील लष्करी कारवाई केल्यास त्यात हजारो निरपराध लोकांचा जीव जाऊ शकतो. या युद्धात आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी इस्रायल मिसाइलचा (क्षेपणास्त्र) वापर करत आहे तर हमास आपल्याकडील मिसाइलचे संरक्षण करण्यासाठी गाझातील निरपराध नागरिकांचा वापर करत आहे. रुग्णालये, शाळा, प्रार्थनास्थळे आणि वृद्धाश्रमांचा वापर हमास आपल्या मिसाइल लपवण्यासाठी तसेच त्या इस्रायलवर डागण्यासाठी करत आहे. इस्रायल जेव्हा या ठिकाणांवर कारवाई करते तेव्हा शक्य ते सर्व प्रयत्न करून जसे की संबंधित लोकांना सावध करणारी भित्तिपत्रके विमानातून टाकणे तसेच डमी मिसाइलच्या वापराद्वारे नागरिकांना इशारा देणे. त्यामुळे या गाझातील निरपराध लोकांना भोगाव्या लागणाऱ्या हाल-अपेष्टांची प्राथमिक जबाबदारी हमासवर येते.
– विनायक दीक्षित
इंडो-इस्रायल फ्रेंडशिप असोसिएशन
इस्रायलवर नाही, हमासवरच मनुष्यहानीची जबाबदारी!
‘तिसऱ्या इंतिफादाकडे?’ या अग्रलेखात (१४ जुलै) सध्या दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात झडत असलेल्या संघर्षांबाबत ‘वृद्धाश्रम, नागरी वस्ती आदी कशाचाही अपवाद इस्रायलकडून केला जात
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-07-2014 at 12:13 IST
TOPICSवाचकांचे ईमेलReaders Emailवाचकांचे मेलReaders Mailवाचकांच्या प्रतिक्रियाReaders Reactionवाचकांच्या प्रतिक्रिया
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers reaction on news